जय हिंद! अभिनंदन ISRO!! इसरो ने मध्यरात्री आपल्या नॉटी बॉय म्हणजेच LVM3 M2 या सगळ्यात शक्तिशाली रॉकेटने वन-वेब या लंडन स्थित कंपनीचे 36 उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. या सर्व 36 उपग्रहांच एकत्रित वजन तब्बल 5796 किलो इतकं होतं..👇
हे उपग्रह इसरो च्या रॉकेट ने पृथ्वीपासून 1200 किलोमीटर उंचीवर त्यांच्या निर्धारित कक्षेत स्थापन केले आहेत. या रॉकेटची क्षमता Geo Transfer Orbit (GTO) मध्ये 4000 किलोग्रॅम तर Low Earth Orbit (LEO) मध्ये 8000 किलोग्रॅम उपग्रह प्रक्षेपित करण्याची आहे..👇
वन-वेब ही कंपनी तब्बल 648 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार असून त्यातून ब्रॉडबँड सेवा जगभर देणार आहे. त्यापैकी जवळपास 72 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा करार भारताच्या इसरोची व्यवसायिक शाखा न्यू-स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL)शी झालेला आहे..👇
व्यावसायिक रॉकेट उड्डाण क्षेत्रात आज भारताने खऱ्या अर्थाने पाऊल ठेवले असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. आजवर भारताने कोणत्याही देशासाठी प्रक्षेपित केलेले उपग्रह हे PSLV रॉकेट ने केलेले होते. पण पहिल्यांदाच भारताने या शक्तिशाली रॉकेटचा वापर व्यावसायिक प्रक्षेपणासाठी केला आहे..👇
मोदी सरकार आणि ISRO च्या सर्व वैज्ञानिक, संशोधक, कामगार सर्वांचे या यशस्वी उड्डाणाबद्दल खूप अभिनंदन आणि पुढल्या उड्डाणांसाठी शुभेच्छा..💐
अशा गोष्टींवर सरकार पैसे खर्चच का करते, असं म्हणाऱ्यांसाठी : या उड्डाणातून 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्ती उत्पन्न ISRO ला मिळणार आहे!!
अशा गोष्टींवर सरकार पैसे खर्चच का करते, असं म्हणाऱ्यांसाठी : या उड्डाणातून 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्ती उत्पन्न ISRO ला मिळणार आहे!!
جاري تحميل الاقتراحات...