राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

15 تغريدة Feb 28, 2023
ऍडव्हान्स मध्ये सूचना : केंद्रातील मोदी सरकारने 2018 साली राज्यात फडणवीस सरकार सत्तेत असताना मंजुरी दिलेला रत्नागिरीतील 3 लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प, 2.5 वर्षे ठाकरे सरकार कडून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा करून थकला! थैल्यांवरून सेटलमेन्ट होत नसल्याने ग्रीन सिग्नल बोंबलला..👇
आता RRPCL राज्य सरकारला शेवटचं अल्टिमेटम देण्याच्या तयारीत आहे. किंबहुना, कंपनीकडून कधीही हा प्रकल्पच रद्द करायची घोषणा होऊ शकते! या रिफायनरी प्रकल्पाचं सर्वेक्षण पूर्ण होण्यातील शिवसेनेचा अडसर आणि त्यांच्याच दबावाखालील प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कंपनी नाराज आहे..👇
शिंदे-फडणवीस सरकारची बदनामी करायचा एककलमी कार्यक्रम असलेल्या शिल्लक सेनेच्या हस्तकांनी, अर्थात बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी आजच केली आहे. जे काम मेधा पाटकर & कंपनी ने नर्मदा डॅम च्या बाबतीत केले तेच काम आणि तोच अजेंडा ही मंडळी राबवत आहेत..👇
अडीच वर्षे असंवेदनशील सरकार चालवून आणि नियोजनशून्य कारभार करून जनतेचे हाल केले त्याने यांचे समाधान झाले नाही. बेरोजगारीने गिनीज रेकॉर्ड तोडले आहे की काय अशी परिस्थिती मविआने करून ठेवलेली आहे राज्यात. स्वतः प्रकल्प उभे केले नाहीतच, जे करू शकतात त्यांनाही करू देत नाहीयेत..👇
रिफायनरी विरोधी आंदोलकांचे नेते काही गाववाले गरीब आंदोलक नाहीत. या नेत्यांच्या एनजीओना कोट्यवधी रुपये काही संदिग्ध संस्थांकडून मिळाल्याची इन्फो मिळाल्याने ATS पथकानं जुलै-2021 ते ऑक्टोबर-2021 मध्ये चौकशीही केलेली आहे! चौकशी अचानक थांबली, आणि हे सगळे मातोश्रीचे आदेश पाळू लागले..👇
विनायक राऊत यांचे पाठबळ असलेल्या याच आंदोलनजीवी गुंडांनी नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्याच्या वेळी पटोले व पोलिसांच्या उपस्थितीतच उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिली होती..👇
मूठभर हस्तकांना हाताला धरून आपल्या पक्षाचे राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी बेकायदेशीर हिंसा व धमकावणीचा वापर करून प्रोजेक्ट्स पळवून लावणारे स्वतःची 'पर्यावरणवादी' इमेज चमकवतातच, प्रोजेक्ट गेल्यावर बेरोजगारांच्या फौजेला वडापाव देऊन झेंडे, बॅनर, पोस्टर लावायची कामं करायला लावतात..👇
ही आयती 'मॅनपॉवर' हाती लागावी म्हणून प्रकल्पाच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी गणेशोत्सव पण सोडत नाहीत. राजापूरातील काही गावांमध्ये, वाड्यांवर सार्वजनिक मंडळातील (जवळच्या) पदाधिकाऱ्यांना बक्कळ पैसे चारून रिफायनरीविरोधात बॅनर लावायला व देखावेही यांनी उभे करायला लावले..👇
पण, सत्य हे आहे की या लोकांना ना बेरोजगारांची काही पडलेली आहे ना पर्यावरणाची, विकास आणि राष्ट्र-निर्माण तर लांबच राहिलं. यांचे राजकारणाचे दुकान आणि छपाई सुरू राहणे एवढंच यांना टेन्शन. जे 'पर्यावरणवादी' बिरुद हे मिरवतात, त्या पर्यावरणाची सगळ्यात मोठी हानी यांनीच केली..👇
एयर-कंडिशन खोलीत बसून हे'लॅपटॉप-पर्यावरणवादी' गुगल करून मोठाल्या कॉन्सेप्ट झोडून आभाळ हेपलत असतात, तिकडे राष्ट्रीय हरित लवादाने यांच्याच कुचकामीपणा मुळे महाराष्ट्राला घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन न केल्याने 12000 कोटींची पर्यावरणीय भरपाई ठोठावली. हे तुमचं कोकण वाचवणार?👇
यांचा मित्र असलम याने मढ येथे असलेल्या समुद्रात सीआरझेड नियमांच उल्लघन करून 5 स्टुडिओ उभारले. कोण होतं तेंव्हा पर्यावरणमंत्री? तेच, जे रिफायनरीला विरोध करत आहेत. या अशा लोकांना ज्यांना मुंबईने सर्व काही देऊनही मुंबईची काळजी नाही, त्यांना तुमच्या कोकणच्या पर्यावरणाची काळजी असेल?👇
हौशी पर्यावरणवादी लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी यांच्या वडिलांनी मुंबईकरांना मेट्रो प्रकल्पात 10000 कोटीला खड्ड्यात घातलं! युरोपवरून येताच पवई तलावाच्या बाजूला सायकल चालवायची हुक्की आली तर तलावाचे किनारे काँक्रीट ओतून वाट लावले. कोर्टाने बंद केलं काम. हे बनवणार कोकणचा कॅलिफोर्निया?👇
बिल्डरना वृक्षतोडीच्या परवानग्या यांच्या BMC ने किती वेळा दिल्या मोजूही शकत नाही. आरे जंगल आहे म्हणत कंजूरमार्गला जे मेट्रो कार-शेड बनवत होते ते फ्लेमिंगो अभयारण्याच्या हद्दीत! असली अर्धवट मंडळी वाचवणार तुमच्या नारळी पोफळीच्या बागा, समुद्र किनारे, जंगल, नैसर्गिक वैविध्य?👇
चेंबूर-मानखुर्दची लोकं तर यांच्या बीएमसी च्या डम्पिंग ग्राउंड चा वास आणि त्यात लागणाऱ्या आगीतून येणाऱ्या दूषित हवेत घुसमटच जगत आहेत!!
यांनी वाटोळं केलेल्या शेकडो गोष्टींची यादीच देऊ शकतो. पण मुद्दा हा आहे, की हे ठाकरे & कंपनी मुंबईचे झाले नाहीत, हे कोकणचे काय घंटा होणार? 👇
म्हणून, कर्मदरिद्री महाविकास आघाडीवाल्यांच्या व विशेषतः तुम्हाला भडकवणाऱ्या शिल्लक सेनेच्या (व त्यांच्या हस्तकांच्या) नादाला लागू नका. यांची घरं भरलेली आहेत, पुढच्या सतरा पिढ्या बसून खाणार आहेत. गाव सोडून, कोकणकन्या किंवा दिवा पॅसेंजरमध्ये बसून नोकरी शोधायला जावं लागणार नाही..🙏

جاري تحميل الاقتراحات...