राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

7 تغريدة Feb 28, 2023
डियर @Jayant_R_Patil जी,
इलेक्ट्रिक बाईक्स बनवणारी कंपनी 'ओला इलेक्ट्रिक' चे 2019 मध्ये जगातला सगळ्यात मोठा टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट (फेज-1 मध्ये वार्षिक क्षमता 2 दशलक्ष युनिट) महाराष्ट्रात लावायचं जवळजवळ फायनल केलं होतं..👇
तुम्ही सत्तेत आल्यावर हा प्रकल्प तामिळनाडूत गेला! तुमचं सरकार येताच असं काय झालं की डिसेंबर 2020 मध्ये ओला ने तामिळनाडू सरकार सोबत हा प्रकल्प तामिळनाडूत उभा करण्यासाठी करार केला?👇
त्यानंतर, जानेवारी 2021 मध्ये, म्हणजे फक्त एक महिन्यात ओला इलेक्ट्रिक या कंपनी ला 500 एकर जमीन तामिळनाडू सरकारच्या लँड-बँक मधून मिळाली आणि प्रकल्पाचे कामही सुरू झाले. तुमच्या सरकारने अशा काय अटी ठेवल्या होत्या, की ते पळून थेट तामिळनाडूत गेले??..👇
हा कारखाना कार्यान्वित झाला असून हा कारखाना ओला इलेक्ट्रिक साठी इलेक्ट्रिक स्कूटर आणि दुचाकी वाहनांचे जागतिक उत्पादन केंद्र बनला आहे. भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही इकडूनच वाहने पुरवली जाणार आहेत..👇
फेज-1 मध्ये 20 लाख स्कुटर इकडे बनवल्या जाणार आहेत. भारत, युरोप, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील मार्केट्स साठी हे उत्पादन होणार आहे..👇
या एका कारखान्यामुळे 10000 लोकांना थेट आणि 50000 लोकांना इन-डायरेक्ट रोजगार मिळाला आहे. हा भारतातील टू-व्हीलर इंडस्ट्री मधील सर्वात अद्यावत कारखाना आहे आणि यात 5000 रोबो वापरले जाणार आहेत..👇
फेज-2 चे काम सुरू करताना (फॅक्टरी तामिळनाडूत असल्याने) येत्या काळात ओला इलेक्ट्रिक आपले R&D आणि AI सेन्टर पण तमिळनाडूत उभं करणार आहे. म्हणजे ते पण गेलं! आता सांगा महाराष्ट्राच्या तोंडचा घास आणि युवकांचा रोजगार कोणी घालवला?
बोलो बोलो टेल टेल..🙏

جاري تحميل الاقتراحات...