Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

11 تغريدة 7 قراءة Feb 22, 2023
#Thread: श्रीप्रतापदुर्गामाहात्म्यम्
‘ज्वलज्ज्वलंतेजस संभाजीराजा’ लिहीताना डॉ.सदाशिव शिवदे ह्यांना १८ व्या शतकात लिहीलेली 'श्रीप्रतापदुर्गामाहात्म्यम्' ही पोथी सापडली.
ही पोथी पुण्यश्लोक शाहूछत्रपतींच्या थोरल्या महाराणी सकवारबाई यांच्या सांगण्यावरून लिहिली गेली.
१/११
त्यांनी मूळ संस्कृत पोथीचा मराठी भाषेत अनुवाद करून 'किल्ले प्रतापगड निवासिनी श्रीप्रतापदुर्गामाहात्म्यम्' - ह्या नावाचे पुस्तक ही प्रकाशित केले.
हे अनुवादीत पुस्तक डॉ.शिवदे यांनी पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले यांना समर्पित केले होते.
२/११
श्रीप्रतापदुर्गामाहात्म्यम् या पोथीचे लेखन रामचंद्र दीक्षित यांनी केलेले असून १ ऑक्टोबर, १७४९ हा या पोथीचा समाप्तिकाल आहे.
या पोथीत रामचंद्र दीक्षित आणि महाराणी सकवारबाई (पुण्यश्लोक शाहूछत्रपती ह्यांच्या अर्धांगिनी) यांच्यातील संवाद नमूद केला आहे.
३/११
या साधनात अनेक महत्त्वाच्या समकालीन घटना सापडतात.
श्रीप्रतापदुर्गामाहात्म्यम् या पोथीत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी - फाल्गुन वद्य तृतीया नमूद केलेली आहे. ही तिथी इतरही समकालीन साधने जसे की शिवभारत, जेधे शकावली आदि मध्ये सापडते.
४/११
या सोबतंच अफजल खान वधाची अचूक तिथी देखील या पोथीत नमूद केलेली आहे.
शिवछत्रपतींची आई प्रतापदुर्गेवर असलेल्या श्रद्धेबद्दल ही या पोथीत नमूद केलेले आहे.
औरंगजेबाचे अचूक वर्णन ही या पोथीत वाचायला मिळते.
या सगळ्यावरुन या पोथीची विश्वासहर्ता सिद्ध होते.
५/११
'छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामींनी अनुग्रह दिला होता' - हे या साधनात नमूद केलेलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामींनी अनुग्रह दिला असावा ही शक्यता शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे ही नाकारत नाहीत.
६/११
मेहेंदळे ह्यांच्या मते शिवछत्रपतींना अनुग्रह देणारे समर्थ रामदासस्वामी हे काही पहिले नव्हते.
पोथीतील 'जरंडाख्यान' या अध्यायात महाराणी सकवारबाईंनी रामचंद्र दीक्षितांना जरंडा क्षेत्राबद्दल विचारले. त्यावर दीक्षितांनी महाराणीसाहेबांना जरंडामाहात्म्य सांगितले.
७/११
दीक्षितांनी महाराणी सकवारबाईंना त्रेता युगापासून कलियुगापर्यंत जरंडा क्षेत्राची महती सांगितली. कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी राममंत्रोपदेश दिला हे पण सांगितलं.
मूळ संस्कृत श्लोकासह त्याचा अर्थ खाली दिला आहे.
८/११
शिवनृपतींनी मोरोपंतांना हिमालयात पाठवून नेपाळमधील त्रिशूलगंडकी, श्वेतगंडकी आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमातल्या शिळेतून भवानीदेवीची ही मूर्ती घडवून घेतली.
या मूर्तिची स्थापना वेदशास्त्रसंपन्न विश्वनाथ भट-हडप यांनी मोरोपंतांच्या हस्ते करवली.
९/११
आज ललिता पंचमी. आज सकाळी प्रतापगडावर शिवरायांचा पालखी सोहळा होतो. भवानीदेवीच्या मंदिरापासून महाराजांची पालखी निघते.
काल रात्री प्रतापगडावर डोळ्यांचे पारणे फेडणारा मशाल महोत्सव असतो. त्यानंतर देवीच्या मंदिरात गोंधळ व जागरण सोहळा होतो. अद्भुत सोहळा असतो.
१०/११
शिवछत्रपतींची आई भवानी वर अपार श्रद्धा होती. प्रतापगडावर प्रतापदुर्गेचा उत्सव आजही जल्लोषात साजरा केला जातो व त्याची सगळी व्यवस्था सातारकर भोसले यांच्याकडून केली जाते.
🚩जय भवानी, जय शिवराय🚩
११/११

جاري تحميل الاقتراحات...