😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻
😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻

@Motabhaigujratw

10 تغريدة 2 قراءة Dec 12, 2021
क्रांतीकारी !
आपल्या देशात काही क्रांतिकारी चुकीच्या देशात जन्माला आले.त्यापैकीच एक म्हणजे "बटूकेश्वर दत्त"असे म्हणायला लागतंय,हे दुर्दैव का?
हे नेहरु-गांधी घराण्यात जन्माला आले नाहीत,हा त्यांचा अपराध होता.नाही तर,यांची शेकडो स्मारके नि योजनांना-रस्त्यांना यांची नावे दिसली असती.
सरकारी ऑफिसात त्यांचे फोटो लागले असते, जीवंतपणीच त्यांना भारतरत्न मिळाला असता !!
भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी नॅशनल असेम्बलीमध्ये बाॅम्ब टाकला होता. तेव्हा हे नाव सर्वतोमुखी झाले.
"ज्या दिल्लीत बॉम्बस्फोट करून मी ब्रिटिश सरकारविरुद्ध आवाज उठवला त्या दिल्लीत मला पुन्हा
स्ट्रेचरवरून अशाप्रकारे आणले जाईल, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता."
आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी अशी खंत बोलून दाखवणाऱ्या भगत सिंह यांच्या खांद्याला खांदा लावून 'इन्कलाब जिंदाबाद'चा जयघोष करणाऱ्या या महान क्रांतिकारकाच्या वाट्याला उपेक्षा, हालअपेष्टा आणि यातनाच आल्या !
१९४७साली भारत स्वतंत्र झाला.बटुकेश्वर दत्तांची सुटका झाली. अंजली नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला.बटुकेश्वर दत्त यांच्यापुढे आता पोटाचा प्रश्न उभा राहिला.स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणार्या बटुकेश्वर दत्त यांना दोन वेळच्या जेवणासाठी गोळ्या-बिस्कीटे विकावी लागली. 😢त्यांना
कळाले की पटना येथे बस चालवण्यासाठी लायसन्स मिळत आहे. त्यासाठी ते कमिश्नरला भेटले परंतु त्यांना स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यसैनिक असल्याचे प्रमाणपत्र मागण्यात आले.😳
काय वाटले असेल या क्रांतिकारकाला? ज्याला ब्रिटीश सरकार भयभीत व्हायचे, ज्याने स्वतंत्र भारतासाठी सर्वस्व अर्पण केले;
तो आता स्वतंत्र भारतात लाचाराप्रमाणे सरकारी कार्यालयात खेटे घालत होता.
पण सरतेशेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे प्रिय साथीदार शहीद भगतसिंह,सुखदेव आणि राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी पंजाबमधील हुसैनीवाला येथेच करावेत,अशी इच्छा त्यांनी भगत सिंह यांच्या मातोश्री
विद्यावती जी यांच्याकडे बोलून दाखवली आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचे अंतिम संस्कार त्याच ठिकाणी करण्यात आले.
कभी वह दिन भी आयेगा, की आझाद हम होंगे l
अपनी ही जमी होगी, अपना आसमाॅ होगा
शहिदो की चिताओ पर लगेंगे हर बरस मेले
वतन पर मरमिटनोवाला यही निशाँ होगा ll
परंतु रामप्रसाद
यांना काय माहित ? ज्यांच्यासाठी आपण फासावर जात आहोत, ते आपली आठवणही काढणार नाहीत.
तेच लोक आपल्याला विसरुन जातील. पंडीत नेहरु जेव्हा म्हणाले की "आम्ही रक्ताशिवाय स्वातंत्र्य मिळवले" तेव्हा या लोकांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील?
हे स्वातंत्र्य आम्हाला "बिना खड्ग बिना ढाल
मिळाले नाही.हजारो क्रांतिकारकांना फासावर जावे लागले.भारताच्या इतिहासातून आणि भारतीयांच्या जर आपण विस्मृतीस गेला असाल तरी तुमच्या सारख्या महान व्यक्तिमत्त्वाचे विचार जिवंत ठेवणे आमच्या सारख्या क्रांतीवेड्यांचे कर्तव्य आहे.
बटूकेश्र्वर दत्त यांना नमन 🙏🏻🌺
- मोटाभाई गुजरातवाले😎🇮🇳
छायाचित्रात भगतसिंह यांच्या मातोश्री आणि बटूकेश्र्वर जी.
#जयहिंद
#भारत_माता_की_जय🇮🇳

جاري تحميل الاقتراحات...