Ramesh Raktade
Ramesh Raktade

@r_raktade

8 تغريدة 6 قراءة Apr 04, 2022
इंग्लडमधील एक वृत्तपत्र होते त्यात मदनलाल धिंग्रा यांच्या आव्हान नावाचे शीर्षक असणारा एक लेख होता. तो पुढीलप्रमाणे.
तुम्ही हिंदुस्थानातील देशभक्तांना क्रूरपणे फाशी दिलेत, अंदमानात धाडलेत, त्याचा प्रतिशोध म्हणून त्यादिवशी इंग्रजी रक्त सांडण्याचा मी प्रयत्न केला हे मला मान्य आहे."
“माझ्या सदसद्विवेक बुद्धीच्याच परामर्शने मी हे साहस केल. कोणाच्या सांगण्याने नव्हे. मी संगनमत कोणाशी केले असले तर केवळ माझ्या कर्तव्य बुद्धीशी.
“एखादे राष्ट्र जोवर परकीय सत्तेच्या पाशवी बळाच्या टाचेखाली दाबून ठेवले जाते -
तोवर त्या जित राष्ट्राचे त्या जेत्या राष्ट्राशी अविरत युद्ध चालू असते. निःशस्त्र केले गेल्यामुळे जितांना रणांगणावर युद्ध खेळणे शक्य नसते. म्हणूनच मला अचानक प्रहार करणे भाग पडले. मला तोफा प्राप्त नव्हत्या, -
तुम्ही त्या आमच्या जवळ ठेवल्या नाहीत, म्हणून मी छरिका (रिव्हॉल्व्हर) -हे साधन वापरले."
“माझ्या देशावर अत्याचार हा परमेश्वराशीच द्रोह आहे, परमेश्वराची अवहेलना आहे, परमेश्वराचा अपमान आहे, ही माझी धारणा आहे. कारण मी हिंदू आहे. माझ्या देशाचे कार्य म्हणजेच श्रीरामाचे कार्य आहे.
मातृभूमीची सेवा ही श्रीकृष्णाची सेवा आहे. मी आहे निर्धन ! ना माझ्याजवळ सुदृढ शरीरसंपदा ! मातृभूमीला अर्पण करण्यास माझ्याजवळ माझ्या रुधिराचून दुसरे काय असणार ? म्हणून स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीवर मी आत्मयज्ञ करण्यास उभा आहे.
“सध्या हिंदुस्थानवासियांना कोणता पाठ हवा असेल तर तो कसे मरावे हा आहे. आणि तो पाठ शिकविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतः मरून दाखविणे.
त्यासाठी माझे हे आत्मार्पण आहे ! माझे हौतात्म्य उज्ज्वल ठरेल !
“हिंदू आणि इंग्रज यांचे अस्तित्व असेपर्यंत- (म्हणजे सध्यांचे जित जेत्यांचे अनैसर्गिक नाते संपत नाही तोवर)-हिंदुस्थान आणि इंग्लंड यांचे असेच रक्ताळलेले संबंध राहतील.)
“माझी देवाजवळ प्रार्थना आहे की जोवर मातृुभूमिविमोचनाचे कारय पुरे होत नाही तोवर-म्हणजे मानवतेच्या कल्याणासाठी,
भगवंताच्या अधिष्ठानासाठी, ती स्थायी स्वरूपांत स्वतंत्र होत नाही तोवर मला त्याच मामृभूमींत जन्म यावा आणि तिच्यासाठी असेच मरण येत रहावे."
“मदनलाल धिंग्रा"
संदर्भ- शाईने का लिहिला जाई राष्ट्राचा इतिहास ? गोपाळ गोडसे, पृष्ठ-२०

جاري تحميل الاقتراحات...