Malhar Pandey (MODI KA PARIVAR)
Malhar Pandey (MODI KA PARIVAR)

@malhar_pandey

13 تغريدة 2 قراءة Jan 11, 2022
#Thread : लालबहादूर शास्त्री - 56 वी पुण्यतिथी ( शास्त्रींच्या मृत्यूमुळे फायदा कोणाचा झाला ?)
1964 मध्ये पंतप्रधान नेहरूंच्या मृत्यू नंतर पंतप्रधान कोणाला करायचं हा प्रश्न काँग्रेस वर्किंग कमिटी समोर उद्भवला होता. 1/12
नेहरूंची मुलगी इंदिरा गांधीच पंतप्रधान व्हावी असे काही जणांचे मत होते तर काही जणांच्या मते इतर वरीष्ठ नेते पंतप्रधान व्हावेत असे मत होते. अश्या सगळ्यात, उत्तरप्रदेश च्या एका छोट्या खेडयातून वाढलेला 5 फूट 2 इंचाचा इसम भारताच्या सर्वोच पदी जाऊन आरूढ झाला. 2/12
त्या इसमाचे नाव लाल बहादूर शास्त्री. शास्त्रींच्या आगमनाने घराणेशाही ला धोका निर्माण झाला होता यात शंकाच नव्हती. नैसर्गिक रित्या नेतृत्वाचे गुण असलेले शास्त्री एक एक करत भारताचे भारतीयत्व जागृत करणाऱ्या योजना आणत होते. 3/12
अमेरिकेतून नित्कृष्ट दर्जाचा गहू आयात करायचा बंद करून भारतातील शेतकऱ्यांना देशी गहू पिकवण्यासाठी त्यांनी प्रेरित केले. शास्त्रींनी असे आर्थिक बदल घडवून आणले ज्याच्याने भारत आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वेगाने धावू लागला. 4/12
शास्त्रींची प्रतिमा संपूर्ण देशात आणि जगभरात एक कणखर नेता म्हणून निर्माण होत होती. याचा धोका कोणाला होता ?
1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारताने, 'शांतिप्रियतेचा' फुगा फोडत शत्रूदेश पाकिस्तान ला जशास तसे उत्तर दिले. 5/12
पाकिस्तान ला भारताची ताकद कळाली आणि स्वतःची पात्रता समजली आणि हेही समजले की "शांतिप्रियतेचा नावाखाली" भारताच्या पंतप्रधानपदी आता गुलाबाचे फुल बसलेले नाही. 17 दिवस सुरू असलेल्या या युद्धात भारताने पाकिस्तान पेक्षा कैकपटीने जास्त कमावले होते. भारत शक्तिशाली स्थितीत होता. 6/12
आदर्श स्थितीत पाकिस्तानने भारताकडे नाक घासत माफी मागत करारावर सही करण्यासाठी येणे भाग होते. परंतु काहीतरी विपरीत घडले. उझबेकिस्तानातील ताशकंत येथे भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध विरामचा करार होणार असे ठरले. 7/12
शास्त्रींना तिथे जाण्यापासून अनेकांनी विरोध केला अनेकांनी त्यांना सावध देखील केले. त्यांच्या जीवाला धोका असू शकतो हे संबंध देशाला माहीत होते. तरीही शास्त्री तिथे गेले. 10 जानेवारी 1966 रोजी ताशकंत करारावर सह्या झाल्या. 8/12
युद्धात जिंकलो असलो तरी आपण करारात हरलो आणि भारताला प्रचंड मोठी किंमत मोजावी लागली. 11 जानेवारी 1966 ला म्हणजे करारावर सही केल्यावर दुसऱ्याच दिवशी लाल बहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान यांचा देहांत झाला आहे अशी बातमी जगाला समजली. 9/12
हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे असे सांगण्यात आले. पण ,मग असे होते तर त्यांचे शरीर का निळे पडले होते ? शास्त्रींच्या मृत्यू मुळे कोणाला, कोणाच्या 'अपत्याला' फायदा होणार होता ? 10/12
शास्त्रींच्या मृत्यू मुळे घराणेशाहीत मानणाऱ्या लोकांचा फायदाच झाला पण सर्वात मोठे नुकसान झाले ते भारत वासीयांचे.
आज शास्त्रींच्या मृत्यूला 56 वर्ष उलटून गेली, तरीही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण आपल्याला ज्ञात नाही ! या मागे कोणाचा हात होता हे समजले नाही ! 11/12
हे मात्र निश्चित समजलं की त्यांच्या मृत्यूनंतर भारताच्या लोकशाहीचा गळा दाबून "हुकूमशाहीचे" पर्व सुरू झाले !
लाल बहादूर शास्त्रींच्या पुण्यातम्यास विनम्र अभिवादन 12/12

جاري تحميل الاقتراحات...