महाराष्ट्र vs गुजरात - थ्रेड :
#EaseOfDoingBusiness
आक्टोबरच्या सुरूवातीला कांडला पोर्ट (बंदर) वर वार्षिक एंट्री पासेस काढण्यासाठी आमच्या टीमला पोलिस व्हेरीफिकेशन आणि NOC ची आवश्यकता होती. फ्युमिगेशनची कामे पोर्टवर मोठ्या प्रमाणात चालतात. त्यासाठी दरवर्षी हे पासेस लागतात.👇

पोर्टवरील टीमचे आणि पार्टनरचे पोलिस व्हेरीफिकेशन गांधीधाम मध्येच एका दिवसात पुर्ण झाले. मात्र यावेळी पोर्टच्या अधिकाऱ्यांनी कंपनीचे सर्व पार्टनर यांचे देखील पोलिस व्हेरीफिकेशन आणि NOC ते जिथे राहतात त्या ठिकाणचे किंवा लोकल गुजरातचे आवश्यक असल्याचे सांगितले..👇
आता मी राहतो पुण्यात सिंहगड रोडला तर म्हणून सिंहगड रोडच्या पोलिस स्टेशनला गेलो. तर त्यांनी online अर्ज करायला सांगितला, आणि सर्व प्रोसेस 20 दिवसात पुर्ण होईल असे सांगितले. हा पहिला धक्का होता..👇
कारण वीस दिवस पासेस साठी थांबणे शक्य नव्हते. मग त्यांनी मधला सुपरफास्ट (₹) मार्ग सांगितला. त्याप्रमाणे मी online अर्ज करून त्यांना प्रिंट आणून द्यायचे ठरले..👇
ऑफिसला येऊन online portal वर रजीस्टर करण्याचा प्रयत्न केला तो फसला (आजही होत नाहीय. आधार नंबर टाकल्यावर खालील प्रमाणे एरर येते.) म्हणून संबंधीत अधिकाऱ्याला कॅाल केला तर त्यांनी ई सेवा केंद्राच्या एजंटकडून करून घेण्याचा मोलाचा सल्ला दिला..👇
परत ॲानलाईन जवळच्या ई सेवा केंद्राचा पत्ता आणि मोबाईल मिळवला. कॅाल करून काय कागदपत्रे लागतील ही विचारणा केली तर उत्तर मिळाले “इथे येऊन बोला”. मग लॅपटॅाप घेऊनच ई सेवा केंद्रावर पोहोचलो. म्हटलं सांगा काय काय कागदपत्रे पाहीजे पोलिस NOC साठी..👇
त्याने सांगातल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे तिथेच त्याला मेल करून प्रिंट काढून जमा केले. त्या एजंटची फी जमा केल्यावर त्याने सांगितले मी तुम्हाला ओटीपी साठी कॅाल करेन तेव्हा ओटीपी सांगा.
ओके म्हणून तिथून ॲाफिसला परत आलो..👇
ओके म्हणून तिथून ॲाफिसला परत आलो..👇
संध्याकाळपर्यंत कॅाल काही आला नाही म्हणून कॅाल केला तर पठ्ठ्याने कॅाल काही घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी तेच, म्हणून पुन्हा केंद्रावर गेलो तर एजंट गायब. तोपर्यंत गांधीधाममध्ये काही तजवीज होते का यासाठी पार्टनरला बघायला सांगून ठेवले होते..👇
दुसऱ्या दिवशी सकाळी तेच, म्हणून पुन्हा केंद्रावर गेलो तर एजंट गायब. तोपर्यंत गांधीधाममध्ये काही तजवीज होते का यासाठी पार्टनरला बघायला सांगून ठेवले होते..👇
एकंदरीत पुढील कंटाळवाणा घटनाक्रम इथे मांडण्याऐवजी शेवट सांगतो. ते काम एका व्हिडीओ कॅालवर गुजरात पोलीसांकडून दुसऱ्या दिवशी पुर्ण झाले आणि माझी मपोच्या जाचातून सुटका झाली..👇
आजही आम्ही जेएनपीटीला जेवढा व्यवसाय करतोय त्याच्या तीन पट उत्पन्न पुण्यात बसूनही गुजरात राज्यातून आम्हाला मिळते आहे. मै सही मायने में पिछले दस साल से गुजरात का ही नमक खा रहा हुं!
साभार : राहुलजी प्रेमराज भोसले यांची FB पोस्ट.
साभार : राहुलजी प्रेमराज भोसले यांची FB पोस्ट.
جاري تحميل الاقتراحات...