राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

8 تغريدة Feb 28, 2023
एका कट्टर मोदी-विरोधकाचा बोचरा थ्रेड :
कालच वाचले की प्राचीन सुर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले गुजरात मधील मोढेरा हे सुर्यदेवतेकडून आपल्याला मिळणाऱ्या ऊर्जेवर अर्थात सौरऊर्जेवर 24x7 चालणारे भारतातील पहिले गाव बनले आहे..👇
बरं!! मग, आधी या मंदिराची थोडी माहिती घेऊया, त्यानंतर मुद्द्यात हात घालतो!
स्कंद पुराणानुसार मोढेरा जवळील भागाला रामायण काळी 'धर्मारण्य' असे संबोधले जायचे. रावणाचा वध करून परतलेल्या श्रीरामाने गुरू वसिष्ठाना ब्रह्म हत्येच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी काय करावे असे विचारले..👇
गुरू वसिष्ठांनी धर्मारण्यात जाऊन यज्ञ करण्याचा सल्ला दिला. प्रभू श्रीराम आणि सीता यांनी या ठिकाणाला भेट देऊन यज्ञ केला आणि मोढेरक या गावाची स्थापना केली. याचा गावाला पुढे मोढेरा असे म्हटले जाऊ लागले आणि सुर्यमंदिराबाहेर असणाऱ्या कुंडाला राम कुंड म्हटले जाते..👇
इसवी सन 1024-25 च्या सुमारास गझनीच्या महमूदचे आक्रमण चालुक्य वंशीय राजा भीम पहिला याने मोढेरा येथे युद्ध करून परतवून लावले होते. इतिहासकारांचे असे मत आहे की या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ मोढेरा येथे सूर्यमंदिर उभारण्यात आले..👇
प्रवेश करताच दिसणाऱ्या रामकुंडाची रचना 'वाव' किंवा पायऱ्यानी बनलेल्या विहीरीप्रमाणे असल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण भासते. या पायऱ्यावर विविध देवतांची 108 छोटी मंदिरे आहेत..👇
सभामंडपाला चारही बाजूनी प्रवेशद्वारे आहेत. सभागृहाच्या छताला आधार देणारे खांब दोन प्रकारचे आहेत. बाहेरील बाजूस असणारे छोटे खांब आणि जमिनीपासून छतापर्यंत असणारे मोठे खांब..
गूढ मंडपाच्या बाहेरील भिंती सूर्याच्या 12 प्रतिमांनी तसेच विश्वकर्मा, अग्नी, गणेश, सरस्वती, अष्ट दिक्पाल यांच्या मूर्तींनी सजवलेल्या आहेत. गूढ मंडपास तीन बाजूनी प्रत्येकी एक खिडकी आहे. विशिष्ट दिवशी या खिडक्यातून सूर्यकिरण प्रवेश करत आणि मध्यभागी असणाऱ्या सूर्य मूर्तीवर पडत..🙏
तर या अशा पुष्पावती नदीच्या काठावर वसलेल्या या सुंदर सुर्यमंदिराला, ऐतिहासिक व पौराणिक महत्व असलेल्या मोढेराला त्याच सुर्यदेवतेकडून फ्री मध्ये ऊर्जा घेऊन गावभर लाईटी लावल्या, यात मोदींचा काय रोल? यात मोदींनी काय केलं? बोला ना भक्ताडांनो? आले मोठ्ठे शाने क्रेडिट घ्यायला..😡

جاري تحميل الاقتراحات...