राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

18 تغريدة Feb 28, 2023
मातोश्री FSI प्रकरण (थ्रेड) -
आज नारायण राणे साहेबांनी पीसी मध्ये मातोश्री च्या FSI चा मुद्दा मांडला होता. याआधी देवेंद्रजी फडणवीस यांनीही हा विषय 15 मे 2022 च्या त्यांच्या जाहीर सभेत हा विषय मांडला होता. काय आहे हा विषय बघा - 👇
ऑक्टोबर 2016 मध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांनी वांद्रे पूर्वेकडील कलानगर सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये 5200 चौरस फुटांची मालमत्ता घेतली अन त्या जागेत तळघर, स्टिल्ट व वर 7 मजल्यांची एकूण आठ मजली इमारत बांधण्याचे ठरवले..👇
पण BMC ने उद्धव यांच्या वांद्रे येथे नियम मोडून नवीन घर बांधण्याच्या बेकायदेशीर योजनेला परवानगी नाकारली. नवीन इमारतीतील अतिरिक्त बांधकामासाठी हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) वापरण्याची परवानगी ठाकरेंनी मागितली होती, ती परवानगी महापालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाने फेटाळली..👇
मग हे प्रकरण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील नगरविकास (यूडी) विभागाकडे पाठवण्यात आले. त्यावेळी नगरविकास विभागानेही त्या मालमत्तेवर टीडीआर नोंद करण्याची परवानगी नाकारल्याने वरच्या मजल्यांचे बांधकाम रखडले!!👇
TDR भूविकासकांना पुनर्विकास प्रकल्पांमध्ये परवानगी असलेल्या मजल्यांपेक्षा जास्त बांधकामाला परवानगी देतो. पण जेव्हा विकासक किंवा जमीनमालक सार्वजनिक सुविधांसाठी बांधकाम करतात, झोपडपट्टी पुनर्विकास किंवा प्रकल्प-बाधित लोकांचे विनामूल्य पुनर्वसन करतात तेव्हा अशी TDR लागू होतो..👇
असा टीडीआर दुसर्‍या प्लॉटवर वापरण्यासाठी खाजगीरित्या व्यवहार करून ऊद्धव ठाकरेंनी त्याच वर्षी मे महिन्यात लोअर परळमधील एका झोपडपट्टी विकासकाकडून 2617 चौरस फूट किमतीचा टीडीआर खरेदी केला!👇
तो टीडीआर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री 2 या नवीन घरावरील अतिरिक्त मजले बांधण्यासाठी वापरायचा गेम खेळला. त्या मालमत्तेवर टीडीआर वापरण्यास परवानगी मिळेलच असा विचार करून ठाकरेंनी एकूण 10500 चौरस फुटांपर्यंत बांधकाम करण्याची योजना आखली आणि बांधकामाला सुरुवात केली..👇
पाचव्या मजल्यापर्यंत बांधकाम झाले अन बिल्डिंग प्रपोजल विभागाने टीडीआरच्या वापराबाबत 23 ऑगस्ट 2017 रोजी जारी केलेल्या नागरी विकास प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्लॉटवर टीडीआर वापरण्यास परवानगी नाही असा निर्णय दिला..👇
त्यात 16 नोव्हेंबर 2016 रोजी UD विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार TDR चा वापर संबंधित भूखंडांसमोरील रस्त्याच्या रुंदीशी जोडला होता. 9 मीटर किंवा कमी रुंद असलेल्या व BMC कायद्यानुसार चिन्हांकित रस्त्यांवरील भूखंडांवर टीडीआर लोड करण्यास प्रतिबंधित असल्याचे या आदेशात होते..👇
तत्कालीन BMC आयुक्त व उद्धव ठाकरे यांचे खास असलेले अजोय मेहता यांनीच 23 ऑगस्ट 2017 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात खाजगी ले-आऊट रस्ते, अंतर्गत रस्ते किंवा खाजगी प्रवेशाचा हक्क असलेल्या भूखंडांवर TDR वापरण्यास मनाई केली होती..👇
अर्थात, अतिरिक्त बांधकाम अधिकाराचा लाभ घेण्यासाठी भूखंड सार्वजनिक रस्त्यावरून किंवा बीएमसीच्या रस्त्यावरून थेट प्रवेशयोग्य असले पाहिजेत हा नियम होता. ऊद्धव ठाकरे यांच्या प्लॉटला खाजगी लेआउटमध्ये नियोजित 9.15 मीटर रुंद अंतर्गत रस्ता आहे, पण हा सार्वजनिक किंवा BMCचा रस्ता नाही..👇
बांधकाम अर्ध्यावर अडकल्यावर ठाकरे पॅनिक झाले. त्यांनी अजय मेहता यांना पत्र पाठवून टीडीआर ला परवानगी देण्यासाठी दबाव टाकला. 16 सप्टेंबर रोजी अजोय मेहता यांनी प्रधान सचिव (UD-1) डॉ.नितीन करीर यांना पत्र लिहून अशा TDR ला परवानगी दिली जाऊ शकते की नाही याबद्दल स्पष्टीकरण मागितले..👇
प्रकरण नगरविकास खात्याचे सचिव नितिन करीर यांच्याकड़े आले अन त्या खात्याचे मंत्री होते फडणवीस! देवेंद्रजीनी मग ठाकरेंना दया दाखवत आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून बिकेसी मधील भूखंडामार्गे मातोश्रीच्या प्रवेशाला परवानगी द्या, असे आदेश जानेवारी 2016 मध्ये MMRDA अधिकाऱ्यांना दिले..👇
त्यावेळी MMRDA अध्यक्ष ही देवेंद्रजीच होते! DF ने मैत्रीला जागून वाढ़ीव एफएसआई देऊन टीडीआर वापरण्याची परवानगी दिली.
पण.... ही स्टोरी दिसते तेवढी सरळ आणि सोपी नाहीये..👇
घर बांधण्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी देवेंद्रजी यांनी मदत जरूर केली, पण जो लोवर-परेल च्या झोपडपट्टीचा टीडीआर मातोश्रीसाठी वापरला आहे तो कायदेशीर की बेकायदेशीर यावर DF अजून गप्प आहेत..👇
देवेंद्र फडणवीस व कारसेवा यावरून गरळ ओकणाऱ्या उद्धव ठाकरे यांना 15 मे 2022 च्या भाषणात DF अजून एक गोष्ट सुचकपणे सांगून गेले : 'सामान्यांचा FSI-1 असतो, तरी माझा FSI-1.5 होता, अन 'बाबरी' पाडली तेंव्हा FSI-2 होता!!' 👇
याचा अर्थ देवेंद्रजींनी टीडीआर वापरायला परवानगी देताना सामान्यांसाठी एक चा FSI असूनही 1.5 दिला, पण प्रत्यक्षात उद्धवजींनी मातोश्री 2 साठी 2.5 वापरलाय! तसं असल्यास मातोश्री-2 उभी तर राहिली आहे, पण ती कायद्याच्या कसोटीवर अनधिकृत ठरू शकते.. अगदी जसं 'बाबरी' हे पण एक अतिक्रमण होतं!👇
आज नारायण राणे साहेब बोललेत की तुम्ही माझ्या घरामागे लागला आहात, मी तुमच्या घरामागे लागणार!
इंटरेस्टिंग टाइम्स..😊

جاري تحميل الاقتراحات...