नमस्कार! गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी मी ट्विटर वर आलो. एक संपूर्ण वर्ष तुम्ही मला सहन केलंत! धन्यवाद..🙏
तसं अनेकांसाठी माझं हे एक वर्ष म्हणजे 'नया है वह' म्हणत सहज इग्नोर करण्याएवढा छोटा काळ आहे, पण माझ्यासाठी मात्र हे ट्विटर वरील एक वर्ष खूप काही शिकवून गेलं..👇
तसं अनेकांसाठी माझं हे एक वर्ष म्हणजे 'नया है वह' म्हणत सहज इग्नोर करण्याएवढा छोटा काळ आहे, पण माझ्यासाठी मात्र हे ट्विटर वरील एक वर्ष खूप काही शिकवून गेलं..👇
अजूनही मला इकडचा म्हणावा तसा मेळ लागलेला नाहीये हे मान्य करण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही. वर्षानुवर्षे इकडे वावर आणि दबदबा असलेल्या अनेक सिनियर्स ना बघून मी आजही शिकतोय. रोज नवनवीन गोष्टी शिकत असतानाच, वेळ मिळेल तसं येतो आणि जमतं तसं तोडक्या-मोडक्या भाषेत लिहून जातो..👇
बाकी कमाल तर मला विरोधकांची वाटते. आपली लोकं सांभाळून घेत असली, तरी खरं प्रोत्साहन तेच मला देत असतात. त्यांची शिवीगाळ, आई-बहिण बाप काढणे, डीएम वरील धमक्या यांनी मला मोटिव्हेशन मिळते. यातही यांच्या धमक्या पण वेगळ्याच लेव्हलच्या असतात. FB वर पत्ता दे, नंबर दे पर्यंत होतं.. इकडे..👇
इकडे ट्विटर वर आलेल्या सर्व धमक्यांपैकी मला सर्वात जास्त आवडलेली धमकी अशी होती : 'जिथं भेटशील तिकडं तुझी बोटंच ठेचणार, मग बघतो कसा टाईप करतोस!!'😂 दिवसभराचा कामाचा व्याप सांभाळून इकडे आल्यावर असा जो 'कॉमिक रिलीफ' मिळतो, तीच तर आपली खरी 'कमाई' असते..😬
हे सगळं चालूच राहणार..👇
हे सगळं चालूच राहणार..👇
जसा मी कामांची कॉन्ट्रॅक्ट, एखादे सदस्यत्व, एखादं प्रतिष्ठित पद, कुठल्या तरी कोट्यातून म्हाडाचा फ्लॅट अशा आणि तत्सम गोष्टींमधून स्वतःचं भलं करून घेण्यासाठी लिहीत असतो, तसं ट्रोल करणाऱ्यांनीही वडा-पाव, नगरसेवकाचे नाव लिहिलेला टीशर्ट-टोपी अशा गोष्टींसाठी ट्रोल केलं तर ठीकच आहे..👇
असो! वर्षभरात 23 हजार फॉलोवर्स कसे झाले समजलंच नाही. तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो..🙏
ट्विटर च्या दुनियेत नवीन आहे, आजच वर्ष पूर्ण होत आहे - तेंव्हा, या काळात कळत-नकळत माझं काही चुकलं असेल, 'आपल्या' पैकी कोणाला वाईट वाटलं असेल, तर आय एम सॉरी.
फॉलोवर्स देवो भव: 🙏
ट्विटर च्या दुनियेत नवीन आहे, आजच वर्ष पूर्ण होत आहे - तेंव्हा, या काळात कळत-नकळत माझं काही चुकलं असेल, 'आपल्या' पैकी कोणाला वाईट वाटलं असेल, तर आय एम सॉरी.
फॉलोवर्स देवो भव: 🙏
جاري تحميل الاقتراحات...