पाटील™🚩🇮🇳
पाटील™🚩🇮🇳

@patilji_speaks

11 تغريدة 6 قراءة Mar 23, 2022
*⃣ नसलेला ब्राह्मणवाद *⃣
ब्राह्मणवाद हा शब्द वापरून ब्राह्मणांना शिव्या देणाऱ्या कुणालाही एकदा फक्त विचारा की ब्राह्मणवाद म्हणजे नक्की काय?एकालाही ह्याच उत्तर देता येणार नाही...कारण मुळात ह्या शब्दाला अर्थच नाहीय...मग हे आहे तरी काय?आणि हे का वापरतात? त्याचीच ही पोलखोल...
ब्राह्मणवाद आणि हिंदुत्व ह्या दोन शब्दांचा जेवढा दुरुपयोग भारतीय राजकारणात झाला तेवढा कोणत्याच शब्दांचा झाला नाही...
ह्याची सुरवात कुठून झाली हे नेमकं सांगता येत नसलं तरी ह्या एक शब्दाने समस्त ब्राह्मणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून त्यांना आरोपी करून टाकलं..
सर्वसाधारणपणे ब्राह्मणांना तुमच्यावर वर्चस्व हवं आहे आणि हाच ब्राह्मणवाद आहे असलं फुटकळ कारण देऊन लोकांना भडकवण्याचं काम राजकीय नेत्यांनी आजवर केलं आहे...
पण मुळात ब्राह्मणवाद हा शब्द ब्राह्मणविरोधी नसून हिंदूविरोधी आहे हे लक्षात घेतलं की सर्व स्पष्ट लक्षात येत...
ज्यांना हिंदू एकवटलेले चालत नाहीत किंवा चालणार नाहीत त्यांनीच ह्या शब्दाला सतत वापरून लोकांना नादाला लावलं आहे.मुळात हा शब्द इंग्रजांच्या काळातला.हिंदूंना एकत्र राहू दिलं तर ते कुणाला ऐकणार नाहीत...आणि त्यांच्यावर राज्य करता येणार नाही म्हणून हा शब्द आला.
पुढे जाऊन राजकीय नेते आणि धर्मांतरण करणारे माफिया यांनी हा शब्द सतत जिवंत ठेऊन सर्व हिंदू समाजाला विभाजीत करून टाकलं आणि आज ह्या एका शब्दामुळे आपण हिंदू न राहता ब्राह्मण,मराठा आणि इतर पोट जातीमध्ये विभागलो गेलो आहोत.स्वातंत्र्यानंतर जन्माच्या दाखल्यावर फक्त हिंदू असं लिहिलं असत
तर पुढचा घोळ झाला नसता..
आता हा खेळ नेमका कसा खेळला हे पाहू...
आपल्या हिंदू धर्मानुसार ब्राह्मण म्हणजे हिंदू धर्माच डोकं... सर्व प्रथा,परंपरा आणि चालीरीती ह्याची संपुर्ण माहिती ब्राह्मणांना असते...कारण धर्मशास्त्र हा विषय त्यांचा...मग सरळ मान उडवली की बाहू आणि छाती असलेले
क्षत्रिय आणि त्याखाली असणाऱ्या इतर जाती असा संपुर्ण देह धराशाही होईल अशी योजना आहे ही...त्यात ब्राह्मण वर्ग लोकसंख्येने कमी...विरोधाची शक्यता शून्य...म्हणून प्रहार केला तो ब्राह्मणांवर...त्यांना सतत पाण्यात पाहणे,त्यांच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवणे अस करून ब्राह्मणांपासून
इतर समाजाला वेगळं केलं गेलं...त्यातून दलित आधीच गेले होते..राहिलेल्यात अर्धे ह्या कारस्थानाला बळी पडून हिन्दू असून स्वतःच स्वतःचा गळा कापत आहेत हे कळलं सुद्धा नाही...कळलं असतं तर ब्रिगेडसारख्या फुटकळ संघटना ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवरायांचा खोटा पुरावा नसलेला इतिहास
सांगून मोठ्या झाल्या नसत्या...लोक बळी पडले ह्यांच्या कारस्थानाला...राजकीय पाठबळ मिळाल्याने आज त्या फोफावल्या आहेत...आपण वेळीच सावध झालो असतो तर आज हे ब्रिगेडी दिसले पण नसते...
सर्वांनी एकच लक्षात घ्यायला हवं की हे फक्त ब्राह्मण विरोधी नाहीय...तर हिंदूविरोधी आहे.
हिंदू मध्ये असणाऱ्या सर्व जाती ह्या जन्माने नाहीयेत तर वर्णाने किंवा कर्माने आहेत.मनुस्मृती हेच सांगते...पुढे कधीतरी त्याच जातीत रूपांतर झालं असावं..पण मुळात हे नाहीय.आपल्याला ह्या जातीवरूनच भडकवल जातं.. ब्राह्मण कसे वाईट हे बिंबवलं जातं..आणि इथे आपली गल्लत होते.आपण हिंदू आहोत..
आणि सर्व हिंदू समाज हा एकत्र राहिला तरच आपला धर्म टिकेल...नाहीतर बोके टपून बसले आहेतच...म्हणून ह्यांचा डाव ओळखून जागे व्हा आणि जागृत रहा...
-पाटील🖋️

جاري تحميل الاقتراحات...