काशीमध्ये एकूण सहा कूप होते,ज्याचा उल्लेख वेद, पुराणांमध्ये आढळतो.त्यातील तीन #कूप किंवा तलाव हे काळाच्या ओघात नष्ट झाले.त्यातीलच एक कूप किंवा तलाव म्हणजे #ज्ञानव्यापी......
इतिहासकार अनंत सदाशिव आळतेकर यांनी १९३७ साली लिहिलेल्या #Historys_Of_Banaras या पुस्तकात त्यांनी मांडलेल्या एकूण तर्काचा विचार केला तर ते पुस्तकच त्याठिकाणी ऐतिहासिक पुरावा म्हणून सिद्ध होते, म्हणूनच सध्या चालू असलेल्या ज्ञानव्यापी मशिदीच्या केसमध्ये हिंदू पक्षकारांनी या
पुस्तकाचा दाखलाच न्यायालयात सादर केला आहे.
मशिदीवरील चबुतरा आणि त्यामध्ये स्तंभ यावरील नक्षीकाम पाहता ते कोणत्याही परिस्थितीत एका मशिदीचा अंश असू शकत नाही आणि ते स्तंभ हे चौदाव्या किंवा पंधराव्या शतकातील आहेत हे सहज स्पष्ट होते.
मशिदीवरील चबुतरा आणि त्यामध्ये स्तंभ यावरील नक्षीकाम पाहता ते कोणत्याही परिस्थितीत एका मशिदीचा अंश असू शकत नाही आणि ते स्तंभ हे चौदाव्या किंवा पंधराव्या शतकातील आहेत हे सहज स्पष्ट होते.
त्या पुस्तकामध्ये त्यांचा दावा आहे की सध्याच्या ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरातील त्याकाळी म्हणजे पंधराव्या शतकात असणाऱ्या शिवमंदिरात शंभर फूट उंचीचे शिवलिंग होते आणि लोक त्यावर त्यावेळी गंगेचे पाणी आणून त्यावर जल अर्पण करत असत.
त्या मंदिराचे गर्भगृह देखील शंभर फूट परिघाचे इतके विशाल होते. आता ते शिवलिंग दगडाने बंदिस्त करण्यात आले असून त्या ठिकाणी असणाऱ्या #श्रृंगार_गौरीची त्या काळात रोज पूजा-अर्चना होत असे. त्या खाली असणारे तळघर हे आजही चांगल्या स्थितीत असून आणि त्या ठिकाणी खुदाई झाली तर सरळ स्पष्ट
होईल हे सर्व त्यांनी या पुस्तकात नमूद करून ठेवण्यात आलेले आहे.
जगात कोठेही शिव मंदिरासमोर असणारा नंदी हा कधी मंदिराच्या दिशेने असतो पण तो नंदी आता सध्याच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला आपल्या देवाच्या दर्शनासाठी आजही तिष्ठत बसला आहे.
जगात कोठेही शिव मंदिरासमोर असणारा नंदी हा कधी मंदिराच्या दिशेने असतो पण तो नंदी आता सध्याच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला आपल्या देवाच्या दर्शनासाठी आजही तिष्ठत बसला आहे.
काशी विश्वनाथ मंदिराचा एकूण इतिहास पाहता जीर्णोद्धाराचा पहिला उल्लेख राजा हरिश्चंद्र यांच्या काळात झाला, आणि त्यानंतर दुसऱ्यांदा राजा विक्रमादित्य यांनी पुन्हा जीर्णोद्धार केला होता असा दावा केला जातो. बाराव्या शतकात दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने राजा विक्रमादित्य यांनी
बांधलेले मंदिर तोडले आणि त्या ठिकाणी असणारी सर्व संपत्ती लुटून नेली त्यावेळी त्याने या ठिकाणी असणारी एकूण हजारभर मंदिरे पूर्णपणे उध्वस्त केली होती पण त्यानंतर तेराव्या शतकात काशी विश्वनाथ मंदिर परत बांधण्यात आले चौदाव्या शतकात खिल्जी आणि तुघलकाने परत मंदिरावर आक्रमण करून परत
मंदिर ध्वस्त केले कारण मंदिरात होणारी मूर्तिपूजा आई एक प्रकारची #बुतपरस्ती असल्याचे इस्लाम मध्ये सांगितले आहे आणि त्याला इस्लाम मध्ये स्थान नाही या एकाच आधारावर परत मंदिर पाडण्यात आले. चौदाव्या शतकात मंदिर परत बांधण्यात आल्यानंतर जौनपूर या ठिकाणी राज्य करणारा शर्की
सुलतान याने परत मंदिर उद्ध्वस्त केले. त्यानंतर उभारलेले मंदिर पंधराव्या शतकात परत सिकंदर लोदीने या मंदिराबरोबरच काशीतील सर्व मंदिरे उध्वस्त केली. पण परत सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला परत मंदिर मोठ्या दिमाखात उभे राहिले. इतक्या वेळा मंदिर उध्वस्त केले तरी लोकांच्या मनातील
मंदिराविषयी असणारी श्रद्धा भक्ती आणि त्यासाठी असणारे समर्पण कोणीही तोडू शकले नाही. काशी येथील विश्वनाथ मंदिर वारंवार तोडल्याचा उल्लेख त्याकाळचे लेखक विद्वान #नारायण_भट यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या #त्रिस्थली_सेतू या पुस्तकात नमूद केले आहे की त्याकाळात उध्वस्त करण्यात
आलेल्या काशी विश्वनाथ मंदिरचा १५८५ मध्ये त्यांच्या सांगण्यावरून राजा तोडरमल यांनी जीर्णोद्धार केला. त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे की जरी मंदिर पूर्णपणे नष्ट केले गेले तरी त्या स्थानाचे पावित्र्य हे अबाधितच राहते, त्यामुळे त्या स्थानाची पूजा ही केली जाऊ शकते.
विसाव्या शतकामध्ये इतिहासकार मोतिचंद यांनी लिहिलेल्या #काशी_का_इतिहास या पुस्तकात लिहिले आहे की विद्वान नारायण भट यांच्या काळात म्हणजे १५१४ ते १५९५ या दरम्यान तेथे कोणत्याही प्रकारची मशिद नव्हती.
ज्ञानव्यापीच्या एकूण क्षेत्रफळापैकी १२५×१८ फूट लांबीचा पूर्वेकडील भाग हा चौदाव्या शतकातील असणाऱ्या विश्वनाथ मंदिराचाच एक भाग आहे. मोतिचंद यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला प्रस्तावना किंवा फक्त दोनच ओळी या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या आहेत.
अकबराच्या नंतर शहाजहान याच्याही काळात मंदिर तोडण्यासाठी फर्मान देण्यात आले होते. बादशहानामा या आपल्या पुस्तकात शहाजहान १६३२ मध्ये फर्मान देताना बुतपरस्ती त्या ठिकाणी चालत असल्याने आणि मूर्तीपूजक लोकांचा एक मुख्य अड्डा बनला असल्याने त्यावेळी ज्या ठिकाणी मंदिराचे बांधकाम चालू
आहे ती सर्व बांधकामे पाडून टाकण्यात यावीत असे सांगितले आहे. त्यावेळी #बनारस मध्ये चालू असलेली शहात्तर मंदिरांची बांधकामे पाडून टाकण्यात आली.
शहाजहान याच्या काळात इंग्रज इतिहासकार पीटर मुंडी हा आग्रा येथे आला होता.त्याने लिहिलेल्या आपले पुस्तक #The_Travels_Of_Peter_Mundi
या पुस्तकात आग्र्याहून मुगलसरायला जाताना वाटेत बनारसमध्ये एका माणसाला झाडाला फासावर लटकवण्यात आल्याचे दिसले तिथे त्याने चौकशी केली असता समजले की
या पुस्तकात आग्र्याहून मुगलसरायला जाताना वाटेत बनारसमध्ये एका माणसाला झाडाला फासावर लटकवण्यात आल्याचे दिसले तिथे त्याने चौकशी केली असता समजले की
शहाजहानच्या फर्मानानुसार इलाहबादचा सुभेदार हैदर बेग याने आपला चुलत भावाला मंदिर तोडण्यासाठी पाठवले होते फासावर लटकवण्यात आलेली व्यक्ती मंदिर पाडण्यास मनाई करत होती त्यामुळे त्याचा छळ करून मारून त्याला झाडावर लटकवण्यात आले होते.
बनारस मध्ये खत्री ब्राह्मण आणि बनिया या लोकांची वस्ती असून त्या ठिकाणी दूरवरून लोक देवाची पूजा करण्यासाठी येतात त्यामध्ये काशी विश्वनाथ मंदिर हे सर्वात प्रसिद्ध आहे,त्या मंदिरात मध्यभागी एक उंच मोठा घडीव दगड असून त्यावर नदीचे पाणी, फुलं, अक्षता,दूध,दही असे पदार्थ वाहतात.
त्या पुस्तकात कुठेही मशिदीचा उल्लेख केलेला नाही. १६६६ मध्ये औरंगजेबाच्या काळात जीवन शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन तेथून निसटले त्यामुळे औरंगजेबाला खूप राग आला. #मासिरे_आलमगिरी यामध्ये १७ जिलकिद हिजरी १०७९ म्हणजे १८ एप्रिल १६६९ त्यादिवशी औरंगजेबाला कळाले की
ठट्टा आणि मुलतान या सुबह मध्ये आणि खास करून बनारस मध्ये काही मूर्ख ब्राह्मण आपल्या रद्दी पुस्तकातून ज्ञानार्जन करून गुरुकुल चालवतात त्यामध्ये दूरवरून हिंदू विद्यार्थी आणि काही मुस्लीम विद्यार्थी शिकण्यासाठी येतात हे ऐकल्यावर बादशाहाने मध्ये फर्मान काढले की
सुभेदारांनी आपल्या इच्छेने त्वरितन #काफर लोकांची सर्व मंदिरे आणि गुरुकुल नष्ट करावीत औरंगजेबाने सर्व प्रकारच्या मूर्तीपूजा यासंबंधीचे शास्त्रांचे पठन आणि मूर्तीपूजा बंद करून त्यास पायबंद घालण्यात यावा. १५ रब्बूल आखिर हिजरी १०७९ म्हणजे २ सप्टेंबर १६६९ मध्ये औरंगजेबला खबर मिळाली की
त्याच्या आज्ञेने आमदाराने बनारस येथील विश्वनाथ मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्यावर मशिद बांधण्यात आलेली आहे. मोतीचंद यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे की त्या ठिकाणी मंदिर पडल्यानंतर मशिद उभारण्यात आली. मंदिर पाडल्यानंतर मशीद उभी करताना पश्चिम भिंत पाडली आणि छोटे सर्व मंदिरे नष्ट
करण्यात आली. पश्चिमी उत्तरी आणि दक्षिणी मुख्यद्वार देखील बंद करण्यात आले द्वारावर असणाऱ्या शिखर पाडण्यात आले आणि त्या ठिकाणी गुंबज उभारण्यात आले. त्यामुळे मुख्य गर्भगृहाचे मशिदीत रूपांतर झाले आणि मुख्य दालनात नंदी मात्र तसाच ठेवण्यात आला. या मशिदीत काही भागात आजही मंदिराचे स्तंभ
आहेत. मंदिराचा जो भाग १२५×३५ त्याचे रूपांतर एका चौकात करण्यात आले. आज शिकवली जाणारी गंगाजमुनी तहजीब किंवा सर्व धर्म समभावाची व्याख्या काय आहे हे पाहिली तर आमची मंदिरे मुस्लिम आक्रांतानी पाडली आणि आज तरीही आम्हाला ती तीर्थक्षेत्रे मिळवण्यासाठी कोर्टाचा आधार घ्यावा लागतो.
पण नऊ मिनिटात स्थगिती देणारं न्यायालय याठिकाणी कानाडोळा तर करतच पण निकालासाठी देखील खूप वेळकाढूपणा करतं.....
जर हे सगळंच खोटं आहे तर खरं काय आहे ते तरी कुणी सांगावं....
🚩🚩🚩हर हर महादेव 🚩🚩🚩
जर हे सगळंच खोटं आहे तर खरं काय आहे ते तरी कुणी सांगावं....
🚩🚩🚩हर हर महादेव 🚩🚩🚩
جاري تحميل الاقتراحات...