🔥तपस्या🚩
🔥तपस्या🚩

@Tapasyanakul

26 تغريدة 6 قراءة Mar 16, 2022
#TheKashmirFiles च्या निमित्ताने एक फेसबुक वरच्या पोस्ट चा मराठी अनुवाद, अनेक लोक जेव्हा म्हणत आहेत की जेव्हा Genocide झाला तेव्हा BJP आणि संघ काय करत होते?
प्रस्तुत लेख त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी.
चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटना असत्य असून असं काही घडलंच नाही म्हणणारे अफीमखोर इथपासून ते तेव्हा तर भाजपचं सरकार होतं मग आता कशाला उर बडवतात विचारणारे शेणके यांच्यासाठी...
"Geeta Bhawan "the RSS office in JAMMU became the control room for facilitating rented a
ccommodation and camps in Jammu for Kashmiri Pandits who were forced to leave the Valley.
14 सप्टेंबर 1989 हा काश्मीरी पंडित आणि रा. स्व. संघ/भाजप च्या आयुष्यातील एक काळाकुट्ट दिवस. याच दिवशी दहशतवाद्यांकडून टिकालाल टपलू यांची हत्या झाली.
या घटनेचे तीव्र पडसाद देशात उमटले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फरुख अब्दुला यांनी या घटनेकडे कानाडोळा केला.
रा. स्व. संघाच्या वरिष्ठ पराधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कडे मागणी केली.
पण या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली.
थोड्याच दिवसात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि वी. पी. सिंग पंतप्रधानपदी निवडून आले. डिसेंबर 1989 मध्ये तत्कालीन सरकार मधील गृहमंत्री मुफ्ती महंमद सयीद यांची डॉक्टर मुलगी रुबिया हिचे अपहरण झाले.
या अपहरणा बरोबरच चालू झाला एक सिलसिला, संघाच्या महत्वाच्या स्वयंसेवकांच्या हत्या करण्याचा. प्रेमनाथ भट या नावजलेल्या वकिलांच्या हत्येनंतर बाळकृष्ण गांजू (लेखकाचे चांगले मित्र) यांची ही हत्या करण्यात आली.
संघाच्या स्वयंसेवकांच्या अशा हत्या होत असताना रा. स्व. संघ त्यावेळी नक्की काय करत होता????
1)रा. स्व. संघाच्या प्रतिनिधी मंडळाने ए. एन वैष्णवी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पंतप्रधान वी. पी. सिंग यांची भेट घेतली आणि जगमोहन यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल बनवण्याची इच्छा व्यक्त केली. जगमोहन यांना राज्यपाल केल्याचा काँग्रेस-नॅशनल काँग्रेस ने प्रखर विरोध केला
आणि फरुख अब्दुला यांनी राजीनामा देऊन राष्ट्रपती राजवटीचा मार्ग मोकळा केला.
2)संघ स्वयंसेवकांना काश्मीर मध्ये आपल्या लोकांपुढे काय वाढून ठेवलंय हे लक्षात आलं आणि त्यांनी काश्मीरी पंडितांना वाचवायचे प्रयत्न चालू केले.
त्यामध्ये वेळ प्रसंगी काश्मीर सोडावे लागले तर पंडितांनी कुठे रहावे याबाबत ही निर्णय घेण्यात आले. काश्मिरी पंडितांना वाऱ्यावर सोडायचे नाही एवढे नक्की केले.
3)सगळ्यात वाईट किंवा ज्याला काळाकुट्ट दिवस म्हणायचे ते जानेवारी 19-20-21 चे दिवस उगवले. संपूर्ण खोऱ्यात ब्लॅक आऊट करण्यात आले आणि खोऱ्यातील हजारो मशिदींमधून भोंग्यांवरून, घोषणा देऊन काश्मीरी पंडितांना नेसत्या वस्त्रानिशी पळून जायला भाग पाडले
. या घोषणा देण्यात JKLF चे अतिरेकी आणि मुल्ले पुढे होते आणि घोषणा होती, "पंडितांनो खोरं सोडून निघून जा पण तुमच्या बायका-मुलींना इथेच ठेऊन जा" खोऱ्यातील पंडितांची संख्या मुसलमानांपच्या पाच टक्के एवढी होती. ती दिसायला जरी दोन लाख असली तरी बायका-मुलं, घरातील मोठी माणसं धरून नगण्यच.
आपल्या आजूबाजूला होणारे इतर पंडितांचे शिरकाण, बायका-मुलींवर झालेले अत्याचार पाहून खोरं सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
या सर्व पंडितांना रातोरात खोरं सोडून बाहेर पडण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी मदत केली.
त्यांच्यासाठी प्रवासाची व्यवस्था केली, राहण्याची सोय केली.(याच कारणास्तव मुस्लिम अजूनही जगमोहन यांनी पंडितांना बाहेर पडायला मदत केली असे सांगतात)
4)जम्मू तसेच दिल्लीतील संघ स्वयंसेवकांनी (लेखकसुद्धा) निराधार, स्वगृह त्यागलेल्या पंडितांना दिल्लीतील तसेच भारतातील अनेक ठिकाणी रहायची
व्यवस्था केली.
5)गीता भवन हे जम्मू मधील रा. स्व संघाचे कार्यालय अक्षरशः Control Room चे काम करत होते. येथूनच काश्मीरी पंडितांना कुठे न्यायचे, कुठल्या कॅम्प मध्ये ठेवायचे, कुठे भाडेतत्वावर जागा द्यायची याबाबतचे निर्णय घेतले जात असतं
6)दिल्लीमध्येतर अशा अनेक लोकांशी संपर्क साधण्यात आले जे आपली घरं किंवा फ्लॅट विस्थापित पंडितांना देऊ शकतील. अर्थातच लोक या गोष्टीला तयार झाले आणि काही जणांच्या वस्तीचा प्रश्न सुटला.
माणशी ₹ 1500 जमवून देण्यात आले. पैशांची जमवाजमव करण्यात अनेक स्वयंसेवक पुढे होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे सरकारी कर्मचारी व अधिकारी होते त्यांना त्यांचा पगार मिळवून देणे व सरकारी आस्थापनेत परत नोकरी देणे. (जम्मू आणि काश्मीर सरकार मधील कर्मचारी आणि अधिकारी)
काश्मिरी समिती या नावाने संघ स्वयंसेवकांनी विस्थापितांसाठी नोंदणी कॅम्प चालू केले. आत्ता पर्यंत पासष्ट हजार (65000) विस्थापित पंडितांना याचा लाभ मिळाला आहे.
हे सर्व तर पंडितांचे लोंढे येत असताना लगोलग केलेले कार्य...
आता आपण दीर्घ कालीन उपाय बघूयात
रा. स्व. स्व संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपची सत्ता असलेल्या पाचही राज्यांतील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना आपापल्या राज्यातील प्रत्येक कॉलेजात काश्मीरी पंडितांच्या मुला-मुलींना शिक्षण देण्याची तरतूद करावी अशी विनंती केली. (इंजीनियरिंग आणि मेडीकल सुद्धा).
सुंदरलाल पटवा, तत्कालीन मुख्यमंत्री, मध्य प्रदेश यांनी या विनंतीचे स्वागत केले आणि हिमाचल प्रदेश, गुजरात आणि राजस्थान येथील सरकारांनी लगोलग पावलं उचलली.
रा. स्व. संघ चालवत असलेल्या सर्व शाळांनी काश्मीरी मुलांना एक ही पैसा न घेता शिक्षण मिळण्याची सोय झाली. सीच पद्धत पुढे कॉलेजातही चालू ठेवली. भाजपने दिल्ली राज्यात सत्ता स्थापन केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांनी सर्व पंडित शिक्षकांना दिल्लीच्या शाळा-कॉलेजात नोकरी
दिली.
संघाचं अजून एक महत्त्वाचे काम म्हणजे के. एन. सहानी यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिनिधी मंडळाची कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर गाठभेट घालून देणं. 1995 मध्ये भाजप/सेना युतीचं सरकार होतं आणि अर्थातच बाळासाहेबांच्या मताला पूर्ण वजन होतं. या काळात युतीने सरकारी आदेश काढला की
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक इंजिनियरींग कॉलेजात (अशी 650 कॉलेज होती) एका काश्मीरी पंडितांच्या मुलाला शिक्षण देण्यात यावं.
असाच अध्यादेश केशुभाई पटेल यांनी गुजरातेत तर भैरो सिंग शेखावत यांनी राजस्थान मध्ये काढला होता.
आज आपल्यातील अनेक काश्मीरी पंडित इंजिनियर आणि डॉक्टर आहेत याचे कारण रा.स्व.संघ/भाजप यांचे योगदान फार मोलाचे आहे.
ही पोस्ट त्या सर्व लोकांसाठी आहे जे अजूनही विचारतात, संघाने काश्मीरी पंडितांसाठी काय केलं?
खरंतर संघाने केलेल्या कामाची list फार मोठी आहे. माझं मत आहे की काश्मीरी पंडित संघाला त्यांच्या अस्तित्वाचं देणं लागतो. भाजपची पितृसंस्था रा. स्व. संघ असल्याने सर्व क्रेडीट संघालाच दिले आहे.
फेसबुकवरील स्वतः काश्मिरी पंडित असलेल्या Upender Saroop यांच्या पोस्टचा मराठी अनुवाद

جاري تحميل الاقتراحات...