राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

12 تغريدة Feb 28, 2023
मालेगाव बॉम्बस्फोट केस मधील काँग्रेस पक्षाची 'हिंदू आतंकवाद थेअरी' खोटी होती हे NIA कोर्टात सिद्ध होत आहे..नक्की वाचा! (थ्रेड) :
रिकॅप : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात मोटारसायकलवर ठेवलेल्या स्फोटकांच्या स्फोटात सहा जण ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते..
या प्रकरणात 7 आरोपी होते ज्यांचा ATS ने अमानुष छळ केला होता. सध्या सातही आरोपी जामिनावर बाहेर आहेत. 23 ऑक्टोबर 2008 रोजी ATSने भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करून या प्रकरणाशी संबंधित पहिली अटक केली. ATSने तपास पूर्ण केल्यानंतर याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले..
ATSचा तपास 'मोटिव्हेटेड' असल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास NIAकडे वर्ग केला.
ATS कडून NIA कडे ही केस दिल्यावर काय झालंय बघा..
दोन दिवसांपूर्वी या प्रकरणातील एका साक्षीदाराने विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) न्यायालयाला सांगितले की, त्याने महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (ATS) दिलेले स्टेटमेंट काय होते हे आठवतच नाही..
यापूर्वी सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये विशेष NIA न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान या खटल्यातील अन्य दोन साक्षीदार पलटले होते. इंदूरमधील एका हॉटेलमध्ये काम करणार्‍या त्यांच्यापैकी एकाने ATSला आधी जे काही सांगितले होते ते कोर्टात परत सांगण्यास नकार दिला..
साध्वी प्रज्ञा यांना जबरदस्ती गोवण्यात आलेल्या या खटल्यातील आणखी एक साक्षीदाराने आज पलटी मारली आहे.
या प्रकरणातील तो 28 वा साक्षीदार आहे ज्याने आपल्या स्टेटमेंटवरून पलटी मारली आहे! होय, 28 वा!!! अख्खी केसच असल्या खोट्या साक्षीदारांच्या जबानीवर करण्यात आली होती..
एक, दोन नाही तर 28 साक्षीदार आपल्या जबानीवरून जर पलटी मारत असतील, तर हा खटलाच एक कारस्थान समजून या कारस्थानात सहभागी असलेल्या प्रत्येकाला शिक्षा का होऊ नये?
फक्त या 7 लोकांना टार्गेट केलं एवढंच नव्हे, तर 'हिंदू आतंकवाद थेअरी' मांडून 100 कोटी हिंदूंना बदनाम करायच्या कारस्थानात फक्त ATS चे संबंधित (आजी-माजी आणि हयातीत असलेले-नसलेले) अधिकारीच नाही तर त्यांचे राजकीय माय-बाप यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे..
याला कोण जबाबदार आहेत ते सगळे एक्सपोज झाले पाहिजेत! जन्माला आल्यापासून सेक्युलरीजमचं ग्राईप-वॉटर पाजल्याने अनेक हिंदूंना 'आतंकवाद्यांना धर्म नसतो, पण 'हिंदू आतंकवाद' मात्र खरा असतो' हे पचनी पडू लागलं होतं. या कारस्थानी लोकांना एक्सपोज केलं तरच अशा हिंदूंच्या डोक्यात प्रकाश पडेल..
हा विषय फक्त 7 आरोपी निर्दोष आहेत यावर संपला तर मला तरी नक्कीच वाईट वाटेल. त्याहून दुर्दैवी काही होऊ शकत नाही. कोणी भविष्यात असली नीच कारस्थाने करू नये, यासाठी कारस्थानी लोकांना शिक्षा होणे आवश्यक आहे! जर आज धडा शिकवला नाही, तर उद्या तीच कामं परत करताना कोणाला भीती राहणार नाही..
सगळ्यात महत्त्वाचं : जर या 7 लोकांनी मालेगावात स्फोट केलाच नाही, तर सहा मुस्लिम ठार व 100 मुस्लिम जखमी झालेला तो स्फोट कोणी केला? ज्यांनी 7 निर्दोष लोकांना गोवले, त्यांनीच तर केला नसेल? जर तसं असेल, तर UAPA आहेच! एखादा कारस्थानी आज हयातीत नसेल, तरी सत्य तर बाहेर आलंच पाहिजे..
महत्त्वाचं : ATS कडून NIA कडे तपास एप्रिल-2011 मध्ये वर्ग करण्यात आलाय, मोदी-मोदी करू नका. तपास यंत्रणा आणि कोर्ट यांच्यात हे सगळं सुरू आहे, सरकारचा संबंध नाही. जर संबंध आहे, तर तो एवढाच आहे की NIA व कोर्टाच्या कामात बोटं घालायला त्यांनी कोणते सिब्बल-सिंघवी पाठवले नाहीत..🙏

جاري تحميل الاقتراحات...