Malhar Pandey (MODI KA PARIVAR)
Malhar Pandey (MODI KA PARIVAR)

@malhar_pandey

36 تغريدة 17 قراءة May 19, 2022
#Thread : शिवराय, अफझल खान आणि कबरीची सत्यता
इतिहासाचे विकृतीकरण करून समाजात फूट पाडायचे काम गेली अनेक वर्षे ब्रिगेड सारख्या संस्था करत आहेत आणि या संस्थांचे अघोषित प्रवक्ते म्हणून @ashish_jadhao यांच्यासारखे पत्रकार काम करत आहेत हे आजपर्यंत अनेक वेळेला सिद्ध झालं आहे. 1/35
शेंडा आणि बुडखा न पाहता, इतिहासाची साधने न चाळता, आपल्या मनाला येईल ते लिहून समाजात पेरणं हे काम जाधवांसारखे लोक करतात.
नुकताच त्यांनी त्यांच्या एका ट्विट मध्ये शोध लावला. 2/35
ते म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांनीच अफझल खानाची कबर बांधण्यासाठी पैसे दिली होते आणि जागा दिली होती'. हा शोध त्यांनी कुठून लावला तो माहीत नाही पण का लावला याचं कारण माहित आहे. 3/35
समाजात तथाकथित secularism वाढावं या उद्देशाने जाधवांसारख्या अनेकांनी इतिहासात न घडलेल्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न केला आहे. 4/35
त्या पैकी एक म्हणजे अफझल खान का औरंगझेब हा धार्मिक कारणांसाठी हिंदूंवर आक्रमण करत नव्हता तर तो एक सुफी संत वगैरे होता आणि त्याला त्याच्या राज्याच्या सीमांचा विस्तार करावयाचा होता. असच काहीसं या प्रसंगी घडले आहे म्हणून हि चर्चा. 5/35
छत्रपती शिवरायांनी अफझल खानाची कबर बांधून दिली असा दावा करून जाधवांना हे दाखवायचं होतं कि बघा शिवराय त्यांच्या शत्रूवर सुद्धा किती उदार होते. 6/35
शिवराय उदार नक्कीच होते पण जर इतिहास नीट निरखून वाचला असता तर जाधवांना लक्षात आलं असतं कि शिवराय शत्रुंसाठी कर्दनकाळ होते आणि हीच गोष्ट अफझल खानाच्या वधापासून ते त्याच्या थडग्यापर्यंत आहे. आता पुराव्यांच्या आधारे पाहूया कि अफझल खानाच्या कबिरच्या सत्य काय आहे. 7/35
सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो कि कबरीचा ‘एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाही’. ‘समकालीन तर सोडाच पण अगदी शिवरायांच्या निधनानंतरच्या शंभर वर्षातील कागदपत्रांमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याला अशी कोणती कबर आहे याचा पुरावा उपलब्ध नाही’. 8/35
याचीच एक दुसरी बाजू सांगतो, जाधव म्हणत आहेत ती गोष्ट एकवेळ खरी ठरू शकते, जेव्हा असे सिद्ध केले जाऊ शकते कि शिवरायांनी इतर कोणत्या शत्रूची कबर बांधली आहे किंवा त्यासाठी पैसा दिला आहे. पण तसाही पुरावा कुठेही उपलब्ध नाही. 9/35
या उलट असा पुरावा उपलभ आहे कि 'अफझल खान या देवद्वेष्ट्या राक्षसाचा वध केल्यावर शिवरायांनी त्यांचे मुंडके गडावर नेऊन जाण्याचा आदेश दिला. प्रतापगडावर असलेल्या श्री तुळजाभवानीस महाराजांनी जाऊन नमस्कार केला आणि त्याचे शीर दरवाज्यावर बांधले. 10/35
मोहीम फत्ते झाली म्हणून तोफा कडाडल्या, शिवराय जिजाऊंना जाऊन भेटले. मावळ्यांनी जाऊन अफझल खानाची फौज लुटली. १२००० घोडी पागेत आणली.निशाणे, नागरे व हत्ती हुजूर घेतले. अफझल खानाचा कबिला आणि पुत्र कोयनेकाठी पळाले. 11/35
खंडोजी खोपडा रोहिलकर जीवे मारला.' अश्याच पद्धतीचे अनेक पुरावे अनेक बखरींमध्ये सापडतात. कुठेही असा उल्लेख नाही कि शिवाजी महाराजांनी त्या अफझुल्याची कबर बांधली. पुढचा पुरावा अजून मजेशीर आहे. 12/35
अफझल खानाला जिथे मारले गेले तिथल्या बुरुजाखाली त्याचे मुंडके पुरून त्या बुरुजला 'अबदुल्या' बुरुज म्हटले गेले आहे असे एका बखरीत उल्लेख केला आहे. 13/35
पुन्हा एकदा हेच सिद्ध झाले कि महाराजांनी, हिंदू धर्मावर आक्रमण करणाऱ्या या नराधमाला मृत्युमुखी पाडला आणि त्या नंतर खर्यार्थाने जहन्नुम ची सैर करून आणली. आता येउयात थडग्याच्या विषयाकडे. 14/35
जाधवजींना नक्कीच माहित नसेल कि मुघली सरदार किंवा शासक स्वतःच्या हयातीतच स्वतःच्या कबरी बांधून घ्यायचे. कदाचित त्यांनी मराठ्यांची इतकी धास्ती घेतली असावी कि त्यांना स्वतःच्या जिवंतपणातच त्यांचा मृत्यू शिवरायांच्या स्वरूपात समोर दिसायचा. 15/35
मजेची गोष्ट वेगळी पण अफझल खानाने त्याच्या हयातीत विजापूरच्या पश्चिमेला असलेल्या तक्या उर्फ अफझलपूर या गावी एक कबर बांधून घेतली होती. त्या कबरीच्या बाहेर एक मशीद आहे, ज्यावर हिजरी सन १०६४ असे लिहिलेले आहे म्हणजे १६५३-१६५४ (अफझलखान वध - १६५९). 16/35
त्या कबरीच्या बरोबर मध्ये एक रिकामी आयताकृती जागा आहे किंवा खड्डा आहे ज्याच्या मध्ये अफझल खानाच्या मृत्यू नंतर त्याला पुरले गेले असते पण तसे घडले नाही म्हणून आजही तो खड्डा तसाच आहे. 17/35
अफझल खानाच्या प्रतापगडाच्या येथील डोंगरावरच्या थडग्याचा म्हणजे आत्ता जे थडगं आहे त्याचा सर्वात पहिला फोटो पारसनिसांच्या १९१३ मध्ये प्रकाशित झालेल्या महाबळेश्वर ग्रंथात आढळून येतो. इथे नमूद करणे आवश्यक आहे कि त्या फोटोत केवळ एक साधी पत्र्याची शेड आणि एक थडगं दिसतं. 18/35
कुठेही विटांचे बांधकाम दिसत नाही. आपण जेव्हा १९१३ ची गोष्ट करत आहोत तर त्याच्या थोडंसं आधी अर्थात १८८५ मध्ये जाऊया. १८८५ च्या सातारा डिस्ट्रिक्ट गॅझेटियर मध्ये जिथे प्रतापगडाचे वर्णन दिले आहे तिथे कुठेही या थडग्याचा उल्लेख नाही पण १९६३ च्या आवृत्तीत मात्र आहे. 19/35
याचा निष्कर्ष असाच काढला पाहिजे कि याच कालखंडात कोणीतरी या थडग्याचे बांधकाम केलेले आहे. आज जर अफझल खानाची कबर पाहिलीत तर तिचे उदात्तीकरण झाले आहे आणि त्याच्या बाजूला सय्यद बंडाची पण कबर 'उगवली' आहे. इतिहासाच्या एकही पानामध्ये सय्यद बंडाची कबर इथेच आहे असा नामोल्लेख नाही. 20/35
१९१६ च्या गॅझेटियर मध्ये पण नाही. मग हि सय्यद बंडाची कबर आली तरी कुठून ? कदाचित याचे उत्तर आशिष जाधव देऊ शकतील ! तिसऱ्या थडग्याची गोष्ट त्याहून कुतूहलाची आहे. श्री. शिकंदरलाल अतार नामक लेखकाच्या 'रहिमतपूरची अफझलखानी कबर' नावाच्या लेखात या तिसऱ्या कबरीचा उल्लेख येतो. 21/35
श्री आतार लिहितात कि ‘सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे गावाच्या पश्चिमेस ओढ्याचा बाजूला एक थडग्याची इमारत आहे ज्यात अनेक थडगी आहेत. या इमारतीवर अफझल खानाची प्रशंसा करणारा लेख लिहिला आहे. हा लेख फारशी भाषेत लिहिला गेला असून त्याच्यातील चौथे वाक्य महत्वाचे आहे. 22/35
ते वाक्य असे आहे कि “मुहम्मद शहाच्या कारकिर्दीत सर्व काफिर हे मुसलमानांचे आज्ञांकित झाले आणि दक्खनच्या मुहुम्म्द शाह हा सुदैवी, न्यायी, श्रेष्ठ आणि मूर्तिभंजक होता". 23/35
श्री आतार पुढे लिहितात कि तेथील तीन थड्यांपैकी २ थडगी हि रनदौलाखानाच्या मुलीची व बायकोची होती व तिसरे थडगे हे अफझल खानाचे असावे. 24/35
पुढील वाक्य महत्वाचे आहे, ते पुढे असे लिहितात कि कदाचित असे असू शकेल कि प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या कबरीत केवळ त्याचे मुंडके असेल पण त्याचे शरीर मात्र इथे या कबरीत पुरले असावे याचा अर्थ हीच त्याची ‘असली’ कबर असावी असे मानायला हरकत नाही. 25/35
पण, इतिहासाचा अभ्यासक म्हणून सांगू इच्छितो कि श्री आतार यांच्या लेखात अनेक त्रुटी आहेत. गुरुवर्य गजानन भास्कर मेहेंदळे यांनी त्यांच्या पुस्तकात या विषयी अत्यंत सुंदर व वस्तुनिष्ठ तर्क दिला आहे. 26/35
असे अनेक पुरावे उपलब्ध आहेत पण एकाही पुराव्यामध्ये, इतिहासाच्या एकाही पानामध्ये शिवरायांनी अफझल खानाची कबर बांधली अथवा त्याच्यासाठी पैसा दिला असा उल्लेख नाही. या उलट, आशिष जाधवांनी अश्या प्रकारची गोष्ट समाज माध्यमांवर टाकून एक मोठी चूक केली आहे. 27/35
अफझल खानाचे थडगं एक १०० वर्षापूर्वी पत्र्याच्या शेड मध्ये होते आणि आता त्याचे उदात्तीकरण करून त्याच्या भवती भिंत बांधण्यात आली आहे आणि सय्यद बंडाची देखील कबर बांधण्यात आली आहे, हे उघडकीस आले आहे 28/35
शिवाजी महाराजांना मारायला येणाऱ्या अफझल खानाचे उदात्तीकरण करणाऱ्या औलादी कोण आहेत ? असा प्रश्न आशिष जाधवांच्या एका ट्विट मुळे उपस्थित झाला आहे. 29/35
सरतेशेवटी जाधवांना व त्यांच्या सारख्या पत्रकारांना एकच सांगू इच्छितो, कि भिडायचं असेल तर एकट्याने भिडा, घाबराटसारखी मूर्खांची फौज पाठवणं बंद करा. इतिहास लिहायचा आणि सांगायचा असेलच तर पुराव्यांच्या अधररावर बोला. 30/35
आमच्या शिवरायांचे नाव घेऊन, त्यांच्या इतिहासाची तोडमोड केलीत तर याद राख, ‘बौद्धिक’ कोथळा काढला जाईल. मागेच सांगितलं होतं कि आमच्याच हयातीत ब्रिगेड सारख्या संस्था ज्यांनी महाराष्ट्राचे नुकसान केले त्या बंद पाडल्या जातील. 31/35
आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आणि त्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही, हे मागे सावंतांनी अनुभवले होते आज तुम्ही अनुभवले ! आणि जाधव, तुमच्या चेल्यांना सांगा, माझी जात नंतर येते, माझ्यासाठी माझा राजा आणि माझा हिंदू धर्म हा पहिला येतो. 32/35
त्यामुळे माझी जात पाहून कितीही खालच्या पातळीला टीका करायचा प्रयत्न केलात तर त्याचा काहीही फरक पडणार नाही. या उलट, आम्ही सगळे हिंदू मावळे अश्या गोष्टींमुळे जास्त ताकद्तीने एकत्र येऊ.
श्री राम !
हर हर महादेव.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय
सनातन हिंदू धर्म कि जय
33/35
References :
१.१८८५ सातारा district gazatteer
२.1963 satara district gazatteer
३. महाबळेश्वर - श्री पारसनीस
४. ९१ कलमी बखर
५. श्री. आतार यांचा लेख
६. शिवभारत- कवींद्र परमानंद
७ . विजापूर - इट्स architectural remains
८. चिटणीस बखर, शेडगावकर बखर
९.राजा शिवछत्रपती - गजानन मेहेंदळे

جاري تحميل الاقتراحات...