Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

10 تغريدة 4 قراءة Feb 22, 2023
पुण्याचा गणेशोत्सव - २०२२ (वर्ष १३० वे)
यंदाच्या गणेशोत्सवाची एक वेगळीच मजा होता. एक वेगळाच उत्साह होता. पाऊसातही तो उत्साह काही कमी झाला नाही. पाऊसातल्या गर्दीत ही श्रींना माझ्या कॅमेरात टिपण्याचा मोह काही मी आवरु शकलो नाही. त्यातील काही छायाचित्रे या थ्रेडमध्ये टाकत आहे.
१/१०
मानाचा पहिला - श्री कसबा गणपती
पुण्याचे ग्रामदैवत ज्याची स्थापना दस्तुरखुद्द हिंदुराष्ट्रमाता जिजाऊसाहेबांनी केली होती.
२/१०
मानाचा दुसरा - श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या बाहेर विराजमान झालेला हा गणपती मला वयक्तिकरित्या सगळ्यात आवडतो.
३/१०
मानाचा तिसरा - श्री गुरुजी तालीम गणपती
बाल गणेशाच्या रुपात दर्शन देणारा हा बाप्पा पुण्याचा राजा म्हणून ही ओळखला जातो.
४/१०
मानाचा चौथा - श्री तुळशीबाग गणपती
पुण्यात शक्यतः गजाननाच्या मूर्तिचा आकार छोटा असतो. तुळशीबागेत विराजमान असलेली गजाननाची भव्य मूर्ति मात्र अपवाद आहे.
५/१०
मानाचा पाचवा - श्री केसरीवाडा गणपती
गजाननाच्या मागे गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
६/१०
पुण्यनगरीचे आराध्य दैवत - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंतांच्या या मूर्तिकडे बघितले की आपोआप मन प्रसन्न झाल्यासारखे वाटते.
७/१०
श्री भाऊसाहेब रंगारी गणपती
दैत्याचा वध करणाऱ्या मुद्रेत असलेला हा गणपती बाप्पा एक वेगळी उर्जा प्रदान करतो.
८/१०
मंडई येथील श्री शारदा गणेश
९/१०
छत्रपती राजाराम महाराज मंडळ
या वर्षी, छत्रपती राजाराम महाराज मंडळाने तिरुपतीच्या बालाजी मंदिराची प्रतिकृती उभी केली होती. या कलेकडे पाहून डोळे तृप्त झाले होते.
१०/१०

جاري تحميل الاقتراحات...