Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

17 تغريدة 11 قراءة Jun 12, 2022
#Thread: शिवराज्याभिषेकाचे समकालीन वर्णन आणि महत्त्व
“शाहण्णव कुलीचे मराठियांचा उद्धार केला. सिंहसनारुढ होऊन छत्र धरुन छत्रपति म्हणविलें. धर्मोद्धार करुन देवब्राह्मण संस्थानीं स्थापून यजन याजनादि वर्णविभागें चालविलीं…
१/१६
…तस्करादी आन्याई यांचे नांव राज्यांत नाहींसें केलें. देश-दुर्गादि सैन्याचे बंद नवेच निर्माण करुन येकरुप अव्याहत शासन चालविलें. केवळ नूतन सृष्टिच निर्माण केली”.
- हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्य कृत आज्ञापत्र
२/१६
दि. ६ जून १६७४ म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ आनंदनाम संवत्सरात तीन घटिका रात्र उरली असता पहाटे पाच वाजता शिवनृपती सिंहासनावर बसले.
महाराजांचा राज्याभिषेक ही त्या काळाची गरज होती व सर्वांची तीच भावना होती.
३/१६
महाराजांच्या राज्याभिषेकासाठी वेदोनारायण गागाभट्ट ह्यांनी ‘शिवराजाभिषेकप्रयोग:’हा ग्रंथ लिहिला.
वा. सी. बेंद्रे यांनी या ग्रंथाची हस्तलिखित प्रत बिकानेर येथून मिळवून ती प्रसिद्ध केली आहे.
राज्याभिषेकाचे अनेक विधी ३० मे, १७६४ पासून ५ जून, १६७४ पर्यंत चालले होते.
४/१६
शुक्रवार दि. ५ जून, १६७४ पासून मुख्य विधीस सुरुवात झाली.
याचे खूप छान वर्णन इतिहासातील भीष्माचार्य म्हणून ओळख असलेले वा.सी.बेंद्रे आपल्या ग्रंथात करतात.
ते लिहितात -
५/१६
ज्येष्ठ शुद्ध १३ शालिवाहन शके १५९६ रोजी पहाटे शिवनृपती सभामंडपातील सिंहासनाजवळ आले.
त्यावर वृषमार्जारद्विपीसिंहव्याघ्र चर्मे घालून ते आच्छादित केले होते. मधुपर्कादि मंत्र व मंगल वाद्यघोषात सिंहासनावर आरूढ झाले.
दरबारात अथवा सभामंडपात अमात्य, पौर, नैगम, पंडित, वाणी…
६/१६
…आदि लोक उभे होते.
त्यांना दर्शन दिले, तेव्हा सांवत्सरपुरोहितांनी राजांचा मातृपितृवंशपरंपरेत उल्लेख करून त्या सर्व मंडळीना तो छत्रिय राजा अभिषिक्त केल्याचे घोषित केले. तेव्हा ब्राह्मण पुरोहितामात्य वगैरेंनी राजाला प्रणामपूर्वक नजर-नजराणे दिले.
७/१६
महाराजांनी त्यांना वस्त्रे, सुवर्ण, भूमी वगैरे महादाने दिली. नंतर सशरधनू घेऊन मंडपास प्रदक्षिणा घातली. गुरूस नमन केले. सवत्स धेनूंची पूजा केली. अश्वांची व गजांची समंत्र पूजा केली. गजावर बसून नगरास प्रदक्षिणा घालून देवालयात जाऊन देवाची पूजा केली व स्वगृहात गेले.
८/१६
सभासदाने राज्याभिषेक प्रसंगाचे खूपच छान व आलंकारिक वर्णन केले आहे.
तो सांगतो -
९/१६
असा हा राज्याभिषेकाचा देदीप्य प्रसंग खूपच भव्य व नयनरम्य झाला होता हे वरील वर्णनावरुन आपल्या लक्षात येतं.
याची साक्ष देताना टोपीकर हेन्री ऑक्झिंडन आपल्या डायरीत पुढील नोंद करतो👇🏼
१०/१६
शिवछत्रपतींचा राज्याभिषेक म्हणजे जणू एका नवीन पर्वाची सुरुवातंच होती.
म्लेंच्छांच्या राजवटीत हिंदुंवर झालेले अत्याचार, देवी-देवतांचे झालेले विटंबन, स्त्रीयांवर झालेली जबरदस्ती आदि अत्याचारांवर मात करुन एका हिंदु राजाचा राज्याभिषेक म्हणजे एका नूतन सृष्टिचे निर्माणंच होते.
११/१६
आसेतु हिमाचल असे औरस-चौरस पसरलेले मुघलांचे साम्राज्य. या साम्राज्यात स्वतंत्र असे राज्य फारच दूर, पण संस्थानिक व मांडलिकांनाही तग धरून राहणे अति कठीण कार्य होऊन बसले होते. कंधारपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण हिंदुस्थान मुघली अमलाखाली आणण्याच्या मुघलांच्या…
१२/१६
…प्रयत्नांना महाराजांनी अक्षरशः सुरुंग लावला व आपला राज्याभिषेक करून स्वतंत्र राज्य स्थापल्याची घोषणा केली. नुसते एवढेच नाही तर स्वतःच्या नावाची नाणी पाडली.
पत्रलेखनाची भाषा बदलून ‘स्वस्तिश्री’ वापरावयास सुरुवात केली व कालगणनेचा स्वतंत्र असा ‘शिवशक’ चालू केला.
१३/१६
महाराजांनी रघुनाथपंत हणमंते ह्यांना राज्यव्यवहार कोश रचण्यास सांगून फारसी भाषेचा प्रयोग जवळ-जवळ बंदंच केला.
भारताच्या इतिहासात या दिवसाची नोंद सुवर्णाक्षरांनीच करावयास हवी.
राज्याभिषेकाच्या वार्तेने औरंगझेबाची काय स्थिती झाली असेल याचे वर्णन सभासदाने असे👇🏼 केले आहे.
१४/१६
पुढे मराठ्यांनी मुघल साम्राज्याच्या चिंधड्या- चिंधड्या उडविल्या आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवून शिवछत्रपतींचे दिल्ली जिंकून घेण्याचे ध्येय साध्य केले.
वरील सर्व हकीकत स्थिरबुद्धीने वाचली की आपोआप लक्षात येते की शिवराज्याभिषेक दिवस म्हणजे हिंदुसाम्राज्य दिवसंच!
१५/१६
एका हिंदु राजाच्या वैदिक राज्याभिषेकामुळे हिंदु धर्माचा उद्धार झाला हे त्रिवार सत्य किती ही नाकारायचा प्रयत्न केला तरी देखील ते बदलणार नाही.
🚩प्रौढप्रतापपुरंदर, गो-ब्राह्मणप्रतिपालक, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज श्री राजा शिवछत्रपती की जय🚩
१६/१६
*३० मे, १६७४

جاري تحميل الاقتراحات...