राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

5 تغريدة Feb 28, 2023
(थ्रेड) - भारताच्या विविध प्रांतांतील क्रांतिकारक पूर्ण सामर्थ्यानिशी ब्रिटिश सत्तेला आव्हान देत होते, पण त्यांना शस्त्रास्त्रे कमी पडू लागली होती. हे बघून ब्रिटिश खजिन्यावरच दरोडा घालण्याची कल्पना रामप्रसाद बिस्मिल यांनी सुचवली! बँका, कार्यालये, कोषागार यांची निवड करण्यात आली.👇
क्रांतिकारक संधीचा शोध घेऊ लागले. सरकारी कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वेने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली. लखनौ ते सहारनपूर मार्गावर काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून खजिना लुटावा अशी योजना आखली..👇
ठरलेल्या दिवशी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेत क्रांतिकारी बसले, रेल्वे काकोरीजवळ येताच साखळी ओढून रेल्वे थांबविली, पहारेकऱ्यांना 'घोडे' लावून तिजोरी फोडली व खजिना घेऊन जंगलात निघून गेले! 15 मिनिटांमध्ये गेम झाला! ब्रिटिश राजवटीला एवढी मोठी शॉक-ट्रिटमेन्ट याआधी कोणी दिली नव्हती..👇
एक मोठी रक्कम क्रांतिकारकांच्या हाती पडल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे खरेदी केली व लढा अजून तीव्र केला. तिकडे, ब्रिटिशांनी 40 जणांना अटक केली व त्यांच्यावर खटला चालवला गेला. रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशीची शिक्षा झाली..👇
चंद्रशेखर आझाद मात्र ब्रिटिशांना गुंगारा देत पुढे 27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबाद येथील आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी लढताना हौतात्म्य पत्करले.. तोपर्यंत लढतच राहिले!
काकोरी ची घटना 1925 साली आजच्याच दिवशी अर्थात 9 ऑगस्ट रोजी घडली होती.
सर्व वीर क्रांतिकारकांना नमन..🙏

جاري تحميل الاقتراحات...