राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

8 تغريدة Feb 28, 2023
गुरुजी..🙏
घरातले एखादे आजी-आजोबा आणि भिडे गुरुजींसारखी व्यक्ती, काहीच वेगळे नाहीत. हिंदुत्त्वाच्या कुटुंबातली ही सर्व जुनी खोडे आहेत..
या वयात यांच्याकडून काय शिकता येईल, काय घेता येईल इतकंच पाहावं, त्यांना शिकवायला जाणे किंवा त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवणे चूक. मुळातच या लोकांना राईट विंगर म्हणून पुन्हा त्यांच्याकडून MNC कर्मचाऱ्याप्रमाणे संतुलित वर्तनाची आणि वक्तव्यांची अपेक्षाच कशी काय करता?👇
त्यांनी त्यांच्यापुरतं सांगितलं,
तू कुंकू/टिकली लावून आली तरच बोल, त्यांनी विषय संपवला. गुरुजी उद्या किरण बेदींना भेटले तरी तुम्ही कुंकू लावा म्हणून सजेशन देऊन येतील, त्यांना काहीच अशक्य नाही. आपल्या घरातील आज्जी-आजोबा बोलतील तसे बिनधास्त सांगतील..👇
गुरुजींनी ज्या पत्रकाराला कुंकू/टिकली लावायला सांगितलं ती राईटविंगर असती तर अर्थातच तिने इशू न करता पटकन टिकली लावून मुलाखत घेतली असती, ती साम टीव्हीची पत्रकार आहे, तिने गुरुजींची अक्कल काढली ती डावी आहे. मग गुरुजींनी एखाद्या डाव्या व्यक्तीला डिवचले तर राग येण्यासारखे काय आहे?👇
राहतो प्रश्न अप्रत्यक्षपणे विधवा व्यक्तीबद्दल बोलल्याचा; मी पुन्हा सांगेन या उपमा फ्लो मध्ये दिल्या जातात. ही जुन्या पिढीतली माणसे आहेत, काही गोष्टी इग्नोर करा. रोज नामर्द, छक्का, हिजडा, बांगड्या भरा अशा वक्तव्यांनी वेढलेले असताना एखाद्या वक्तव्याने भावना दुखावू शकतात?👇
ते शब्द तुम्हाला किंवा प्रसन्न सारख्या पत्रकाराला कधी चुकीचे का वाटले नाहीत!!
संघाच्या अनेक लोकांना सावरकर आवडत नाहीत, अनेक सावरकर वाद्यांना आणि संघाच्या लोकांना भिडे गुरुजी आवडत नाहीत, अनेक हिंदुत्त्ववाद्यांना गोडसे आवडत नाहीत, ठीक आहे ना..कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र राहूया.
गुरुजींवर टीका करणाऱ्यांनी कधीही बिग्रेडी, बामेसेफींना धारेवर धरल्याचे आठवते? बामेसेफींवर तर मीडियात चर्चादेखील होत नाही. सॉफ्ट टार्गेट, तिथेच बोटे चालतात?
लागू दे जाळ, होऊ दे खर्च..गुरुजी 'आपले' आहेत म्हटल्यावर विषयच संपतो..🙏
- सुचिकांतजी वनारसे यांची 'मला पटलेली' FB पोस्ट.👇
My tuppence : जर अशा प्रकारे फक्त नवनवीन इश्यू बनवून वातावरण-निर्मिती करायची असेल, तर सगळ्यांनीच लक्षात ठेवा की मराठी एवढी सुंदर भाषा आहे की प्रत्येक वाक्याचे एकापेक्षा जास्त अर्थ निघू शकतात. जर इकडच्या लोकांनी ते चालू केलं, तर कितीला पडेल? परवडेल का बघा. शुभेच्छा..💐

جاري تحميل الاقتراحات...