राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 تغريدة Feb 28, 2023
सहज आपलं निरीक्षण..
2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून आपण एक गोष्ट सातत्याने महाराष्ट्रात होताना बघत आहोत. ती म्हणजे जनतेशी संबंधित नसलेल्या फालतू विषयांवरून वेळोवेळी घडवून आणलेले वाद आणि (विकाऊ मिडियाकडून) त्यात तेल ओतून जनतेला त्यातच बिजी ठेवायची रणनीती..
2019 मध्ये मविआ नावाचा दहावा ग्रह महाराष्ट्राच्या राशीत आल्यापासूनच हे सगळं सुरू झालं आहे. युवक, शेतकरी, बेरोजगार, महिला, विकास, अर्थव्यवस्था असे विषय चर्चेत येऊ द्यायचे नयेत हीच मविआची रणनीती होती. सत्तेत असताना स्वतः काही केलं नाही, आता जे करताहेत त्यांना करू द्यायचं नाही..
मलिक, दोन्ही राणा, बच्चू कडू, सुषमा अंधारे, अब्दुल सत्तार, नितीन व संजय राऊत, गुलाबराव, सुप्रियाताई, उद्धव आणि आदित्य ठाकरे, पेडणेकर, नाना पटोले आणि त्यांचे डजनभर सहकारी सतत विवादास्पद, भांडणाच्या किंवा आगलावू भाषणबाजीत मश्गुल होते/आहेत! यांनी बडबड करायची, बाकी मीडिया आहेच..
प्रगतीचे व्हिजन घेऊन पुढे जाणाऱ्या महाराष्ट्राला 2019नंतर हेच बघावं लागलं आहे. मूठभर कार्यकर्ते व काही पत्रकारांना हाताला धरून (जनतेचा संबंध नसलेल्या) फालतू विषयांवरून वाद पेटवायचे आणि आयुष्यात ज्यांचं काही भलं केलं नाही अशा समर्थकांना भावनिक करून स्वतःला फोकस मध्ये ठेवायचं..
बरं तुम्हाला वरकरणी वाटेल की हे सगळे भांडखोर आणि खुजे नेते आहेत. तर, नाही! हे सगळे फक्त 4 महिन्यांपूर्वी मांडीला मांडी लावून बसले होते. एकमेकांचे गोडवे गात होते. मूळ मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्याच्या स्ट्रॅटेजी वर एकत्रच काम करत होते. 3-4 महिन्यांत ट्युनिंग खराब नाही होत..
ही सगळी मॅच-फिक्सिंगच वाटतेय. 2014 नंतर घराणेशाही वाले भयंकर इनसेक्युअर झाले आहेत. 2019 नंतर तर डिप्रेशन मध्ये जाण्याऐवढी परिस्थिती बेकार झालेली आहे. बांद्रा, बारामती, अमेठीही सेफ राहिले नाहीत!
फक्त यात्रा व दौरे नाही, फोकस मध्ये राहण्यासाठी हे काय-काय करतील नेम नाही यांचा..🙏

جاري تحميل الاقتراحات...