PaisaPani
PaisaPani

@PaisaPani

10 تغريدة 124 قراءة Aug 17, 2022
नव्वदच्या दशकात पुण्यात गोपाळ गाडगीळ नामक माणसाने स्वतःचा बंगला बांधला. या बंगल्यात रहायला गेल्यावर कपडे वाळत घालायला आपण नेहमी करतो तेच त्यांनी केले. दोऱ्या बांधून त्यावर कपडे वाळत टाकू लागले. #म #मराठी
पण त्यांची पत्नी आणि आई यांना उंचीवर असलेल्या या दोऱ्यांवर कपडे वाळत घालण्यासाठी काठीचा वापर करावा लागे. ते करत असताना कधीकधी वाळत घातलेल्या कपड्यांवर घड्या पडत. यावर उपाय म्हणून मेकॅनिकल इंजिनीयर असलेल्या गाडगीळ यांनी घरच्या घरीच एक पुली सिस्टीम तयार केली. #म #मराठी
ती वापरून कपडे वाळत घालण्याची दांडी/काठी/पाईप खाली घेता येत असे. त्यावर कपडे वाळत टाकणे आधीपेक्षा खूपच सोपे झाले. गाडगीळांच्या घरी केलेली ही युक्ती शेजारपाजाऱ्यांनी पाहिली. त्यांनी गोपाळ गाडगीळांना विनंती केली की आम्हाला पण हे बनवून दे. #म #मराठी
गाडगीळांनी त्यांनाही अशी सिस्टीम बनवून दिली. हळूहळू पुण्यातून मागणी वाढू लागली. वाढती मागणी विचारात घेऊन गाडगीळांनी त्याचे व्यवसायात रूपांतर केले आणि आपला मुलगा निलेशकडे त्याची पूर्ण जबाबदारी सोपवली. कंपनीचं नाव होतं, ईझीड्राय सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड. #म #मराठी
तोपर्यंत कपडे वाळत घालण्यासाठी ब्रँडेड सिस्टीम असावी ही कल्पनाच कुणी केली नव्हती. गाडगीळ फक्त कल्पना करून थांबले नाहीत तर त्याचे रीतसर कमर्शियलायझेशन केले. यासाठी त्यांनी पुली सिस्टीम, चांगल्या दर्जाच्या दोऱ्या आणि ऍल्युमिनिअमचे पाईप वापरले. #म #मराठी
प्रत्येक पाईपसाठी वेगळी पुली वापरल्याने ते स्वतंत्रपणे वर खाली करणे सोपे झाले. गाडगीळ फक्त प्रॉडक्ट बनवून थांबले नाहीत. त्यांनी या संपूर्ण सिस्टीमसाठी लागणारे पार्टस, ऍक्सेसरीज हे सगळं इनहाऊस बनवलं. त्यामुळे क्वालिटी राखणे सोपे गेले. #म #मराठी
जसजसा व्यवसाय वाढत गेला तसे ईझीड्रायने वेगवेगळे प्रॉडक्टसही लाँच केले. कपडे वाळवण्यासाठी पोर्टेबल स्टॅन्ड, वॉल माऊंटेड स्टँड्स हे त्याच प्लॅनचा भाग होते. सध्या कंपनीचे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, दिल्ली या राज्यांमध्ये मिळून ६० डीलर्स आहेत. #म #मराठी
कंपनीच्या ग्राहकांमध्ये इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, नाबार्ड, एल अँड टी, इंडियन ऑइल, कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग पुणे, बीएमसीसी, यशदा अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे. कुठल्याही प्रॉडक्ट कंपनीला बाजारात टिकायचे असेल तर आफ्टर सेल्स सर्व्हिसला पर्याय नसतो. #म #मराठी
ईझीड्रायनेसुद्धा यावरच लक्ष दिले. प्रॉडक्ट विकल्यावरसुद्धा वेळेवर रिपेअर आणि मेंटेनन्स सुविधा पुरवल्याने त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. यामुळेच आजघडीला कपडे वाळवण्यासाठीचे स्टॅन्ड म्हटले की आपसूक ईझीड्राय हे नाव लोकांच्या तोंडी येते. #म #मराठी
यामुळेच आजघडीला कपडे वाळवण्यासाठीचे स्टॅन्ड म्हटले की आपसूक ईझीड्राय हे नाव लोकांच्या तोंडी येते.
हा थ्रेड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रिट्विट नक्की करा.
#म #मराठी

جاري تحميل الاقتراحات...