Pravinkumar Biradar
Pravinkumar Biradar

@PravinIYC

8 تغريدة 4 قراءة Jun 25, 2022
#महत्वाचे
मित्रांनो,
मी काही कायदेशीर बाबी इथे मांडत आहे .
एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना बाजुला सारुन ताब्यात घेऊ शकतात का ?
तर सद्यस्थितीत ते अशक्यप्राय वाटतं.
कारण,
प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात नियम, अधिकार हे सुनिश्चित केलेले असतात.
(०१/०८)
पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेली घटना/संविधान हे अधिकृत असते.
आता शिवसेनेच्या घटनेत "शिवसेना प्रमुख" हे पद सर्वोच्च आहे आणि #फक्त शिवसेना प्रमूख यांनाच कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे (राष्ट्रिय कार्यकारणीच्या संगनमताने).
आता शिंदे त्या पदावर बसू शकतात का ?
नाही.
(०२/०८)
शिवसेना प्रमुख हे #प्रतिनिधी_सभेचे सदस्य निवडून देतात.
ज्यात फक्त आमदार , खासदार नसतात तर जिल्हा प्रमुख ते जिल्हा संपर्क प्रमुख ते मुंबईतील विभाग प्रमूख ई. असतात.
२०१८ मध्ये एकूण २८२ जण होते ज्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमूख पदी निवडून दिले होते.
महत्वाची बाब..
(३/०८)
म्हणजे ज्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या संगनमताने शिवसेना प्रमुख काम करतात , त्या राष्ट्रीय कार्यकारणीतील १४ सदस्य हे पण #प्रतिनिधी_सभा निवडून देतात आणि जास्तीत जास्त ५ जणांची नियुक्ती ही शिवसेना प्रमुख करतात.
तर आता ह्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य कोण आहेत ?
(०४/०८)
ह्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांना शिवसेनेत "पक्ष नेते" या नावाने ओळखलं जातं.
२०१८ मध्ये प्रतिनिधी सभेने खालील यादीतील ९ जणांना पक्ष नेते म्हणून निवडून दिले.
( विशेष बाब म्हणजे यात एकनाथ शिंदे निवडून आले नाहीत, पण आदित्य ठाकरे आले )
ही निवड ५ वर्षांसाठी असते.
(०५/०८)
शिवसेना प्रमुख यांच्या अधिकारानुसार ज्या ४ जणांना ते पक्ष नेते ( राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) म्हणून नियुक्त करु शकतात , त्यानुसार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ईतर ३ जणांची नियुक्ती केली. ( जी नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार हे शिवसेना प्रमुखाकडे असतात हे आपण वर वाचले आहे)
(०६/०८)
आता जर मुख्य शिवसेना पक्ष जर शिंदेंना ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांना प्रतिनिधी सभेतून निवडून यावं लागेल, त्यात २५० पेक्षा जास्त सदस्य आहेत त्यांना सोबत घ्यावं लागेल तरच निवडणूक आयोग त्यांना मान्यता देऊन त्यांना शिवसेना पक्ष गृहीत धरू शकतो.
आणि शिंदेंनी पक्षाची घटना
(०७/०८)
बदलविण्याचा प्रयत्न केला तर अपयशी ठरतील , कारण शिवसेनेच्या घटनेत हे अधिकार राष्ट्रीय कार्यकारणीला देण्यात आले आहेत(जिथे शिंदे गटाचे संख्याबळ कमी आहे) त्यातही वाद झाला तर शिवसेना प्रमुखांचा निर्णय अंतिम असेल.
त्यामूळे शिंदेना वेगळा गट / पक्ष काढण्यापलीकडे पर्याय दिसत नाही.
(०८)

جاري تحميل الاقتراحات...