राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 تغريدة Feb 28, 2023
राजकीय थ्रेड :
'स्मार्टफूड' अर्थात एक परिपूर्ण धान्य म्हणून बाजरी ची योग्यता जगभरात मान्य केली गेली आहे. भारतात बाजरी सर्वत्र वापरली जाते. ती विविध नावाने ओळखली जाते. कानडीत सज्जे, तमिळ मध्ये कंबू, इंग्रजीत पर्ल मिलेट, महाराष्ट्र व राजस्थानात बाजरी नावाने हे धान्य ओळखले जाते..👇
बाजरी लो-कॅलरी पौष्टिक अन्न असून त्याच्या सेवनातून आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन्स मिळतात. यात ग्लुटेन नाही. शिवाय बाजरीमुळे वजन कमी होते. बी ६, झिंक, फ्लोराईड बाजरीत मुबलक प्रमाणात आहेत. यामुळे केस गळणे कमी होते. रक्त वाढते, मधुमेह नियंत्रणात राहतो. बॅड कोलेस्टरोल कमी होते..👇
आता तुम्ही म्हणाल की आज याला काय झालं, राजकीय विषयांवर लिहिणारा 'भाकरी फिरवून' एकदम बाजरी वर आला! तर, तसं काही नाही, आपण ट्रॅक सोडत नसतो. आहेत यात पण मोदी..👇
2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून जगभर साजरे केले जाणार आहे. या संदर्भातला प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्राकडे पाठविला होता तो मंजूर झाला आहे. बाजरीचा 'स्मार्ट-फूड' म्हणून प्रचार होण्याने भारत जगाला बाजरी सप्लाय करणारा देश बनून नवीन संधी निर्माण होणार आहेत..👇
अशा भारताची सॉफ्ट पावर दाखवणाऱ्या 'इव्हेंट्स' कडे शेतकरी बांधवांनी थोडं लक्ष ठेवावं. शेती, क्यलिटी-कंट्रोल, प्रोसेसिंग, हँडलिंग, पॅकेजिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, एक्स्पोर्ट अशा अनेक क्षेत्रात शेतकऱ्यांना व शेतीसंबंधी इतर क्षेत्रातील लोकांसाठी संधी निर्माण होणार आहेत..👇
जगभरात सर्वाधिक बाजरी उत्पादन भारतात होते. येत्या साधारण एक दशकात भारत जेंव्हा जगाला भाकऱ्या थापायला लावणार, तेंव्हा तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की हे असं नेहरूंच्या काळात झालं नव्हतं, मोदींच्या काळात झालं!!
बास, तेवढ्यासाठीच मी हा थ्रेड टाकला केली..😁

جاري تحميل الاقتراحات...