राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

10 تغريدة Feb 28, 2023
संघी कावा - (थ्रेड) :
हल्लीच RSS चे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी इमाम इलियासी यांची भेट घेतली. याभेटी नंतरच सरसंघचालक मोहनजी भागवत यांना इलियासी राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी म्हणाले होते..👇
गेल्या महिन्यात माजी निवडणूक आयुक्त कुरेशी, दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग, रालोद उपाध्यक्ष शहीद सिद्दीकी, अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू जमीर शाह, व्यावसायिक सईद शेरवानी यांसारख्या मुस्लिम समाजातील डजनभर प्रतिष्ठित लोकांचीही भेट त्यांनी घेतली होती..👇
इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची आणि त्याआधी मुस्लिम समाजातील इतर प्रतिष्ठित लोकांची भेट घेतल्यानंतर विरोधकांनी आणि काही 'आपल्या' लोकांनी (अपेक्षेनुसार) मोहनजी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
पण, (नेहमीप्रमाणे) त्यावर संघाने प्रतिक्रिया द्यायचे टाळले..👇
या सर्व भेटींचे परिणाम आता दिसू लागले आहेत. PFI वर आधी देशव्यापी कारवाई झाली, आणि आता बंदी टाकली असली तरी देशात मात्र सगळीकडे शांतता आहे. नुसतीच शांतता आहे असं नाही, तर सरकारच्या विरोधात बोंबाबोंब करायला मुस्लिम समाजाचं नेतृत्व कोण करणार यावरूनही प्रचंड गोंधळ निर्माण झालाय..👇
या भेटींनंतर इमाम संघटना आणि प्रतिष्ठित मुस्लिम लोकांनी PFI शी सरळ दोन हात लांबच राहायची भूमिका घेतली आहे. हे बघून MIM सारख्या पक्षानेही 'दोषी असतील तर कारवाई करा' अशी 'मवाळ' भूमिका घेतलेय. फक्त एक 'अजानस्पर्धा'जीवी पक्ष व काही सेक्युलर पक्ष मुस्लिम मतांसाठी फडफडताना दिसत आहेत.👇
हरकत नाही! राजकीय पक्षांचा अजेंडा तर भाजप आणि सरकार हाणून पाडणारच. पण राजकीय पक्षांपेक्षा मुस्लिम समाज त्यांच्या धार्मिक संघटनांकडेच 'मार्गदर्शनासाठी' पाहत असतो, याची खरी काळजी होती.
भागवतांच्या गेल्या दोन महिन्यांतील या भेटींमुळे नेमका याच फ्रंटवर 'त्यांचा' लोचा झालाय..👇
इमाम संघटना (मोहनजी भेटले होते), ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत उलेमा-ए-हिंद आणि जमात-ए-इस्लामी यांच्यातच जुंपली आहे - सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यावरून नाही! उलट बाकीच्या संघटनांनी आता मोहनजी यांच्याशी चर्चा करायचं ठरवलं आहे. 'त्यांना भेटलात, आम्हाला का नाही'..👇
पर्सनल लॉ बोर्ड, जमियत उलेमा-ए-हिंद, जमात-ए-इस्लामी यांनी तर इमाम संघटनेची सरळ 'गिनती'च केली आहे! जमियत उलेमा-ए-हिंदचे सचिव फारूकींनी मोहन भागवतांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करत 'RSSला देशाची फाळणी हवी' असं जे बरळतात, त्यांच्यावर काडीमात्र विश्वास नसल्याचं सांगितलं..👇
1992 साली बाबरी पाडण्यात आली तेव्हा, मुस्लीम समाजाने काँग्रेसवर बहिष्कार टाकला होता. मात्र, काँग्रेसने याच इमाम संघटनेचे तत्कालीन प्रमुख, इलियासी यांचे वडील जमील इलियासी यांना 'देणग्या' देऊन पाठिंबा विकत घेतला होता, असा गौप्यस्फोटही जमियत उलेमा-ए-हिंदचे सचिव फारूकींनी केलाय..👇
असो! PFI वर गेले काही महिने अनेक राज्यांमध्ये होत असलेली कारवाई, मग NIA/EDची हल्लीची देशव्यापी कारवाई, गेल्या 2 महिन्यांतील मोहनजी यांच्या भेटीगाठी.. आणि PFI वर केंद्र सरकार बॅन टाकत असतानाच मुस्लिम संघटनांमध्ये झालेली फाटाफूट, हा योगायोग असेल?
मला तरी हा 'योगायोग' वाटत नाही! 😷

جاري تحميل الاقتراحات...