Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

22 تغريدة 30 قراءة Feb 22, 2023
अभ्यासपूर्ण लेख लिहीण्याचा प्रयत्न केलास पण गर्वाने “सत्य उशिरा येत पण पद्धतशीर घोडा लावून जात” - ही टिप्पणी करुन स्वतःचा विचारदळिद्रीपणा सिद्ध करायला विसरला नाहीस.
असो, बघ आता ‘घोडे कसे लागतात ते’😋
आणि हो, #Thread: छत्रपती शिवाजी महाराज हे ‘गोब्राह्मणप्रतिपालकंच’!
१/२२
हे माझे कालचे ट्वीट. ज्यामुळे तू आणि तुझी टोळी सैरभैर झाली आहे.
एक साध्या प्रश्नाचे उत्तर दे - या ट्वीट मध्ये मी कुठेही असे म्हंटले आहे का की 'छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हणत आहेत?
नाही ना? मग🤷🏻‍♂️ कशाला आभाळ हेपलताय🤦🏻‍♂️
असो, मुद्याकडे येऊयात.
२/२२
शिचसा ३, ले.५३४ आणि त्याचा सारांश👇🏼
मोरेश्वर गोसावी, म्हणजेच महासाधू मोरया गोसावी यांचे वंशज. चिंचवडकर देव यांचे महाबली शहाजीराजे यांच्या काळापासून घरोब्याचे संबंध होते.
खालील पत्र हे शिवाजीराजे यांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना लिहीले गेले होते.
३/२२
पत्रावर महाराजांची ‘प्रतिपच्चंद्र’ ही मुद्रा आहे.
या पत्रातं महाराज पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना सांगत आहेत की मोरेश्वर गोसावींनी त्यांना पत्र लिहून “माहाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती” म्हणत गाईंच्या प्रतिपाळासाठी जमीन इनाम मागितली आहे. तरी तुम्ही मोरेश्वर
४/२२
…गोसावी यांना ती जमीन द्यावी. महाराज आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात “गोसावियास येच जरियाची तसवीस नेदणे”.
गायींचा प्रतिपाळ करण्यासाठी महाराजांनी जमीन ही दिली आणि मोरेश्वर गोसावी यांना त्रास न होऊ देणे अशी ताकीद ही आपल्या अधिकाऱ्यांना दिली.
याचा काय अर्थ काढायचा?
५/२२
पूर्ण शिवचरित्र साहित्य खंड ३ वाचलंस? बरं जाऊदेत. या पत्राच्या पुढची ३-४ पत्रे तरी वाचलीस का?
असो, अर्धवटराव. हा बघ, शिचसा च्या त्याच खंडातील ले.५३७.
मोरेश्वर गोसावी यांना मोरगाव जवळील जी जमीन दिली त्यावरचा कर ही महाराजांनी माफ केला.
६/२२
तुम्हाला महाराजांचे “ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पाहतो” हे वाक्य खूप आवडतं ना, मग आता हे महाराजांचेच हे पण वाक्य नीट वाच.
“…ब्राह्मणाचे वाटे नव जाणे…”
गायींचा प्रतिपाळ करण्यासाठी जमीनी इनाम देऊन त्यावरचा कर ही माफ करुन तसेच आपल्या अधिकाऱ्यांना…
७/२२
…“गोसावियास येच जरियाची तसवीस नेदणे” व “…ब्राह्मणाचे वाटे नव जाणे…” अशा ताकीदी देऊन, छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४८ सालीच त्यांच्यासाठी वापरलेली ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ ही बिरुदावली सार्थक ठरवलेली.
आता अजून काही उदाहरणे बघूयात.
८/२२
🔸शिवभारत हा ग्रंथ महाराजांच्या चाकरीत असणाऱ्या कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांनी महाराज असतानाच रचला.
शिवभारतातील पहिल्याच अध्यायातील १५वा व १६वा श्लोक आणि त्याचा अर्थ वाच.
‘देव ब्राह्मण आणि गाई यांचा त्राता’ कोण? तर छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले!
९/२२
🔸छत्रपती संभाजी महाराज यांनी रचलेला ‘बुधभूषण’ हा ग्रंथ तर सर्वश्रुत आहे.
बुधभूषण ग्रंथाच्या २ ऱ्या अध्यायातील ५५४ व्या श्लोकात धर्मवीर संभाजीराजे क्षत्रियांची कर्तव्ये सांगतात.
‘गो-ब्राह्मणपालन’ हे क्षत्रियांचे एक कर्तव्य आहे - असे धर्मवीर संभाजीराजेंनी सांगितले आहे.
१०/२२
🔸छत्रपती संभाजी महाराज यांचे दानपत्र
या दानपत्रात, धर्मवीर संभाजीराजे आपल्या पणजोबांना (मालोजीराजे भासले) यांना ‘देवब्राह्मणप्रतिपालक’ असं संबोधतात.
आता संभाजीराजेंनी तर आपल्या पणजोबांना बघितलेलं नव्हतं. मग त्यांच्याविषयी शंभूराजेंना कोणाकडून कळलं असेल?
११/२२
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांनी बुधभूषण मध्ये रचलेला श्लोक असो वा आपल्या पणजोबांसाठी वापरलेली बिरुदावली - याची शिकवण त्यांना राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांच्याचकडून मिळाली असणार यात संशय घेण्याची जागाच नाहीये!
१२/२२
🔸हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्रात केलेला उल्लेख -
“शाहण्णव कुलीचे मराठियांचा उद्धार केला. सिंहसनारुढ होऊन छत्र धरुन छत्रपति म्हणविलें. धर्मोद्धार करुन देवब्राह्मण संस्थानीं स्थापून यजन याजनादि वर्णविभागें चालविली तस्करादी…
१३/
…आन्याई यांचे नांव राज्यांत नाहींसें केलें. देश-दुर्गादि सैन्याचे बंद नवेच निर्माण करुन येकरुप अव्याहत शासन चालविलें. केवळ नूतन सृष्टिच निर्माण केली”.
आणि हो, मराठ्यांच्या इतिहासात एकंच ‘हुकूमतपनाह’ झाला - रामचंद्रपंत.
१४/२२
देव-धर्म-गोब्राह्मण। करावया सरंक्षण।
हृदयस्थ झाला नारायण। प्रेरणा केली।
- सद्गुरु समर्थ रामदास स्वामी
समर्थांच्या बद्दल तुझ्या मनात किती ही राग/अनादर असला तरी ‘प्रबोधनकार ठाकरे/बाळासाहेब ठाकरे’ यांचा शिवसैनिक या विषयातून पळ नाही काढू शकत.
कारण👇🏼
१५/२२
🔸छत्रपती राजाराम महाराज आपल्या अनेक पत्रांत शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा उल्लेख ‘देवा ब्राह्मणांचे राज्य’ असा करतात.
त्यातील काही उदाहरणे खाली दिलेली आहेत.
संदर्भः
१) शिवचरित्र साहित्य खंड ३, ले.४७८
२) सनदपत्रांतील माहिती, पृ.१३७
१६/२२
🔸दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांचे ८ सप्टेंबर, १६७१ रोजीचे पत्र.
नीट वाच.
आणि अजून एक, ज्या इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पाहतो’ हे पत्र प्रकाशित केलं, त्यांनीच हे👇🏼ही पत्र प्रकाशित केले आहे.
१७/२२
राजवाडे खंड ८, ले.३१ - जिवाजी विनायक या ‘हरामखोरांस’ लिहीलेल्या पत्राबद्दल मी कधीच मौन बाळगलेलं नाही.
राजवाडे खंड ८, ले.२४ खोटे आणि राजवाडे खंड ८, ले.३१ खरे - असे बाष्कळ तर्क तुमच्यासारख्यांनाच झेपतात!
१८/२२
बाबासाहेब पुरंदरेंवर घसरल्याशिवाय यांना जेवण जात नाही.
का रे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिका, ज्या माणसाच्या बाळासाहेब पाया पडायचे त्यांच्याबद्दल बोलताना लाज नाही का वाटत?
तुमचे उद्धव ठाकरे सुद्धा मानायचे बाबासाहेब पुरंदरेंना. स्वतःच्या मालकाचा तरी मान ठेव रे🤷🏻‍♂️
१९/२२
अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर ‘हवालदार’ याच्यासारख्या स्वराज्याच्या शत्रूंना महाराजांनी यमसदनी धाडले - कारण गद्दारांची तीच शिक्षा आहे.
कृष्णाजी भास्करबद्दल दिवसरात्र चर्चा करताना तुम्ही लोक खानाला जावळीत आणणाऱ्या पंताजी काका (गोपीनाथ पंताजी ‘कुलकर्णी’) यांना विसरता.
२०/२२
काहीही असो, पण तुझे कौतुक करणे गरजेचे आहे. अनेक समकालीन संदर्भ वापरुन अभ्यासू वृत्ती दाखवलीस.
याच खातर एक चॅलेंज घेणार का?
कृष्णाजी भास्कर वाईचा ‘कुलकर्णी’ होता हे समकालीन पुराव्यांनी सिद्ध करुन दाखव.
(टीपः तो देशस्थ ब्राह्मण होता यात मला काही ही शंका नाही)
२१/२२
बाकी राज्याभिषेकाबद्दल सविस्तर बोलूंच या.
काय आहे ना दिवाळी आहे. घरची कामे पण असतात. असो.
तुला आणि तुझ्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🎊
२२/२२

جاري تحميل الاقتراحات...