The Mahrattas (मराठी)
The Mahrattas (मराठी)

@the_mahrattas

25 تغريدة 29 قراءة Apr 10, 2022
⚔️ मराठा शूरवीर - हरपालदेव चालुक्य🚩 (भाग १)
भारतीय इतिहासाला विसर पडलेल्या या क्षत्रिय चालुक्य कुळातील मराठा योध्याने खिलजी सल्तनत विरुद्ध मराठा अंतिम युद्ध केले होते.
हे युद्ध स्कॉटिश स्वातंत्र्ययुद्धातील विल्यम वॉलेस ने केलेल्या युद्धाहुन मोठे होते.
#The_Mahrattas
इ.स. १३११
गौरवशाली सेवुन यादव साम्राज्याचे प्रताप चक्रवर्ती सम्राट रामचंद्रदेवराय यादवराय मरण पावले आणि त्यांचा मोठा मुलगा राजपुत्र सिंघण्णा उर्फ ​​शंकरदेव हा गादीवर बसला.
गादीवर बसताच त्याने खिल्जी विरुद्ध बंड केले आणि सर्व मुस्लिम शासकांना महाराष्ट्राबाहेर हाकलून दिले.
तुर्कांशी लढाईत पराभव होण्यापूर्वी 2 वर्षे चाललेल्या युद्धात सम्राट सिंघण्णाने त्याच्या शूर संघर्षात मुस्लिम शासकांना उत्तरेकडे मागे हटवले.
पराभवानंतर देवगिरीच्या लुटलेल्या अल्पशा लुटीने उभारलेल्या दिल्ली शहर जगातील सर्वात मोठे शहर बनले आहे असे स्थानिक लोकांना वाटू लागले.
थोडक्यात, मराठा देवगिरीच्या शहराच्या लुटलेला खजिना खिलजीने पुढील गोष्टींसाठी वापरला होता:
1) दिल्लीतील श्रीमंत लोकांमध्ये स्वतःचा जबर बसावा
2) दिल्लीला आपल्या सत्तेसाठी शाहीतक्त बनविले
3) मंगोलांबरोबर लढण्यासाठी किल्ले बांधणे
4) उत्तर भारतातील राजवटी जिंकणे
देवगिरीच्या खजिन्याच्या शिवाय, अली गुरशापसारखा क्षुद्र जलालुद्दीन खिल्जीचा विश्वासघात करण्याची किंवा दिल्लीत प्रवेश करण्याची हिंमत ही त्याच्या कधीच स्वप्नातही येऊ शकली नसती!
मराठ्यांच्या संपत्तीने, मलिका जहाँने त्याला यशस्वीपणे लाच देऊन काबीज केले.
मलिका जहाँ ही जलालुद्दीन खिल्जीच्या हरममधील एक. तिचा मुलगा अर्काली खान याला तिने एक पत्र लिहलेले, त्यात नमूद केले की अलाउद्दीनची भव्यता (देवगिरीची संपत्तीने कमावलेली) आणि जमा केलेले सामर्थ्य (लाचखोरीमुळे मिळालेले मनुष्यबळ) यामुळे अलाउद्दीन तो सिंहासन जिंकेल.
आणि ती बरोबर होती!
मराठा प्रताप चक्रवर्तीन सम्राट रामचंद्रदेवराय यांच्याकडून लुटलेल्या खजिन्याच्या संपत्तीसह, अलाउद्दीन खिल्जीने दिल्लीच्या पायाभूत सुविधांचे सुशोभीकरण आणि तटबंदी केली आणि उत्तर भारतातील त्याच्या प्रदेशातील मोक्याचे ठिकाण म्हणून दिल्लीला शाहीतख्ताचे मुख्य स्थान बनवले.
तुर्कीअफगाण सैन्यामध्ये उत्साही भावनेचा व कौशल्याचा अभाव होता,परंतु अल्लाउद्दीनने लुटलेल्या मराठा यादवरायांचा संपत्ती मध्ये नाणी जास्त होती,ती वापरून त्याने संरक्षणात्मक यंत्रणा स्थापन केली आणि मंगोलांना त्याने परावृत्त करण्यात यश मिळवले.
शेवटी हिंदूंचीच संपत्ती ती.
दिल्ली सुलतानांना पूर्वी आर्थिक व्यवस्थापनाची किंवा संरक्षण किंवा आक्रमणाच्या मोहीम मध्ये योग्य लक्ष घालण्याची जाणीव (अक्कल) नव्हती.
अल्लाउद्दीन खल्जीला इतकी बुद्धी असती तर त्याने देवगिरीचा अमर्याद खजिना वापरून शत्रूला जिंकण्यासाठी सुसज्ज अशी सैन्य उभारणी नक्कीच केली असती.
देवगिरी.. देवांचा पर्वत, एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व मोठे शहर आणि बचावात्मक वास्तुकलेचा प्रतिक, इब्न बतूताच्या काळापर्यंत देखील त्याचे वैभव आणि संपत्ती कायम होती.
मराठ्यांचे अकल्पनीय वैभव आणि संपत्ती किती जास्त होती हे महसूल उत्पन्नातून दिसून येते...
ज्याची वार्षिक रक्कम सतरा (17) कोटी दिनार इतकी होती!
1 कोटी म्हणजे 100 लाख दिनार.
1 लाख म्हणजे 100,000 दिनार!
हा देवगिरीचा युद्धकाळातीळ, अनियंत्रित वार्षिक महसूल होता.
स्थिर मराठा राजवटीत ते उत्पन्न आणखी मोठे होते.
देवगिरी प्रांताचे मूल्य स्पष्ट करण्यासाठी असे समजून घेऊ कि,संपूर्ण उत्तर भारतीय विस्तारामध्ये खिल्जीचा सर्वात क्रूर सेनापती नुसरत खान याला फक्त एक कोटी दिनारांचा महसूल मिळवून दिला होता,
त्याला अतिउच्च दर्जाचे मानवी गुलाम खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त 1000 दिनार खर्च करावे लागे.
मराठ्यांनी या घडामोडीं बारीक लक्ष ठेवून पाहून घेतल्या,त्यांची संपत्ती ही दिल्ली सल्तनतच्या जिहादी सैन्याने भारतवर्षाच्या आसपासच्या हिंदूंचा नाश करण्यासाठी वापरली होती.
त्यांचा आर्थिक कणा मोडण्याची गुरुकिल्ली त्यांच्या डोळ्यांसमोर होती आणि ही कारवाई करण्यासाठी एक योद्धा उभा राहिला
हरिथि पुत्र चालुक्यांचा वंशज, कामदेव चालुक्यचा मुलगा हरपालदेव याने देवगिरीचे मराठा साम्राज्य पुनर्स्थापित केले आणि इ.स. 1313 ते 1318 या काळात एस वॉल्लेन्सच्या समकालीन स्कॉटिश स्वातंत्र्ययुद्धात जे बंड केले गेले त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात बंड करण्यास सुरुवात केली.
सम्राट रामचंद्रदेवराय जाधवराव यांचा जावई या नात्याने, हरपालदेव चालुक्यने स्वतःला सार्वभौम महाराजा घोषित केले. सत्ताधारी घराण्यातील सर्वात ज्येष्ठ पुरुष म्हणून बंडखोरी करण्यास सुरू केली.
ते त्यांचे पुतणे गोविंददेवराय यांचे मार्गदर्शक गुरु आणि दत्तक पिता बनले.
यादवराय राजवटीचे सोनेरी दिवस आठवणारे सर्व महाराष्ट्रीय महारट्टा क्षत्रिय पुन्हा एकदा महाराजा हरपालदेव चालुक्य यांच्या चालुक्य साम्राज्यात एकत्र आले.
चालुक्यांने खिलजी आक्रमणकर्त्यांना पराभूत करणे निश्चितच केले होते.
उत्तरेतील सिसोदियानीं चित्तोडवर पुन्हा कब्जा केला आणि दक्षिणेत महाराजा हरपालदेव चाळके(चालुक्य) याने एकट्याने दख्खनच्या संपूर्ण क्षत्रिय शक्तीला खिल्जींविरुद्ध शस्त्रे उगरण्यासाठी प्रेरित केल्याचे ऐकले तेव्हा अल्लाउद्दीन खिल्जीला करावे ते सुचले नाही.याच धक्यात पुढे तो मरण पावला.
दरम्यान, यादवरायांचे खरे थेट रक्ताचे वंशज, शहीद सम्राट शंकरदेवराय यांचे पुत्र, गोविंददेवराय जाधवराव आपल्या काकांच्या संरक्षणाखाली वाढले आणि त्यांनी युद्ध आणि राजेशाहीचे डावपेच शिकून घेतले.
महाराजा हरपालदेव हे खरे तर केवळ यादवांसाठीच सिंहासन सांभाळत होते.
मराठ्यांचे एकत्रित सैन्य संबंध दख्खन फिरले आणि प्रत्येक मुस्लिम शासकला उत्तरेकडे हाकलूंन दिले. .
5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भागातील खिलजीचे वर्चस्व संपवले.
मलिक नायबने या अराजकतेचा उपयोग देवगिरीची संपत्ती बळकावण्यासाठी म्हणून केला.
दिल्ली सुलतान मुबारक खिल्जी या अराजकतेबद्दलअनभिज्ञ होता.त्याला देवगिरी प्रांतातील संपत्ती लक्षात आली आणि त्याने त्याच्याकडे आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले व त्याने आपल्या सैन्याला कूच करण्याचा आदेश केले.
सैन्यात लाखो गिझ, रौमी, तुर्क, मंगोल, रुसी, ताजिक आणि कुरासैनी लोक होते.
महाराजा हरपालदेव चालुक्य हे खिलजीच्या आधी देवगिरीला पोहोचण्यात यशस्वी झाल्याने त्यांनी मलिकनायबचा पाडाव करून त्याने जमा केलेला सर्व मराठाखजिना ताब्यात घेऊन पुन्हा किल्ल्याचा ताबा घेतला आणि मराठे परत पूर्वीप्रमाणे मजबूतपणे उभे राहिले.मराठ्यांनी संपूर्ण पर्वतीयप्रदेश व्यापला गेला.
मुबारक खिल्जी हा त्याच्या उत्कृष्ट सेनापती खुसरो खान आणि विविध अमीर, मलिक आणि इतर सरदारांसह 2 महिन्यांच्या प्रवासानंतर घाट-ए-सगुना येथे पोहोचला.
त्यांने संपूर्ण विध्वंस सुरू करण्याचे आदेश दिले.
त्याचे सैन्य आग आणि तलवारीने निर्दयपणे दख्खनला उध्वस्त करत निघाले.
संख्येने फक्त 10,000 मराठयांना आता किमान 10 लाखांपेक्षा जास्त असलेल्या जिहादी सैन्याचा सामना करून संपूर्ण दख्खन रक्षण लागणार होते.
याच शेवटच्या लढाईत आता पुढील ३०० वर्षांचे मराठयांचे भविष्य ठरवायला सुरुवात होणार होती…
पुढील माहिती भाग २ मध्ये.
मराठी अनुवाद - @lagadpatil_
संदर्भ:
•Medieval Rulers of Goa, Gazetter of Goa, Daman and Diu — VT Gune.
•The Early Muslim Expansion In South India — N. Venkataramanyya.
•The Founding of Maratha Freedom — SR Sharma.
• Travels of Ibn Batuta — trans. of H.A.R. Gibb and Samuel Lee
...
•Qazain-Ul-Fateh of Amir Khusro
•Kanhadade Prabandha of Padmanabha
•Padmāvat of Malik Muhammad Jayasi
•Tarikh-E-Firoz Shah (The Reign of Alauddin Khalji) of Ziauddin Barani, trans. by A.R. Fuller and A. Khallaque.

جاري تحميل الاقتراحات...