Tushar Lagad Patil 
Tushar Lagad Patil 

@lagadpatil_

9 تغريدة 11 قراءة May 25, 2022
#Thread 🧵
• छत्रपती संभाजी महाराजांना कैदेतून सोडवण्याचा प्रयत्न करणारे - बाळाजी विश्वनाथ
१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी मुघलांचा सरदार मुकर्रबखानाने संभाजी महाराजाना संगमेश्वर येथे कैद केले. त्यावेळी मुघल बादशाह औरंगजेब अकलूज या ठिकाणी होता.
१/९
आणि मग तो पुढे बहादूरगडला आला. या ठिकाणी संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं. आणि पुढे ११ मार्च रोजी त्यांची अतिशय क्रूरतेने हत्या करण्यात आली.
२/९
सर्व घटनाक्रमात एक प्रश्न सर्वाना पडतो या ४० दिवसांदरम्यान संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला का ?
याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला रामचंद्रपंत आमात्य यांनी लिहलेली २ पत्रं पहावी लागतात. सदर पत्र १६९७ ला लिहली असावीत असे मजकुरावरून दिसते.
३/९
यातलं एक पत्र त्यांनी जिंजीला असणारे छत्रपती राजाराम महाराज यांना तर दुसरे पत्र प्रल्हाद निराजींना लिहलेले आहे. ही पत्र इंग्रजीत भाषांतर केलेली असून त्यात स्पष्ट नमूद केले आहे की, …
४/९
…“संभाजी महाराज आणि त्यांचे चिरंजीव शाहू यांना मुघलांनी कैद केल्यानंतर त्यांच्या सुटकेकरिता धनाजी जाधवांचे मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ यांना संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुटकेकरिता मुघलांच्या मागे पाठवून दिले”
५/९
अर्थात बाळाजी विश्वनाथ यांना या मोहिमेत यश आले नाही हे खरे असले तरीही इतिहासातील या एका प्रश्नाची उकल मात्र या पत्रांमुळे झाली आहे.
मॅकेंझी संग्रहातील तेराव्या खंडात मराठयांच्या इतिहासासंबंधी काही पत्रं असून त्यात ही २ पत्रे आहेत.
६/९
इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांनी ही दोन पत्रं शोधून त्याचे संपादन करून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या १९३१ सालच्या त्रैमासिकांमध्ये ती प्रकाशित केली होती.
मूळ पत्र डॉ. उदय कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात देखील छापले आहे,
@MulaMutha
७/९
तसेच डॉ.केदार फाळके लिखित ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ या ग्रंथाच्या परिशिष्टात देखील याचा समावेश केला आहे.
सदर पत्र १६९७ ला लिहली असावीत असे मजकुरावरून दिसते. यावेळी छत्रपति राजाराम महाराज जिंजीस होते. ही जूनी हकीगत पात्रातून सांगितलेली आहे.
८/९
संदर्भ :
- छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती - डॉ. केदार फाळके
- Era Of Bajirao - @MulaMutha
~ रोहित पवार
९/९

جاري تحميل الاقتراحات...