राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

8 تغريدة Feb 28, 2023
G20 हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक सहकार्य करणाऱ्या 20 मोठ्या अर्थव्यवस्थांचा समुह आहे, जो जागतिक GDP च्या 85 %, जागतिक व्यापाराच्या 75% पेक्षा अधिक आणि जगाच्या 2/3 लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. 1 डिसेंबर 22 ते 30 नोव्हेंबर 23 हे एक वर्ष भारताकडे G20 चे अध्यक्षपद राहणार आहे..
भारत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, UK, US व EU हे G20 चे सदस्य आहेत! या एक वर्षात विविध विषयांवर G20 च्या 200+ जास्त बैठका भारतात होणार आहेत..
यजमानपद असल्याने त्या अधिकाराचा वापर करून भारताने बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि UAE या देशांना 2023 मध्ये होणाऱ्या शिखर परिषदेसाठी 'पाहुणे' म्हणून आमंत्रित केले आहे..
शिखर परिषदेला प्रत्येक सदस्य देशांचे सरकार/राज्य प्रमुख, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित असतात. अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय संस्था आणि गैर-सरकारी संस्थांनाही शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे..
भारताने G20 पुढे ठेवलेल्या प्राधान्यक्रमात सर्वसमावेशक, न्याय्य आणि शाश्वत आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण, सार्वजनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान-सक्षम विकास, हवामान बदल व पर्यावरण, गरजू देशांना वित्तपुरवठा, जागतिक अन्न सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा यासह इतर मुद्द्यांवर फोकस केला आहे..
या सर्व विषयांवर होणाऱ्या 200+ आंतराष्ट्रीय बैठका देशातील प्रत्येक राज्याच्या राजधानीत व इतर प्रमुख शहरांमध्ये आयोजित करून पाहुण्यांना 'भारत दर्शन' घडवण्यात येणार आहे, व त्यानिमित्ताने देशाच्या प्रत्येक भागाची ओळख व विविधता यांची 'मार्केटिंग' मोदी सरकार करणार आहे..
मोदी 'इव्हेंट' करतात असा त्यांच्यावर आरोप होत असतो. तर होय, हा सुद्धा एक जागतिक लेव्हलचा मेगा-इव्हेंटच आहे. जगभरातील नेत्यांना बोलवायला धम्मक लागते! असले इव्हेंट नेहरू ते मनमोहन कोणी केले नाहीत कारण त्यांनी बोलावलं असतं तर येणार कोण होतं? उलट हेच तिकडे खाली मान घालून जात असत..
असो! येत्या एक वर्षात जागतिक पातळीवर भारताचा बोलबाला अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यात मला तिळमात्र शंका नाही. अशा पावरफुल G20 चे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान आज भारताला मिळाला आहे, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणं स्वाभाविकच आहे. शाब्बास मोदी सरकार. शुभेच्छा..💐
जय हिंद!

جاري تحميل الاقتراحات...