राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

11 تغريدة Feb 28, 2023
मायलॉर्ड्सचा निषेध! (थ्रेड) :
जम्मू-काश्मीरमधून काश्मिरी हिंदूंचे पलायन आणि त्यांच्या हत्या यांची चौकशी करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर विचार करण्यास SCने नकार दिला, उलट याचिकाकर्ते आशुतोष टपलू यांनाच याचिका परत घेऊन त्यावर योग्य उपाय शोधण्यास सांगितले!👇
आशुतोष यांचे वडील टीकालाल टपलू यांची JKLFच्या जिहादींनी गोळ्या घातल्या होत्या. काश्मीर फाईल्स मध्ये अनुपम खेरांचा डायलॉग आहे - "श्यामाप्रसाद मुखर्जींनंतर टीकालाल टपलू हे सर्वात लोकप्रिय नेते होते म्हणून दहशतवाद्यांनी त्यांना आधी मारलं. नेतृत्व नसले तर इतर गोष्टी सोप्या होतात.."👇
1930 साली जन्मलेले टिकालाल एमएएलएलबी झाले ते अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून. त्यांच्यासोबत इतर काही काश्मिरी पंडितांना त्यावेळी प्रवेश नाकारला गेला तर आंदोलन करून त्यांना प्रवेश द्यायला त्यांनी भाग पाडलं. त्यांनी काश्मीरबार साधारण १९५७ साली जॉईन केला..👇
कट्टर स्वयंसेवक असणारे हे टपलू, सहा वेळा तुरुंगाची वारी करूनसुद्धा आले होते. त्यांनी दिल्लीतसुद्धा काही काळ प्रॅक्टिस केली होती. काश्मीर प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्षदेखील होते. जम्मूकाश्मीरच्या खोऱ्यात त्यांचे नाव बऱ्यापैकी गाजत होतं..👇
आणि नुकतीच खळबळ सुरु झाली..
'जेकेएलएफ'चे पोस्टर्स वाढू लागले होते. जिहादींची भरती सुरु झाली होती. मुजाहिद हा शब्द कानावर पडू लागला होता, ज्याचा संबंध हा केवळ अफगाणिस्थानशी आहे असा तेंव्हा समज होता. हे मुजाहिद काश्मीरमध्ये काय करताहेत? असे प्रश्न पडू लागले होते.👇
हिजब-ए-इस्लामी संघटनेचे फतवे जारी होऊ लागले होते. हिंदू-मुस्लिम स्त्रिया वेगळ्या ओळखू याव्यात म्हणून हिंदू स्त्रियांना कपाळाला कुंकू लावणे सक्तीचे होऊ लागले होते. मधल्या काळात, काश्मीर मधील बाबा रेशी ह्यांचे ३०० वर्ष जुने मंदिर जाळले गेले. ह्या अश्या घटना वाढू लागल्या होत्या..👇
ह्याची दिल्लीत असणाऱ्या टपलूंना खबर लागली. १९८९ च्या सुमारास आपल्या कुटुंबाला दिल्लीत सोडून ते काश्मीरमध्ये स्वतःच्या जीवाला धोका आहे हे कळूनसुद्धा गेले. ह्या काळात पंडितांना आधाराची गरज होतीच.. पण एवढी गरज असेल ह्याची कल्पना नव्हती..👇
१२ सप्टेंबर १९८९ रोजी त्यांच्या घरावर हल्ला झाला. तोपर्यंत काश्मिरात कोण्या पंडितांची हत्या अशी झाली नव्हती.. इस्लामी दहशतवाद्यांना हत्या करायला एक लोकप्रिय, हिंदुत्ववादी चेहरा हवा होता, जेणेकरुन दहशत माजवता येईल. पंडित टिकालाल टपलूंशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हताच..👇
दोनच दिवसात, कित्येकांच्या डोळ्यादेखत पंडित टिकालाल टपलूंची दिवसाढवळ्या हत्या केली गेली, देहाची चाळणी केली गेली. तो दिवस १४ सप्टेम्बर १९८९. ह्या हत्येनंतर बाराव्या दिवशी त्यावेळेसच्या मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी नर्तिका यामिनी कृष्णमूर्थीसोबत एक नाचसुद्धा केला होता.. असो..👇
पंडित टिकालाल टपलू हे पहिले काश्मिरी पंडित ज्यांची हत्या केली गेली! आणि, नंतर हत्यांचे सत्रच सुरु झाले. दहशतवाद्यांमध्ये स्थानिक चॅनेल्सवर येऊन कोणी किती काश्मिरी पंडितांना उडवले हे सांगायची स्पर्धाच लागली. त्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहित आहेच.👇
अमर हुतात्मा पंडित टिकालाल टपलू यांना आजही न्याय मिळाला नाही, म्हणून पुन्हा एकदा 'भावपूर्ण श्रद्धांजली' लिहून पूर्णविराम देतो..🙏
(टिकालाल टपलू यांच्याबद्दल ची माहिती @mechetandixit सरांच्या FB पोस्ट वरून घेतली आहे. कोर्टाचा नाकर्तेपणा बघून ही पोस्ट आठवली.)

جاري تحميل الاقتراحات...