फंचुफाकड्या 𑘦𑘧𑘳𑘨𑘕𑘻𑘫𑘲 🤓🤓
फंचुफाकड्या 𑘦𑘧𑘳𑘨𑘕𑘻𑘫𑘲 🤓🤓

@mayurjoshi999

19 تغريدة 27 قراءة May 10, 2022
आजच साईबाबा याविषयी बऱ्याच पोस्ट बघितल्या व लोकांच्या कमेंट बघितल्या. परंतु खालील गोष्टीची कल्पना त्यांना असते की नसते हे माहीत नाही.
1. लोकांना वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे महाराज माहिती असतील तर स्वतः टेंबे महाराज यांनी साईबाबा यांना नारळ पाठवल्याचे लिखित रूपात आढळले आहे.
2. लोकमान्य टिळक यांनी ज्याप्रमाणे शेगावचे गजानन महाराज व गोंदवलेकर महाराज यांचे आशीर्वाद आपल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी घेतले होते तसेच ते शिर्डी येथे जाऊन साईबाबांना भेटल्याचे देखील आढळते.
3. नाशिकचे अत्यंत महान नाथपंथी योगी श्री ब्रह्मभूत गजानन महाराज गुप्ते यांनी
स्वतःच्या आत्मचरित्रात " आत्मसाक्षात्कार मार्ग प्रदीप" यामध्ये लहानपणी साधनेच्या कालखंडात ते शेगाव येथे गजानन महाराज त्याचप्रमाणे मारुती महाराज शिर्डी येथील साईनाथ महाराज यांच्या सहवासात राहिल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे.
4. याच श्री गजानन महाराज गुप्ते यांचे श्रेष्ठ शिष्य नानामहाराज पाठक व पुणे येथील श्री दादा महाराज आंबेकर यांच्या स्वतःच्या आत्मचरित्रात " सद्गुरु चरणा खाली" या पुस्तकामध्ये शिर्डी येथे जाऊन साईबाबा यांच्या समाधीची स्वतः पूजा केलेली आढळते व त्या ठिकाणी मोठा साईबाबांचा फोटो स्थापन,
केल्याचे देखील आढळते.
5. शेगाव येथील अत्यंत महान संत श्री गजानन महाराज यांच्यावर लिहिलेला सर्वोत्तम ग्रंथ ज्याचे पारायण बहुतांश गजानन महाराज यांचे भक्त करतात तो म्हणजे "गजानन विजय". या ग्रंथाचे लेखक आहेत दासगणू महाराज. व दासगणू महाराज हे एकमेव श्री साई बाबा यांचे शिष्य होय.
माझा दास गणू एका बाजूला व बाकी सर्वजण एका बाजूला अशा पद्धतीने साईबाबांनी नेहमीच दासगणू यांना वागवले. वामन शास्त्री इस्लामपूरकर हे खरेतर दासगणू महाराज यांचे अनुग्रह देणारे गुरु. परंतु त्यांच्याच दृष्टांत गाणे दासगणू महाराज हे साईबाबांच्या चरणी त्यांचे भक्त बनून राहिले
6. साईबाबा यांच्याकडे येणार्‍या जवळपास प्रत्येक किंवा भरपूर लोकांना साईबाबा यांनी विष्णुसहस्त्रनाम जपण्यास सांगितले होते. त्याने स्वतः समोर बसवून लोकांकडून विष्णुसहस्त्रनाम याची पारायणे करून घेतलेली आहेत. आषाढी कार्तिकी एकादशी ला प्रचंड मोठी भजने करवून घेतलेली आहेत.
7. साई चरित्र यामध्ये बऱ्याच ठिकाणी अद्वैत वेदांत वाचतो आहे की काय अशी भावना तयार होऊ शकते अशा पद्धतीने ब्रम्हा माया व त्या ब्रह्माचे स्वरूप मांडलेले आहे त्याचप्रमाणे सगुणभक्ति सुंदर गुणवत्तेकडे कसे जावे लागते त्याचे नितांत सुंदर वर्णन केलेले आहे. हेमाडपंथी या सत्पुरूषाने साई
चरित्र लिहिलेले आहे.
8. साईबाबा यांच्या वागणुकीत बऱ्याच इस्लाम किंवा सोपे संबंधी गोष्टी होत्या यात वाद नाही परंतु त्याच बरोबर आपल्याकडे आलेल्या मुस्लिमांना त्यांना जे काही अर्पण करायचे होते ते हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला अर्पण करा कारण हनुमान आणि अल्ला एकच आहेत हे सांगणारे
तेच होते.
9. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ यांनी देखील साईबाबांचा उल्लेख अत्यंत आदराने केलेला आहे.
आता मुद्दा हा येतो की त्यांचे वागणूक काय होते उदाहरणार्थ ते चिलीम ओढत असत किंवा कधी दारू पीत असत किंवा मांसाहार तर नक्कीच करत असत. परंतु कितीजणांना माहीत आहे की स्वामी विवेकानंद
हे स्वतः मांसाहाराचे भोक्ते होते व जेव्हा शाकाहार आणि मांसाहार एकत्र असतील त्या वेळेला ते मासाहार जास्त निवडायचे. आणि ते देखील अत्यंत अभिमानाने. त्यांना स्वतःलाच अलीम केव्हा पाईप किंवा सिक्रेट या गोष्टी प्रचंड पसंत होत्या. नाशिकचे ब्रह्मीभूत श्री गजानन महाराज गुप्ते
हे तर रोज दारू प्यायला बसायचं किंवा एका वेळेला दोन ते तीन सिक्रेट फुकट बसायचे आणि त्यांच्या आत्मचरित्रात या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः लिहिलेले आहेत
शंकर महाराज यांचे आज 75 वे समाधी देण आहे तेदेखील चार मिनार सिग्रेट ओढण्यासाठी प्रसिद्ध.
त्यामुळे आपण आत्मसाक्षात्कार पर्यंत पोहोचलेल्या संताला कोणत्या आधारावर मोजायला जायचे हा प्रत्येकाचा आपला प्रश्न आहे. काही काळानंतर संत कबीर यांच्यावर देखील अशा प्रकारचे आरोप होतील याची मला शंका नाही.
मुळात साईबाबा या व्यक्तीबाबत त्या काळात देखील कोणत्याही माणसाला त्यांच्याबद्दल कोणतेही माहिती नव्हते उदाहरणार्थ त्यांचे आई वडील कोण किंवा त्यांचे गुरु कोण किंवा ते कोणत्या घरात जन्माला आले कोणत्या गावांमधून आले यापैकी काहीही नाही. तर मग कोणत्या आधारावर आता हे सिद्ध केले
के साईबाबा मुळात मुस्लिम होते व त्याने फक्त मुस्लिम धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हे सर्व ढोंग केले. असे असेल तर महान भक्त दास गणू किंवा लोकमान्य टिळक किंवा स्वामी समर्थ किंवा टेंबे महाराज हे सर्व तुमच्यासमोर किंवा तुमच्या ज्ञाना समोर मूर्ख आहेत असे म्हणावे लागेल.
असो शेवटी आपण नक्की किती अभ्यास करतो आणि किती नाक्यावर बसलेल्या गप्पांना ऐकून त्यांचे अनुकरण करून त्याच बोलायचा प्रयत्न करतो याचा भाग आहे हा.
ज्यांना पटेल त्यांचे ठीक आहे नाही पटणार तेदेखील ठीक आहे.
#साईनाथ
#नाथपंथ
#mayuryhelonewolf
सुफी*

جاري تحميل الاقتراحات...