Ramesh Raktade
Ramesh Raktade

@r_raktade

17 تغريدة 1 قراءة Dec 07, 2021
आज फेसबुकच्या इतिहासात मी पहिल्यांदाच हा विषय मांडतोय..
हिंदूंची मंदिरे, ट्रस्ट, संत, साधू, महात्मा, मठाधिपती, आखाडे, महामंडलेश्वर, शंकराचार्य ह्यांचा प्रखर हिंदूंच्या विकासात काय हातभार आहे?
आजच्या घडीला भारतात असे अनेक हिंदू साधू संत आहे, ज्यांचे मठ आहेत, जे मठाधिपती आहेत, जे महामंडलेश्वर आहेत त्यांच्या कडे दान देणगी म्हणून करोडो रुपये येत असतात. त्यांच्या पैशांचा उपयोग प्रखर हिंदूंच्या कोणत्या विकासासाठी उपयोगी पडतो का?
हिंदूंचे चार मुख्य शंकराचार्य आहेत. त्यांच्या पीठांना सुद्धा करोडो रुपयांच्या देणग्या येत असतात. त्यांच्या पीठांना देणगी स्वरूप आलेल्या पैशांचा किती प्रखर हिंदूंच्या विकासासाठी वापरण्यात आलाय?
नाही अन्नछत्रे, प्रसाद, वैद्यकीय सुविधा, आपात्कालीन मदत ह्या गोष्टी होतात. त्याचा आम्हाला अभिमानच आहे. पण ह्या सोबतच प्रखर हिंदूंचा विकास का साधला जाऊ शकत नाही?
आज मंदिर, ट्रस्ट, संत, साधू, महात्मा, मठाधिपती, आखाडे महामंडलेश्वर इतकेच नव्हे तर -
तर शंकराचार्य ह्यांच्या संस्था ट्रस्टला कोट्यवधी रुपयांचे दान येत असते. त्याचा उपयोग हिंदूंच्या उत्थानासाठी होणार नसेल व हा पैसा ही लोकं गादी खाली दाबून ठेवत असतील तर ह्यांच्या साधू संत मठाधिपती असण्याचा निष्ठेने देव, देश धर्मकार्य करणाऱ्यांना उपयोग काय?
आज चर्चच्या पैशाचा उपयोग कसा आणि कोणासाठी होतो हे सर्वाना माहीत आहे. वक्फ बोर्डाचा पैसा कुठे कोणासाठी वापरला जातो हे सर्वाना माहीत आहे. हिंदूंच्या मंदिर, ट्रस्ट, आखाड्यांनाही दान येते.भले चर्च आणि वक्फ बोर्ड पेक्षा तुलनेने कितीतरी कमी येत असेल पण येणारी रक्कम ही काही थोडकी नाहीये
स्थानिक हिंदूंचे कार्य, त्यांची हिंदुत्वनिष्ठता, त्यांची धर्मप्रति असणारी तळमळ पाहून व त्याची आर्थिक अडचण गरज ओळखून स्थानिक मंदिरे, ट्रस्ट आखाड्यांनी अश्या हिंदूंना जर अर्थमुक्त करण्याचे ठरवले व -
त्याप्रमाणे पंचवीस हजार पासून पंचवीस लाखा पर्यंत बिनव्याजी कर्ज व्यवसाय उभारण्यासाठी म्हणून दिले तर हिंदूंचाच उद्धार होणार आहे. हिंदूचेच भले होणार आहे. 'धर्म की रक्षा करो धर्म तुम्हारी रक्षा करेगा' हे सहज शक्य होणार आहे.
आज अनेक गौरक्षक जीवावर उदार होऊन गौरक्षा करतात. त्यातील अनेक जणांना नोकरी नसते. व्यवसाय नसतो. व्यवसायाच्या संधी शोधत असतात. धमक असते. पण केवळ बँकांच्या क्रायटेरियात बसत नसल्याने व्यवसायाची इच्छा असूनही लोन मिळत नाही.
अश्यावेळेस देशातल्या प्रमुख व मोठ्या गौशाळांनी पुढाकार घेऊन अश्या हिंदूंना काही प्रमाणात अर्थमुक्त करण्याची जबाबदारी उचलली तर? अनेक गौशाळा तर शेकडो दुकानात त्यांच्या गौशाळेच्या नावाचे दानपात्रच ठेवून देतात. -
ह्यातून जमा होणाऱ्या निधीतून स्थानिक गरजू प्रखर हिंदूंचा व्यापार उभा राहू शकत नाही का?
आता पहा ना. काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी महाराज ह्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. सोबत एक हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचीही बातमी आली.
ह्या इतक्या संपत्तीतला दहा टक्के भाग जरी प्रखर हिंदूंना व्यवसाय उभारायला मदत म्हणून दिला असता तर? हे शक्य होते कीं नव्हते?
माझे बोलणे कदाचित कोणाला पटणार नाही. पण देशात हिंदूंचीच आर्थिक गणिते विस्कटलेली आहेत.
ना ख्रिस्तींना, ना मुसलमानांना दोघांपैकी कोणाचीही प्रखर हिंदूंपेक्षा आर्थिक कोंडी झालेली नाही. अश्या वेळेस हिंदूंची मंदिरे, ट्रस्ट, संत, साधू, महात्मा, मठाधिपती, आखाडे, महामंडलेश्वर ह्यांनी स्वतःहून पुढे येऊन प्रखर हिंदूंना व्यवसायासाठी मदतीचा हात पुढे करावा.
हा पैसा त्यांना देऊन नाही टाकायचा आहे. त्यांना हा पैसा व्यापार उभारणीसाठी काही काळासाठी बिनव्याजी कर्ज म्हणून द्यायचा आहे. किंवा मंदिर, ट्रस्ट, आखाडा इत्यादींच्या नावे स्वतः व्यवसाय उभे करून द्यावेत आणि ८०%-२०% भागीदारी ठेऊन २०% प्रमाणे पैसे परत घ्यावेत.
एकदा सर्व पैसे मिळाले की भागीदारी मोडून त्या हिंदूला प्रोप्रायटर करून टाकावे.
कोणत्याही सरकारी कर्ज सुविधांचा, योजनांचा लाभ हिंदूंना होत नाही. मुसलमानांचे मुल्ला मौलवी सरकारी योजनांचा अभ्यास करून सरकार दरबारी स्वतःचे वजन वापरून त्यांच्या समाजातील लोकांना सर्व लाभ मिळवून देतात.
वर मशिदीतूनही मदत करतात. हिंदूंसाठी असे करणारे कोणी आहे का? अश्या वेळेस मंदिरे, ट्रस्ट, संत, साधू, आखाडे, ह्यांनी निवडणुकीच्या आवश्यकता नसताना स्वतःची राजकिय मते ममडण्याचे सोडून देऊन प्रखर हिंदूंना आर्थिक विकासाच्या मदतीचा हात देने ही काळाची -
आणि मुख्यतः प्रखर हिंदूंची गरज बनलेली आहे.
।। जय हिंदुराष्ट्र ।।

جاري تحميل الاقتراحات...