कुटुंबियांची इच्छा व वेळेवर हालचाली केल्या तर गरजू लोकांना उपयोग होऊ शकतो हे बघून आवश्यक परवानग्या घेऊन प्रत्यारोपण पथक कामाला लागले. त्याचबरोबर झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) आणि आर्मी ऑर्गन रिट्रीव्हल अँड ट्रान्सप्लांट अथॉरिटी (AORTA) यांनाही माहिती देण्यात आली..👇
14 जुलैच्या रात्री आणि 15 जुलैला सकाळी अवयव प्रत्यारोपण करण्यात आले. भारतीय लष्कराच्या दोन जवानांना किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज कॉम्प्लेक्समध्ये डोळे ठेवले आहेत. रुबी हॉल क्लिनिकमध्ये एका रुग्णावर लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आले. एकूण 5 जीव वाचले..👇
अवयवदानाविषयी जागरूकता आणि आर्मी रुग्णालयाच्या प्रयत्नांमुळे क्रिटिकल असलेल्या गरजू रुग्णांना जीवन आणि दृष्टी मिळाली. अशाप्रकारे अपघातात मृत्यू झालेल्या त्या तरुणीने मृत्यूशी झुंज देत असलेल्या 5 जणांना जगण्याचे बळ दिले.. व त्यांच्या माध्यमातून आज पुनर्जन्माची अनुभूतीही घेत आहे.😊
جاري تحميل الاقتراحات...