महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 38 कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी जेलमध्ये ठेवलंय. बरं झालं! त्यांना तुरुंगात का ठेवलंय, जरा निवांत वाचा :
संगोळी रायन्ना स्वातंत्र्यपूर्व कित्तूर संस्थानचे सेनापती आणि एक थोर भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते..
संगोळी रायन्ना स्वातंत्र्यपूर्व कित्तूर संस्थानचे सेनापती आणि एक थोर भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते..
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ब्रिटीशांशी निकराची झुंज दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संगोळी रायन्ना गनिमी काव्याने ब्रिटिशांशी लढले. त्याने गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले!
त्यांच्या मदतीने सरकारी मालमत्तेवर हल्ले कारणे, ब्रिटिशांचा खजिना लुटणे, जे सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांची जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले..
परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत! अखेर दगा करूनच ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. 26 जानेवारी 1831 रोजी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात नंदगड येथे रायान्ना यांना फाशी देण्यात आली..
आता जे 38 महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते तुरुंगात आहेत, त्या विषयावर येतो. ते 38 कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर निषेध करत होते म्हणून तुरुंगात नाहीत. या लोकांनी कन्नड-मराठी दंगली घडवण्यासाठी संगोळी रायन्नाच्या पुतळ्याची विटंबना केली!!
संगोळी रायन्नाच्या पुतळ्याची विटंबना करायची काय गरज होती? छत्रपती शिवाजी महाराज असो की संगोळी रायन्ना, दोघांच्याही काळात आज होता तसा महाराष्ट्र किंवा कर्नाटक नव्हताच! कन्नड-मराठी तंटे पण नव्हते. संगोळी रायन्नाचे आदर्श छत्रपती आणि छत्रपतींचे राज्य तर तामिळनाडू पर्यंत होते..
नेहरूंनी भाषेच्या आधारावर प्रांतरचना करत, जातींमध्ये विखुरलेल्या हिंदूंमध्ये भाषेचे हत्यार वापरत अजून फूट पाडली. प्रादेशिक अस्मितेचे राजकीय भांडवल करून काही लोकांनी मग आपली राजकीय पोळी भाजली. नेहरूंची divide & rule शिकवण आणि 'अस्मिता'वाल्यांची फूस त्या 38 कार्यकर्त्यांना होती..
जे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण 'हिंदुस्थानाचे आयकॉन' असले पाहिजेत, त्यांना याच लोकांनी 'महाराष्ट्राचे कुलदैवत' आणि मग लेफ्ट-लिबरल इतिहासकारांनी जातीवरून 'ग्रेट मराठा किंग' बनवलं! महाराजांना देशाचे आयकॉन न बनवण्यात, महाराजांना राज्यांपुरतं ठेवण्यात काही लोकांचा स्वार्थ आहे..
म्हणून त्या 38 लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कमीपणा येईल असा शिवद्रोह केला! महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इंग्रजांशी लढणाऱ्या संगोळी रायन्ना सारख्या मावळ्याचाच अपमान केला! यांची जागा तुरुंगातच आहे. त्यांना डिफेन्ड करणाऱ्यांना पण सोबतीला पाठवा.. जय शिवराय!
جاري تحميل الاقتراحات...