राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

9 تغريدة Feb 28, 2023
(थ्रेड) : जून 2021 मध्ये, जेव्हा बेंजामिन नेतन्याहू यांना सलग 12 वर्षे पंतप्रधान राहिल्यानंतर पद सोडावे लागले, तेव्हा अनेक तज्ञांनी असे म्हटले होते की हा 'बीबी'युगाचा अंत आहे! नेतन्याहू यांनी तीनच शब्दात प्रतिक्रिया दिली होती : "मी पुन्हा येईन!"
निवडणूक निकालांवरून असे दिसून आले आहे की नेतन्याहू यांचे जाणे फक्त थोड्याच काळासाठी होते. 73 वर्षीय राईट-विंगर बेंजमीन नेतन्याहू यांनी डाव्या कॉम्रेड लॅपिड यांना घरी पाठवलंय. लॅपिड ही तीच व्यक्ती आहे ज्याने नेतन्याहू यांना मागच्या वेळी पराभूत करण्याचे डावपेच आखले होते..
सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेतन्याहू सहाव्यांदा पंतप्रधान होत आहेत. 74 वर्षांच्या इस्रायलच्या इतिहासात असं कधीच घडलं नाहीये. त्यांनी इस्रायलला मध्यपूर्वेतील धोकादायक शक्तींपासून सुरक्षित ठेवले आहे - हा जनतेचा विश्वास नेतन्याहू यांच्या यशाला कारणीभूत आहे - जे 100% खरे आहे.
पॅलेस्टाईनबाबत ते अत्यंत कठोर आहेत आणि त्यांनी शांततेच्या चर्चेपेक्षा कडक सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. सरसकट सगळ्या मुस्लिम राष्ट्रांना ते कोलतात! पण राईट-विंगर कुठलाही असो, त्याला राजकीय यश मिळाले की लिब्रांडू मीडिया आणि दाढ्या कुरवाळणारी जमत पिसाळते, हा ग्लोबल लोचा आहे..
टाईम्स ऑफ इस्रायलने त्यांना 'ultra-divisive' म्हटले. विरोधक 'लोकटंट्र को खट्रा'चा विलाप करताहेत. 'संविधान बचाव' ची बोंबाबोंब सुरूच आहे. तेही त्याच संविधानानुसार आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकून पंतप्रधान झाल्यावर! फक्त भारतातच असले चुतीये भरलेत, हा आपला गैरसमज आहे.. असो!
1988 मध्ये अमेरिकेतून इस्रायलला परतल्यानंतर, नेतन्याहू देशांतर्गत राजकारणात सक्रिय झाले व संसदेत लिकुड पक्षातून जागा जिंकून मंत्री बनले. नंतर ते पक्षाचे अध्यक्ष बनले आणि यित्झाक राबिनच्या हत्येनंतर 1996 च्या निवडणुकीत ते इस्रायलचे पहिले थेट निवडून आलेले पंतप्रधान बनले..
त्यानंतरचे बेंजमीन नेतन्याहू यांचे राजकीय करियर हे रोलर-कोस्टर राईड सारखे होते.
1988 : संसद आणि सरकारमध्ये प्रवेश, 1996 : पंतप्रधान निवडून आले, 1999 : निवडणुकीत पराभव, 2002-03 : जिंकले पण पंतप्रधान होऊ शकले नाहीत, परराष्ट्र मंत्री झाले..
2003-05 : गाझा पट्टीतून इस्रायलने माघार घेतल्याच्या निषेधार्थ मंत्रिपदाचा राजीनामा दिला, डिसेंबर 2005 : लिकुड पक्षाचे प्रमुख बनले, 2009 : पंतप्रधान म्हणून परत आले! 2013 : तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले!! 2015 : चौथ्यांदा पंतप्रधान बनले..
2020 : पाचवी टर्म, 2021 : कारस्थानी विरोधकांनी तिकडे 'मविआ' बनवली आणि नेतन्याहू यांना 'घरी बसवलं'. 2022 : नेतन्याहू रिटर्न्स!
गेली अनेक वर्षे विरोधक म्हणत असतात - 'युगाचा अंत', ज्यावर नेतन्याहू म्हणत 'मी पुन्हा येईन'! आजही विरोधकांना तोंडावर आपटवून नेतन्याहू पुन्हा आलेत..🙏

جاري تحميل الاقتراحات...