पाटील™🚩🇮🇳
पाटील™🚩🇮🇳

@patilji_speaks

14 تغريدة 12 قراءة Mar 17, 2022
*⃣आम्हाला काही फरक पडत नाही *⃣
आज आपण बोलणार आहोत...गांधीवध आणि त्यानंतर अंतर्बाह्य ढवळून आणि बदलून गेलेला ब्राह्मण समाज...आणि आताच्या घडीला असणारी त्याची स्थिती....
#The_Maharashtra_Files
गांधी वध झाला दिल्लीत पण त्यात मारणारा मराठी ब्राह्मण नथुराम गोडसे.त्यामुळे गांधी वधानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजावर जे अनन्वित अत्याचार झाले ह्यावर आजवर कुणी बोलल गेलं नाही.काश्मीरी पंडित जसे गप्प राहिले अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने स्वतःला मिटून घेतलं
अगदी गावगाड्यात प्रमुख स्थानी असलेला ब्राह्मण अगदी एका रात्रीत नेसल्या कपड्यावर गाव सोडून परागंदा झाला...आणि शहरी भागात एकवटला...त्यांच्या जमिनी मागे राहिल्या होत्या कुळ कायद्याच्या कचाट्यात सापडून इतर समाजाच्या स्वाधीन झाल्या...पण ह्या समाजाने कधीही त्यावर चकार शब्द काढला नाही.
काही ठिकाणी महिलांवर अत्याचारही झाले...पण त्यावर पण बोलला नाही...
अचानक एके रात्री तुमच्या घरावर झुंड चालून येते तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या कुटूंबाला सुरक्षित कसं ठेवता येईल ह्याचा विचार करता...ह्याच न्यायाने...ब्राह्मणांनी सर्व सोडून फक्त स्वतःच्या कुटूंबाला प्राधान्य दिलं.
काहीही झालं तर किमान पदवीधर होऊन उत्तम नोकरी मिळवायची आणि आपल्यापुरत जगत रहायचं एवढा शांत झाला हा समाज...जर आपण विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून,लोकमान्य टिळक,स्वातंत्र्यवीर सावरकर असे क्रांतीकारक निर्माण करणारा हा समाज
त्यांनी बोलणंच बंद केलं...अगदी कुणी काही बोलला तरी त्यावर साधी प्रतिक्रिया द्यायची नाही..राजकीय भूमिका उघड मांडायची नाही...देशभक्त पक्षाला मतदान मात्र नेमाने करायचं...पण बोलायच नाही...
ह्यामुळे झालं असं की..ब्राह्मण किती तर 3% ते असेल नसले तरी फरक पडत नाही म्हणून
काही राजकीय नेत्यांनी ब्रिगेडसारखी पिलावळ जन्माला घातली...ब्रिगेड ने सुरवातीपासूनच खोटा ब्राह्मण विरोधी इतिहास रंगवायला सुरवात केली..कारण पुरावा मागणार कुणी नव्हतं.3% ब्राह्मण स्वतःवर झालेल्या अन्यायावर बोलत नाहीत ते ब्रिगेड ला विरोध करणार नव्हतेच...ब्रिगेडला अगदी मऊ जमीन मिळाली
आणि त्यांनी एक एक करून ब्राह्मण आणि इतर समाजाची श्रद्धस्थानं..जे जन्माने ब्राह्मण होते...त्यांना नख लावायला सुरवात केली...दादोजी कोंडदेव,समर्थ रामदास स्वामी...ह्यांच्यावर अभद्र बोलणं..त्यांना शिव्या घालणं... हे का केलं तर त्यांना विरोध करणार कुणीच नव्हतं...
बामसेफ ने पण सर्व दलित समाजात ब्राह्मणांविरोधात विष भरलं आहे...त्यामुळे आज काही दलित आणि ब्रिगेडी ब्राह्मणांना शिव्या देण्यात धन्यता मानतात.दिसला ब्राह्मण की दे शिव्या...आला भट,आलं जानवं,पिठमागे...आता हे पिठमागे जो बोलतो त्याच्या घरी संध्याकाळी भाकरीला पीठ नसेल..
पण ब्राह्मणाला शिव्या दिल्या म्हणजे त्यांना धन्य झाल्यासारखं वाटतं...
बर ह्यावर ब्राह्मणांनी एकच भूमिका घेतली..."आम्हाला नाही फरक पडत"...
भावांनो आणि बहिणींनो..तुम्हाला फरक पडला पाहिजे...नाहीतर काश्मीरी पंडित जसे वेगळे केले गेले तस तुम्हाला राजकीय आणि सामाजिक दृष्टीने
वेगळं पाडण्यात ब्रिगेडी आणि बामसेफी यशस्वी होतील...एक देवेंद्र फडणवीस जो आजवरचा चांगला मुख्यमंत्री असून त्याची जात काढून जेव्हा त्याला हिणवल जातं तेव्हा बोलल पाहिजे...तुम्हाला पीठमागे म्हटलं जातं तेव्हा बोलल पाहीजे,समर्थ रामदास स्वामींना हिणवल जात तेव्हा बोलल पाहिजे...
आणि हो स्वतःला एकट नका समजू...ब्राह्मणांना साथ द्यायला कुलवंत मराठा नेहमीच तयार असेल...पण पहिलं पाऊल तुम्हाला उचललंच पाहिजे...
आम्हाला काही फरक पडत नाही अस न म्हणता फरक पडतो हे दाखवून द्या...
कारण एकच...तुमच्या न बोलण्याने खोट्या गोष्टी खऱ्या वाटायला लागल्या आहेत...
कुणीच विरोध करत नाही त्यामुळे तरुण पिढीला तेच खरं वाटत आहेत...आणि त्यामुळेच आज ब्रिगेडी लोकांकडे तरुण पिढीचा ओढा वाढत चालला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे...
म्हणून जिथे तुमची जात काढली जाईल तिथे बोलाच.सोशल मीडियावर बऱ्यापैकी आवाज उठवला जातोय हे चांगल आहे..हे असंच वाढलं पाहिजे...
एवढं बोलून थांबतो....जय महाराष्ट्र🚩🙏

جاري تحميل الاقتراحات...