#Thread 🧵
• ०१ मे संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्याचा इतिहास -
जानेवारी १९५६ मध्ये नेहरूंनी घोषणा केली की मुंबई प्रांत विभागून त्याची महाराष्ट्र आणि गुजरात ही नवीन राज्ये बनतील पण मुंबई शहर मात्र केंद्रशासित राहील. ह्यावरून मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला.
१/६

मुंबईत सर्व ठिकाणी दंगे उसळले.
सोबतचे फोटो ४ फेब्रुवारी १९५६ च्या ‘द स्फेअर’ नावाच्या लंडनमध्ये प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातून. नक्की बघा.
२/६
सोबतचे फोटो ४ फेब्रुवारी १९५६ च्या ‘द स्फेअर’ नावाच्या लंडनमध्ये प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातून. नक्की बघा.
२/६
नेहरूंविरुध्द मुंबईत किती जनक्षोभ उसळला होता ह्याची कल्पना येईल. माझी खात्री आहे नेहरूंच्या पुतळ्याला फाशी दिल्याचे आणि चपलांचे हार घालून लाथाबुक्क्यांनी मारल्यांचे फोटो कोणत्याही भारतीय वर्तमानपत्राने छापायची हिंमत त्या काळी केली नसती!
३/६
३/६
दुसऱ्या फोटोत मुंबईत पोलिस गोळीबारात सुमारे २०० जण मारले गेल्याचा अंदाज वर्तवलाय. आपला ‘अधिकृत सरकारी’ आकडा आहे १०५ - तोच आपल्याकडच्या सर्व वर्तमानपत्रांनी छापला आहे.
४/६
४/६
(सरकारी आकडे किती ‘विश्वसनीय’ असतात हे जालियनवाला बागेत जनरल डायरने मारलेल्या एकूण लोकांच्या व त्याने हंटर कमिशनसमोर सांगितलेल्या ‘अधिकृत’ आकड्यांवरुन सर्वश्रुत आहेच!)
असो. शेवटी कोल्हटकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर :-
५/६
असो. शेवटी कोल्हटकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर :-
५/६
गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! 💐🙏🏻
६/६

Credit - संकेत कुलकर्णी (लंडन)
جاري تحميل الاقتراحات...