राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

4 تغريدة Feb 28, 2023
जनहितार्थ : (सोर्स - अलाहाबाद विद्यापिठाचे ‘इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री’मध्ये प्रकाशित झालेले संशोधन.)
मंचुरियन’, ‘मोमोज’, ‘स्प्रिंग रोल’ यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये ‘MSG’ नावाचे रासायनिक मीठ टाकल्याने या पदार्थांची चव आणखी चांगली होते..👇
आजकाल मुलांच्या आहारात MSG वापरण्यात आलेल्या जंक फूडचा मोठा समावेश आहे. MSG हे एक प्रकारचे रासायनिक मीठ आहे. त्याचे रासायनिक नाव ‘मोनोसोडियम ग्लूटमेट’ (MSG) आहे. तसं तर टोमॅटो आणि चीज यांच्यामध्ये ते नैसर्गिकरित्या मिळत असते, पण ते हानिकारक नाही..👇
संशोधनाचे निष्कर्ष -
1.) MSGचा अल्प डोसही आरोग्यास हानी पोचवू शकतो.
2.) निर्धारित प्रमाणातही या समस्यांचा धोका असतोच.
3.) उच्च रक्तदाब, हृदयविकार, लवकर वृद्धत्वाच्या समस्या निर्माण होतात.
4.) लहान मुलांमध्ये आणि वाढत्या गर्भामध्ये रक्त-मेंदूच्या समस्या निर्माण होऊ शकतात.👇
MSGला अजिनोमोटोही म्हटले जाते. हा अजिनोमोटो भारतीय खाद्यसंस्कृतीचा भाग कधी नव्हताच, पण हल्ली त्याचा सर्रास वापर होत आहे. शास्त्रीयदृष्ट्या याचे धोके सिद्ध झाल्याने आता याचा वापर रोखण्यावर उपाययोजना करण्याचे सरकारी पातळीवरही विचाराधीन आहे. तोपर्यंत आपण स्वतःच काळजी घेतलेली बरी..🙏

جاري تحميل الاقتراحات...