राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

4 تغريدة 3 قراءة Feb 28, 2023
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले कमीच तरी,
असे अमुचे राजे शिवछत्रपती ll १ ll
अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
'जाणता राजा' एकची झाला
ते फक्त राजे शिवछत्रपती ।। २ ।।
धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती..
ते फक्त राजे शिवछत्रपती ।। ३ ।।
जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती..
ते फक्त राजे शिवछत्रपती ।। ४ ।।
स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली..
ते फक्त राजे शिवछत्रपती ।। ५ ।।
रयतेचं राज्य स्थापण्यासाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती..
ते फक्त राजे शिवछत्रपती ।। ६ ।।
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा–माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती..
ते फक्त राजे शिवछत्रपती ।। ७ ।।
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय!! ट्विटर वरील माझ्या सर्व हिंदू बांधवांना व बहिणींना माझ्या भगव्या शुभेच्छा..🚩

جاري تحميل الاقتراحات...