राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

5 تغريدة Feb 28, 2023
केंद्रीय गृहमंत्रालयाचे अभिनंदन! (थ्रेड) :
बिहार नक्षलवाद-मुक्त झाले आहे! झारखंडमध्येही नक्षलवादाच्या विरोधातील लढा शेवटच्या टप्प्यात आहे. झारखंडमधील नक्षलवादाचा गड असलेले बुरहा पहाड क्षेत्र नक्षलवाद-मुक्त झाले असून तब्बल 30 वर्षांनी पोलिसांना तेथे तळ उभारता आला आहे! 👇
एप्रिल 2022 पासून 3 विशेष अभियान राबविण्यात आले. यामध्ये ‘ऑपरेशन ऑक्टोपस’, ‘ऑपरेशन थंडरस्टॉर्म’ आणि ‘ऑपरेशन बुलबुल’ यांचा समावेश आहे. या अभियानांमुळेच केंद्रीय राखीव पोलीस दलाला झारखंड-छत्तीसगड सीमेवर असलेले बुरहा पहाड नक्षलवाद-मुक्त करता आला..👇
वर्ष 2010 मध्ये 60 जिल्हे नक्षलवादग्रस्त होते, आज हा आकडा 39 झाला आहे. 2015 मध्ये झालेले नक्षलवादी हल्ले 35 होते, वर्ष 2021 मध्ये 25 झाले. एकूण नक्षलवादी आक्रमणांपैकी या जिल्ह्यांमधील प्रमाण 90 टक्के होते..👇
वर्ष 2010 मध्ये 2258 नक्षलवादी हल्ले झाले होती! 2021 मध्ये हीच संख्या 509 वर आली म्हणजे आक्रमणांचे प्रमाण 77% कमी आहे. वर्ष 2010 मध्ये नक्षलवादी हल्ल्यांत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या होती 1005 होती. वर्ष 2021 मध्ये हीच संख्या 147 वर म्हणजे 85% घट झाली आहे..👇
गेल्या 4 महिन्यांत 14 वॉन्टेड माओवाद्यांना ठोकण्यात आले असून 590हून अधिक जणांना अटक करण्यात आली अथवा ते स्वत:हून पोलिसांकडे स्वाधीन झालेत! गृहमंत्रालय व निमलष्करी दलांची ही कामगिरी अभिनंदनास्पद आहे. नक्षलवाद समूळ नष्ट करत असताना जिहादी आतंकवादालाही लगाम लावावा यासाठी शुभेच्छा..💐

جاري تحميل الاقتراحات...