Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi

@abhisanket

12 تغريدة 2 قراءة May 17, 2022
'Google Translate' वर मराठी-इंग्रजी-मराठी अशा भाषांतराचा आपण वापर करतो, त्याचा दर्जा अपेक्षित नसल्याचं आपल्याला कधीकधी जाणवतं, पण मग तो सुधारायला आपण आपल्या मोबाइलवरून काही करू शकतो का? याविषयी एक थ्रेड:
⬇️
Google Translate बऱ्याच अंशी आपल्यासारख्या लोकांनी केलेल्या भाषांतरावर अवलंबून असते. Crowdsource(By Google) नावाचे app वापरून आपण यात योगदान देऊ शकतो.
Crowdsource हे app मोबाईलमध्ये उघडल्यानंतर Home स्क्रीन वर आपल्यासमोर सोबतच्या स्क्रीनशॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे असे पर्याय उपलब्ध होतात. ज्यात Translation आणि Translation Validation हे दोन पर्याय भाषांतराशी संबंधित आहेत.
तुम्हाला कोणत्या भाषा अवगत आहेत हे तुम्ही Crowdsource Settings मध्ये जाऊन सांगायचे असते, त्यानंतर भाषांतरासाठी त्या भाषा तुम्हाला उपलब्ध होतात. या उदाहरणात आपण मराठी आणि इंग्रजी निवडल्या असे समजू.
१. Translation Validation (भाषांतराची तपासणी):
या पर्यायात इतरांनी करून ठेवलेल्या भाषांतराविषयी आपण चूक किंवा बरोबर असे मत द्यायचे असते. जर तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही मत न मांडता पुढच्या भाषांतराकडे जाऊ शकता (skip करू शकता).
२. Translation(भाषांतर):
यात आपल्याला दिलेल्या मजकुराचे/वाक्याचे/शब्दाचे भाषांतर करायचे असते. यातही एखादा मजकूर कठीण वाटल्यास तुम्ही पुढच्या मजकुराकडे जाऊ शकता (skip करू शकता).
या दोन्हीही प्रकारात मराठीतून इंग्रजीत की इंग्रजीतून मराठीत हा पर्याय तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता. स्क्रीनच्या वरच्या भागात तुम्हाला ही निवड करता येते.
सुरूवात करण्यासाठी माझ्या मते एवढं पुरेसं आहे.
आता तुम्ही म्हणाल, "पण मी हे उद्योग का करू?"
१. निवांत बसून स्वतःच्या भाषेसाठी योगदान दिल्याचे अमूल्य समाधान. ❤️
२. जितके योगदान द्याल त्याप्रमाणे पातळ्या (levels) असतात, त्याप्रमाणे तुम्हाला रिवॉर्ड्स मिळू शकतात (पैशाच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात नाही, सध्या तरी).
या app मध्ये फक्त भाषांतरच आहे का? नाही. यात छायाचित्रे ओळखणे( जे CAPTCHA साठी वापरले जातात), भावभावना ओळखणे, आवाज ओळखणे असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे याकडे तुम्ही एक फावेटा(फावल्या वेळातला टाईमपास)किंवा एक गेम म्हणून सुद्धा पाहू शकता.
माझे आजवरचे योगदान कसे पाहू?
App मध्ये खालच्या बाजूला Achievements मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. यात तुम्ही योगदान किती दिले, कोणत्या लेव्हल अर्थात पातळीवर आहात, इतरांनी तुमच्या योगदानाला सहमती किती प्रमाणात दर्शवली वगैरे गोष्टी पाहता येतात.
या जुजबी माहितीच्या आधारे तुम्ही Crowdsource वापरू शकाल अशी अपेक्षा आहे!
आणखी काही माहिती हवी असल्यास नक्की विचारा, तुमच्याकडे माहिती असल्यास इथे जोडा आणि काही चुकीचं लिहिलं असल्यास तेही सांगा. 🙏🏻
#मराठी #भाषांतर #देवाणघेवाण
ता.क. माझे सध्याचे आकडे.

جاري تحميل الاقتراحات...