राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

5 تغريدة Feb 28, 2023
कल्याणी M4 (थ्रेड) -
अभिनस्पद!! स्वदेशी बनावटीच्या कल्याणी M4 आर्मर्ड प्लाटून कॅरिअरच्या एकूण 16 तुकड्या भारतीय लष्कराने UN शांतता मोहिमेसाठी तैनात केल्या आहेत..👇
कल्याणी M4 ही क्विक रिऍक्शन फायटिंग हेवी व्हेईकल आहे, जी भारत फोर्ज लिमिटेडने भारतातच विकसित आणि उत्पादन केलेली आहे. ही व्हेईकल पूर्ण लढाऊ गियरमधील इन्फंट्री प्लाटून घेऊन जाऊ शकते व ग्रेनेड हल्ले आणि जमिनीत पेरलेल्या स्फोटकांपासून आतील जवानांना अभूतपूर्व संरक्षण प्रदान करते..👇
कल्याणी M4 ने अतिशय खडतर वातावरणात व वेगवेगळ्या भूप्रदेशात अत्यंत यशस्वीपणे व परिणामकारक परफॉर्मन्स दिला आहे. लेह आणि लडाखच्या अतिथंड प्रदेशात आणि कच्छ च्या रणच्या वाळवंटात कल्याणी M4 तेवढीच सक्षमपणे काम करू शकते..👇
अलीकडेच, भारतीय सेने ने भारत-चीन सीमेवरील तणावादरम्यान कल्याणी M4 खरेदी करून आपल्या ताफ्यात समावेश केला होता.
तीन चाकाखाली प्रत्येकी 10 किलो टीएनटी स्फोटके आणि एका बाजूला 50 किलो वजनाचा आयईडी स्फोट झाले तरी कल्याणी M4 आतील जवानांना सुरक्षित ठेवते..!
जय हिंद!!
कल्याणी M4 चा Combat Radius 800 किलोमीटर असल्याने कमीतकमी वेळेत आणि कोणत्याही भूप्रदेशात सैन्याची लढाऊ शक्ती काही पटींने वाढवू शकते. मेड-इन-इंडिया कल्याणी M4 हे आज जगातील सर्वोत्कृष्ट मोबिलिटी प्लॅटफॉर्म मानले जात आहे!!
जय हिंद!

جاري تحميل الاقتراحات...