राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 تغريدة Feb 28, 2023
IAC विक्रांत 🇮🇳 -
अलीकडेच चीनने एक नवीन विमानवाहू नौका आपल्या नौदलात समाविष्ट केली आहे. चीनकडून येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतही आपल्या नौदलाची ताकद वाढवत आहे. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका विक्रांत ही 15 ऑगस्ट रोजी नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे..
1/6
विक्रांत म्हणजे समुद्रात तरंगणारी जणू एक विशाल 18 मजली इमारतच! त्याच्या हल च्या बांधकामात तब्बल 21 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. इतके स्टील 3 आयफेल टॉवर बांधण्यासाठी पुरेसे आहे. विक्रांतचे फ्लाईट डेक तब्बल 2 फुटबाल स्टेडियम इतके मोठे आहे..
2/6
विक्रांतचे हँगर इतके मोठे आहे की 30 विमाने आणि हेलिकॉप्टर सामावून घेऊ शकतो. विक्रांतवर तैनातीसाठी मोदी सरकार बोईंग F/A-18 सुपर हॉर्नेट किंवा राफेल-M लढाऊ विमाने विकत घेत आहे. तोपर्यंत मिग-29K तैनात असेल. कामोव्ह-31 व MH-60R मल्टीरोल हेलिकॉप्टरही तैनात करण्यात येणार आहेत.
3/6
विक्रांतचे वजन 40000 टनांपेक्षा जास्त आहे. ते बनवण्यासाठी 23000 कोटींहून अधिक खर्च झाला आहे. त्याची लांबी 262 मीटर, रुंदी 62 मीटर आणि उंची 59 मीटर आहे. या जहाजात 2300 पेक्षा जास्त कंपार्टमेंट्स आहेत. त्यावर 1700 नौसैनिक तैनात केले जाऊ शकतात!
4/6
विक्रांत चा कमाल वेग ताशी 51.85 किलोमीटर आहे तर क्रुजिंग स्पीड 33 किलोमीटर प्रती तास आहे. विक्रांत एकाच वेळी 13890 किलोमीटर प्रवास करत जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊ शकतो..
5/6
कोचीन शिपयार्ड व भारतीय नौदलाने बांधलेल्या विक्रांत च्या निर्मिती मध्ये 76% पेक्षा जास्त स्वदेशी वस्तू व तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. विक्रांत ही भारतातील आजवरची सर्वात मोठी युद्धनौका आहे..!!
वेल डन मोदी सरकार, भारतीय नौदलाचे अभिनंदन व 'विक्रांत'ला शुभेच्छा. जय हिंद..🇮🇳 (6/6,)

جاري تحميل الاقتراحات...