महिलांसाठी मोठी बातमी (थ्रेड) : देशाच्या मेडिकल क्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना म्हणून भविष्यात 100% नोंद होणार, अशी गर्भाशयाचा कर्करोग अर्थात Cervical Cancer रोखण्यासाठी स्वदेशी बनावटीची पहिली क्वाड्रिव्हॅलेंट लस आज मोदी सरकार व सिरम इन्स्टिट्यूटने दिल्लीत लॉन्च केली आहे..👇
देशात दरवर्षी दीड लाखांहून अधिक गर्भाशयाच्या कर्करोगाची प्रकरणे समोर येतात, ज्यात 60 हजारांहून अधिक महिलांचा दरवर्षी मृत्यू होतो! 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग हा दुसरा सर्वात सामान्यपणे आढळणारा कर्करोग आहे..👇
या लसीची किंमत केवळ 200 ते 400 रुपयांच्या मध्ये असणार आहे. या लसीचे उत्पादन लवकरच सुरू करण्यात येत असून येत्या काही महिन्यांतच देशात ही लस सर्वत्र उपलब्ध होईल. ही लस प्रथम भारतात उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यानंतर ती जगाला पुरविली जाईल..👇
येत्या 2 वर्षांत 200 दशलक्ष डोस तयार करण्याची भारतात क्षमता आहे. ही लस गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यात यशस्वी ठरेल, यावर तज्ज्ञांचे एकमत आहे. मुलींना ही लस लहान वयातच देऊन अशा संसर्गापासून सुरक्षित ठेवता येईल.
सर्व शास्त्रज्ञांचे, सिरम इन्स्टिट्यूट व मोदी सरकारचे अभिनंदन व धन्यवाद.
सर्व शास्त्रज्ञांचे, सिरम इन्स्टिट्यूट व मोदी सरकारचे अभिनंदन व धन्यवाद.
جاري تحميل الاقتراحات...