Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

18 تغريدة 1 قراءة Feb 22, 2023
स्वप्नपूर्ती…
कुठल्याही ऐतिहासिक वास्तू चे संवर्धन करणे काही सोप्पे काम नाही. प्रशासकीय अडथळ्यांसोबत आर्थिक अडथळे नैराश्य आणतात. अडथळ्यांवर मात करणे हे काही एका माणसाचे काम नाही.
परंतु अशा अनेक अडथळ्यांवर मात करून आम्ही 'काहीतरी' करून दाखवले याचे समाधान आयुष्यभर राहील.
१/१८
१९ फेब्रुवारी, २०२१ - शिवजयंतीच्या पवित्र दिवशी @malhar_pandey आणि मी पूना हॉस्पिटल समोर दुरावस्थेत असलेली श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची समाधी बघायला गेलेलो.
२० आणि २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमे आधी निवडलेली जागा बघून येणे गरजेचे होते.
२/१८
फेब्रुवारी ते डिसेंबर - या कार्यकालात आम्ही एकूण ५ स्वच्छता मोहीमा आयोजित केल्या होत्या. शुभचिंतकांचा भरघोस प्रतिसाद तर मिळालाच पण आमच्या कार्याकडे बघून अनेकांनी भरभरुन आर्थिक मदत ही केली.
लोकसहभागातून जमलेल्या निधीतून आम्ही सामाधी येथे तात्पुरतं नूतनीकरण करवून घेतलेलं.
३/१८
पण आवश्यकता होती ती कायमच्या उपाययोजनेची. समाधीच्या संवर्धनासाठी लागणारा निधी आमच्या आवाक्याच्या बाहेर होता. स्थानिक नगरसेवकाचे निधन झाले होते.
कसबा विभागीय कार्यालय आणि पुणे महानगरपालिकेच्या हेरिटेज सेल कडे बजेट नव्हते.
४/१८
अशा परिस्थित कसबा विधानसभेच्या कार्यक्षम आमदार आदरणीय @mukta_tilak ताई ह्यांनी आम्हाला तारलं.
@MatruBhakt जी मला आणि @RajeSiddarth दादा ला मुक्ता ताईंकडे घेऊन गेले. पहिल्याच भेटीत ताईंनी मदतीचे आश्वासन दिले.
५/१८
थोड्याच दिवसांत पुणे @BJYM चे उपाध्यक्ष आदरणीय @kunal_tilak जी यांनी स्वतःहून मला फोन करून बजेट ची व्यवस्था झालेली आहे असे सांगितले.
बजेट ची सोय होणे आमच्यासाठी अत्यंत आनंददायी होते. काम झाले, आता कसलीच काळजी नाही असे आम्हाला वाटले होते.
६/१८
परंतु अनेक अडथळे आमची वाट बघत होते. बजेट जरी आमदार निधीतून आले असले तरी समाधी महानगरपालीकेच्या हेरिटेज सेल च्या ताब्यात होती.
हेरिटेज ग्रेड च्या वास्तूंच्या जिर्णोद्धारासाठी महानगरपालिकेचे NOC अनिवार्य असतं.
कामाची सुरुवात झाली ती वास्तुविशारद @archsourabh यांच्यापासून.
७/१८
प्लॅन, कोटेशन, आदि तांत्रिक बाबींकडे लक्ष देऊन महानगरपालिकेच्या अभियंतांशी चर्चा करणे, त्यांची संमती मिळवणे - या सगळ्या कामासाठी डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ या ४ महिन्यात असंख्य वेळेला महानगरपालिकेत जायला लागले.
८/१८
प्रत्येक वेळेला माझ्या बरोबर @RajeSiddarth दादा किंवा @prahappy दादा असायचेच.
कित्येक वेळेला आपल्या मिटींग/कॉल सोडून हे दोघे महानगरपालिकेत समाधीच्या कामासाठी आलेले आहेत.
मला जेव्हा जमत नव्हतं तेव्हा मी हक्काने या दोघांना कॉल करून महानगरपालिकेत जायला सांगायचो.
९/१८
गरज लागेल तेव्हा आमच्यासोबत आदरणीय मुक्ता ताईंचे स्वीयसहाय्यक श्री. नाणजकर साहेब यायचे.
३ महिने चकरा मारुन हेरिटेज सेल कडे ऍबस्ट्रॅक्ट प्रस्तुत केले. टेंडर निघाले. कॉन्ट्रॅक्टर श्री. गोहेल यांना ते मिळाले पण शेवटच्या क्षणी प्रशासकीय बाबींमुळे वर्क ऑर्डर मिळू शकली नाही.
१०/१८
महानगरपालिका बरखास्त झालेली. बजेट लॅप्स झाले होते. सगळी मेहनत पाण्यात गेली असे वाटलेले.
परंतु @RajeSiddarth दादा आणि @MatruBhakt जी यांनी मुक्ता ताई, कुणाल जी आणि नाणजकार साहेब ह्यांच्या मदतीने वर्क ऑर्डर पुन्हा मिळवली.
११/१८
१९ फेब्रुवारी, २०२१ - शिवजयंती रोजी सुरु केलेली मोहीम.
१२ मार्च, २०२२ - शिवजयंती रोजी महानगरपालिकेकडून श्री.गोयल यांना टेंडर मिळाले.
६ जून, २०२२ - शिवराज्याभिषेकाच्या दिवशी वर्क ऑर्डर हाती आली.
या सगळ्या प्रवासात शिवप्रभूंचा आशीर्वाद पाठीशी होता म्हणूनंच हे झालं!
१२/१८
जिर्णोध्दाराच्या कामाला सुरुवात झाल्या पासून कॉन्ट्रॅक्टर शी वेळो-वेळी चर्चा @RajeSiddarth दादा करत आला.
@prahappy दादा आणि मी वेळ मिळेल तसा समाधीच्या येथे जाऊन कामाचा आराखडा घेत होतोच.
काम उत्तम झाले पाहिजे - या साठी कुणाल जी सतत अग्रेसर होते.
१३/१८
पूर्वी, समाधी परिसरात रात्री मद्यपान करायला काही लोक येत असत. अंधाराचा फायदा होत होता.
आता, विद्यार्थी/विद्यार्थिनी येऊन अभ्यास करतात.
पूना हॉस्पिटल मध्ये असलेल्या रुग्णांचे नातेवाईक शांतीसाठी समाधी च्या येथे येतात.
हेच कमावलं आम्ही!
१४/१८
आज जेव्हा समाधीचे होत आलेले काम बघतो, त्या वेळी एक वेगळंच समाधान वाटतं.
गेल्या ८-९ महिन्यांपासून महानगरपालिकेत मारलेल्या चकरा आणि इतर अडथळ्यांना सामोरे जाणे - वाया नाही गेले.
आम्ही सगळे मिळून ‘काहीतरी’ करु शकलो याचा आनंद मुळी वेगळाच आहे.
संघ शक्ती युगे युगे!
१५/१८
स्वच्छता मोहिमेपासून या प्रवासात आमच्यासोबत असणाऱ्या सर्वांना त्रिवार वंदन.
@rajas_ @iAviGokhale @MakarandJoshi01 @paramvaibhav @ghadge009 @Right_vichar @ajityours @daksinapathpati @TYeotekar @kilimanjaro_92 @ameypujari9 @onkufriends @Rohini_indo_aus @PadmakarTillu
१६/१८
@shambhaveeg @shambhavi_shete @buddhist_hindu @Hemant_M_Joshi @yogeshjoshi603 @smitprabhu @Vijayshri_uvach @SwaroopaShirke @aashayranade
बऱ्याच लोकांना टॅग करायचे राहून गेले आहे. त्यासाठी क्षमस्व🙏🏼
१७/१८
Special Thanks to @MulaMutha @GodboleSandeep @kasturekaustubh @RajMemane @authorAneesh @kguruprasad for always encouraging us!
१८/१८

جاري تحميل الاقتراحات...