फंचुफाकड्या 𑘦𑘧𑘳𑘨𑘕𑘻𑘫𑘲 🤓🤓
फंचुफाकड्या 𑘦𑘧𑘳𑘨𑘕𑘻𑘫𑘲 🤓🤓

@mayurjoshi999

11 تغريدة 2 قراءة May 26, 2022
#फोटोग्राफी_टीप #फोटोग्राफी_टिप्स #photography_tips
#photography_tip #theme_pic_india
पिक्सेल म्हणजे काय? अमुक एक मेगापिक्सेल चा कॅमेरा या मोबाईल मध्ये आहे असे म्हणत असतो. कंपनी देखील अशीच ऍडव्हर्टाईस करत असतात की आमच्या मोबाईलचा कॅमेरा 100 मेगापिक्सेल आहे.
अगदी लहान मुलांना खेळण्यासाठी ठोकळे एकत्र लावून चित्र तयार करण्याचा गेम असतो. समजा 10 ठोकळे एकत्र ठेऊन मी त्याचा फोटो तयार केला. तर त्याला 10 पिक्सेल चा फोटो म्हणता येईल. कारण ते दहा चौरस(square) असतील. त्या हिशोबाने खालील फोटोला मी 25 पिक्सेल चा फोटो आहे असे सांगेन.
कारण हा फोटो 25 चौरस ठेवून तयार करण्यात आलेला आहे. आता 1 मिलियन (दहा लाख) चौरस एकत्र करून फोटो तयार केला तर त्याला एक मेगापिक्सेल असे म्हंटले जाते.
थोडक्यात डिजिटल कॅमेरा मध्ये मग तो मोबाईलचा असो किंवा डीएस्एल्आर चा, त्यात सेन्सर असतो. तो सेन्सर 1 मेगा पिक्सेल किंवा 10
मेगापिक्सेल चा बनलेला असतो. म्हणून जेव्हा आपण फोटो काढतो त्या वेळेला त्या सेन्सर वर पडणारा लाईट हा त्या सेंसर चे जितके मेगापिक्सेल असतील तेवढ्या चौरस यामुळे तो फोटो तयार करतो. त्यासाठी खाली तयार केलेली आकृती बघून लक्षात येईल
आता विचार करा ज्या सेन्सर वर हा लाईट पडत आहे तो समजा फक्त 14mm x 20mm साईज चा आहे. म्हणजे 1.5 cm x 2 cm साईज चा आहे. करण मोबाईल मधील सेन्सर शक्यतो या साईज मध्ये असतात. आणि डीएस्एल्आर वरील सेन्सर चा साइज मात्र मोबाईल पेक्षा तिप्पट-चौपट मोठा असू शकतो.
त्यामुळे आकाराने छोट्या सेन्सर तुम्ही 15 MP ne तयार केला आणि मोठा सेन्सर देखील 15 MP ne तयार केला तर मोबाईल सेन्सर वरील एक चौरस हा डीएस्एल्आर वरील एका चौरसाचा पेक्षा खूप छोटा असेल. खायची आकृती बघून जास्त लक्षात येईल.
म्हणजेच डीएस्एल्आर वरील रिक्षांचा आकार हा मोबाईल वरील पिक्सेल पेक्षा खूप मोठा असतो त्यामुळेच डीएस्एल्आर वरील चित्र जास्त स्पष्ट व जास्त चांगल्या पद्धतीचे दिसते.
म्हणजेच कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे याच्या पेक्षा त्या कॅमेराचा सेंसर कोणत्या साईज आहे हे जास्त महत्त्वाचे आहे.
हे यातून शिकणे महत्वाचे आहे.
त्यामुळे फक्त 100 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे किंवा खूप जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे म्हणून तो चांगला हे पूर्ण चुकीचे विधान आहे. माझा डीएस्एल्आर फक्त बावीस मेगापिक्सेलचा आहे. आणि माझा मोबाईल 100 मेगापिक्सेलचा परंतु दोघांच्या कोलीत प्रचंड फरक पडतो
तो सेन्सर साईज मुळे पडतो. अर्थात सेन्सरचा आकार मोठा होत जातो तशी कॅमेरा ची किंमत वाढत जाते. याच विषयाला धरून याच्या पुढील लेख असणार आहे तो म्हणजे कॅमेरा व त्याचे प्रकार.
तूर्तास थांबतो.

جاري تحميل الاقتراحات...