The Mahrattas (मराठी)
The Mahrattas (मराठी)

@the_mahrattas

7 تغريدة 6 قراءة Dec 11, 2021
नर्मदेची लढाई (1705) ⚔️-
मराठा सरसेनापती खंडेराव दाभाडे विरुद्ध मुघल सेना.
जेव्हा 8,000 मराठ्यांनी 24,000 मुघल-कोळी सैन्य नष्ट केले, एकाच दिवसात तेही शून्य (०) हानीसह!
गनिमी काव्याचा वापर करून मराठ्यांनी मोगल साम्राज्य कसे नष्ट केले याचे एक उत्कृष्ट उदाहरण.
(1)
२७ वर्षांच्या हिंदू मुक्तीच्या युद्ध काळामध्ये मराठ्यांचा सामना करण्यासाठी मुघल जनरल मुहम्मद बेग खान याला अहमदाबाद येथे पाठवण्यात आले.
मराठा सरसेनापती खंडेराव दाभाडे हे उत्तरेत तैनात असलेल्या दोन मराठा वीरांपैकी एक होते.
(2)
मुहम्मद बेग खान आणि त्याच्याबरोबर 10 ते12 मुघल सरदारांना 13,000-14,000 मुघल घोडेस्वार आणि 10,000 कोळी सैन्यासह तैनात करण्यात आले.
सरसेनापती खंडेराव यांनी या सैन्याला त्रास देण्यासाठी काही मराठा पथके पाठवली, ज्यांच्यावर 20,000 मुघल घोडेस्वारांनी हल्ला केला.
(3)
मुहम्मद बेग याला विश्वास होता की त्यांनी भ्याड मराठ्यांनवर सहज विजय मिळवेल.
24,000 मुघल-कोळी सैन्याने नर्मदा नदीजवळ तळ ठोकला, त्यांच्या घोड्यांना बिनधास्त ठेवून, निःशस्त्र हि केले.
दुरूनच मराठा हेरांनी हे सर्व निरीक्षण केले होते.
(4)
सरसेनापती खंडेरावांनी बरोबर वेळ पाहून नर्मदा नदीच्या भरतीच्या प्रवाहाची वेळ साधली आणि 8,000 मराठा घोडेस्वारांसह गनिमी काव्याने हल्ला केला.
झोपलेले मुघल झोपेतून हादरूनच उठले आणि त्यांनी नर्मदा ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण जोरदार प्रवाहामुळे बरेच जण असेच वाहून गेले.
(5)
अशा प्रकारे संपूर्ण 24,000 मुघल-कोळी सैन्य आणि 12 मुघल सरदार मारले गेले किंवा मराठ्यांनी पकडले, किंवा नर्मदेमध्ये वाहून गेले.
हे सर्व एका दिवसात घडले. 27 वर्षांच्या युद्धाची एक छोटीशी पण महत्वाची अशी ही लढाई.
(6)
माहिती स्त्रोत:
•A History of the Maratha People Vol. II, C.A. Kincaid, pages 110-111
•Muntakhāb-Ul-Lubab of Khafi Khan, trans. in Elliot's History of India according to it's own Historians - Muhammad Period, Vol. VII, pg. 375-376
(7)

جاري تحميل الاقتراحات...