Tushar Lagad Patil 
Tushar Lagad Patil 

@lagadpatil_

16 تغريدة 8 قراءة Dec 14, 2021
#Thread
• रामशेज किल्ला -
रामशेज किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत हा किल्ला सतत साडेपाच वर्षे (पासष्ट महिने) मोगलांशी झुंजत ठेवला. रामशेजच्या लढाईचे वर्णन सर्वप्रथम मुघलांच्या कागदपत्रांत वाचायला मिळाले व खरा इतिहास उजेडात आला.
१/१५
प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तेथे त्यांची शेज आहे असे म्हणतात म्हणून किल्ल्याला रामशेज हे नाव पडले.
मराठा साम्राज्यातील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या दर्या-खोऱ्यात व घनदाट झाडींमध्ये होते-आहेत. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो.
२/१५
हा किल्ला सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. संपूर्ण नाशिकमधून या किल्ल्याचे दर्शन होते.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचा सहज पाडाव करता येईल या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले.
३/१५
त्याने किल्ल्यावर चाँदसितारा फडकावावा आणि त्यानंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कडा, साल्हेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबचा मनसुबा होता.
औरंगजेबाच्या या कारवाईची कुणकुण लागताच संभाजीराजांनी रामशेजच्या संरक्षणासाठी साल्हेर किल्ल्याचा किल्लेदाराला रामशेजवर रवाना केला.
४/१५
ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शहाबुद्दीन रामशेज किल्ल्यावर चालून आला.
५/१५
त्याच्यासोबत दहा हजारांची फौज होती आणि अफाट दारूगोळा आणि तोफा होत्या. त्यावेळी रामशेज किल्ल्यावर फक्त सहाशे मावळे होते.
ते मुळचे मावळातील, धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी. सूर्याजी जेधे रामशेजच्या तटावरून फिरत असायचे, दिवसा आणि रात्री सुद्धा.
६/१५
ते झोपायचे कधी हेच कोणाला माहीत नव्हते. शहाबुद्दीनन खानाने चार-पाच तासांत किल्ला ताब्यात घेऊ या विचाराने किल्ल्यावर ना ना तऱ्हेने हल्ला केला. किल्ल्याभोवतीचा वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या…
७/१५
…मात्र किल्ला त्याच्या ताब्यात येईना!
रामशेज किल्ल्यावर तोफा नव्हत्या. पण संभाजीराजांनी प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारूगोळा उपलब्ध करून ठेवला होता. मग किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. मराठ्यांनी किल्ल्यावरून खाली तोफांचा मारा सुरू केला.
८/१५
त्यामुळे शहाबुद्दीन खान गांगरून गेला. पाच महिने झाले, त्याला किल्ला काही जिंकता येईना. मोगलांचे तोफगाळे किल्ल्यावर पोचत नव्हते.
तेव्हा मोगलांनी जंगलातील झाडे तोडून किल्ल्याच्या उंचीचा बुरूज बनवला आणि त्यावर तोफा नेऊन किल्ल्यावर डागण्याचा बेत आखला.
९/१५
त्यावरून ते किल्ल्यावर मारा करू लागले. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. घनघोर युद्ध चालू होते. दोन वर्षे झाली, मात्र रामशेज किल्ला अजिंक्य राहिला. त्यानंतर औरंगजेबाने शहाबुद्दीनला माघारी बोलावून ती मोहीम फत्तेहखानकडे सोपवली.
१०/१५
फत्तेखानने रामशेजवर आक्रमण चढवले. तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल किल्ल्यावर आले, की किल्ल्यावरून मराठ्यांच्या गोफणीतून दगड सुटायचे. दगड इतके जोरात सुटायचे, की काही मोगल जाग्यावरच ठार व्हायचे. फत्तेहखानला मावळे तसूभरही पुढे सरकू देईनात.
११/१५
इतका खटाटोप करूनही किल्ला हाती येईना.
फत्तेहखानाचा एखादा तोफगोळा किल्ल्यावर पोचायचा आणि त्यामुळे किल्ल्याची तटबंदी किंवा बुरूज ढासळायचा. ते पाहून तो खुश व्हायचा. पण सकाळ झाली, की तो बुरूज परत बांधून झालेला असायचा!
१२/१५
ते पाहून फत्तेहखान आश्चर्यचकित व्हायचा. अनेक महिने सरले, हजारो मोगल मारले गेले, दारूगोळा वाया गेला.
फत्तेहखानने किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर तोफांचा मारा चालू केला. मुख्य दरवाज्याशी मावळे गुंतवून ठेवले. मग फत्तेहखानने निवडक सैनिक घेऊन किल्ल्याच्या मागून चढाई सुरू केली.
१३/१५
वाट अवघड होती तरीही त्यांचे सैनिक वर चढत होते. मावळेही तशा परिस्थितीत गाफिल राहणारे नव्हते.
सूर्याजींनी साथीला दोनशे मावळे घेतले आणि चहुबाजूंनी पहारा चालू केला. त्यांना फत्तेहखानाचा अंधारात चाललेला डाव समजला, मावळे बुरूजावर दबा धरून बसले.
१४/१५
जसे मोगल सैनिक वर पोचले तसे मराठ्यांनी गोफणी फिरवल्या. किल्ल्यावरच्या मोठमोठ्या शिळा ढकलून दिल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोगल जीव मुठीत धरून उड्या मारू लागले.
शत्रू पळून जाताना बघून मावळे आनंदित होऊन जोर जोरात आरोळ्या देऊ लागले.. #हरहरमहादेव, जय शिवाजी, जय भवानी !!
१५/१५

جاري تحميل الاقتراحات...