राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

7 تغريدة Feb 28, 2023
रस्त्यावर चालणारी एसटी 'ट्रॅक'वर!
मविआ सरकार आणि त्यात परिवहन मंत्री असलेल्या अनिल परब यांनी एसटीची वाट लावली होती. काही महिने चाललेला संप, सामान्य जनतेचे हाल, शेकडो कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, हजारो कर्मचारी बडतर्फ, त्याहून जास्त निलंबन, पण सरकार मधील कोणी भेटायला गेला नाही..
तीन महिन्यांपूर्वी राज्याच्या इतिहासातील सगळ्यात असंवेदनशील, पनवती सरकार गेलं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. तेंव्हा पासून स्वतः मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचारी संघटना आणि एसटी प्रशासनाशी चर्चा केल्या आहेत व त्यांच्या न्याय्य मागण्या सकारात्मक रिस्पॉन्स देत ऐकून घेतल्या..
परिणामी, एसटी कर्मचारी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले असून त्यामुळे एसटी मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. याच सर्वसामान्य नागरीकांनी लालपरीवर मोठा विश्वास दाखवला आहे. 21 ते 31 ऑक्टोबर या काळात सुमारे 4.95 कोटी प्रवाशांनी यातून प्रवास केला आहे..
या अकरा दिवसांत एसटीला सुमारे 275 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले असून संपूर्ण महिनाभरात एसटी महामंडळाने रेकॉर्ड 642 कोटी रूपयांच्या महसूलाचा टप्पा गाठला आहे! विशेष म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी एसटीने 56 (🔥) लाख किमीचा प्रवास करीत एकाच दिवशी 31 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे..
ज्येष्ठ नागरीकांबद्दल संवेदनशीलता दाखवत ‘अमृत ज्येष्ठ नागरीक’ योजना सुरु केली गेली. यात 75+ वयाच्या नागरीकांना एसटीच्या सर्व सेवांमधून प्रवास मोफत येतो. त्यांना मोफत असले, तरी त्यांच्या सोबत जाणाऱ्यांना तिकीट घ्यावेच लागते. त्यामुळे प्रवासीसंख्या आणि उत्पन्न दोन्हीही वाढले..
ऐन दिवाळीत, अर्थात 21 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान या योजनेतंर्गत 75 वर्षांवरील 26 लाख 55 हजार 138 नागरीकांनी प्रवास करत या सेवेचा लाभ घेतला (आणि सरकारला आशीर्वाद दिले)! संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात 80 लाख 38 हजार 91 ज्येष्ठ नागरीकांनी प्रवास केला..
वेगवेगळ्या आयडिया करून रोजच्यारोज राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या महा विनाश आघाडी वाल्यांनी एसटी महामंडळ खड्ड्यात घालण्याचा नियोजनबद्ध प्लॅन कसा बनवला होता, यावर सर्व आकडेवारी, लिंक्स आणि पुराव्यांनिशी एक वेगळा थ्रेडच येत्या काळात मी ट्विट करणार आहे. 'जय महाराष्ट्र'!🙏

جاري تحميل الاقتراحات...