Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

4 تغريدة Feb 22, 2023
फेब्रुवारी २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आणि केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांनी उरण येथे या भव्य शिवसमर्थ स्मारकाचे उद्घाटन केले होते.
१/४
त्या वेळी तत्कालीन शिवसेनेतील बडे नेते ही उपस्थित होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी ज्या त्रैलोक्यवंद्य गुरु-शिष्याच्या जोडीचे कौतुक केले त्यांचे रायगड आणि कोकण पट्ट्यात लाखों अनुयायी आहेत आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सदैव झालेला आहे.
२/४
स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळी पण ब्रिगेड या समाजकंटक चळवळीने राडे करायचा प्रयत्न केला होता. परंतु धर्माधिकारी यांच्या समर्थ बैठकीतील लाखों दासभक्तांनी तसं होऊ दिलं नाही. हीच आहे एकतेची शक्ती.
उद्धव ठाकरे ही अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासमोर नतमस्तक झालेले आहेत.
३/४
एकेकाळी समर्थांविषयी आस्था असणाऱ्या (?) उद्धव ठाकरेंनी आज मात्र ब्रिगेड शी हात मिळवणी केलेली आहे.
समर्थांना हिणवणाऱ्या ब्रिगेड शी मैत्री करुन उद्धव ठाकरेंनी रायगड आणि कोकणातील लाखों दासभक्त आपल्यापासून दूर केले आहेत.
४/४

جاري تحميل الاقتراحات...